You are on page 1of 3

इचलकरं जीचे जोशी बनले घोरपडे

महाराष्ट्रात मराठ्यांच्या ९६ कुळाच्यामागे उत्पत्तीपासूनचा इतिहास दडलेला आहे . त्यानुसार शिवरायांच्या


कुळाचा अभ्यास केलातर त्यांच्या घराण्याच्या दोन शाखा पडल्या . एक भोसले आणि दस
ु रे घोरपडे. भोसले घराण्यातील
भोसाजीपासून या घराण्याला भोसले नावाने ओळखले जाऊ लागले. भोसल्यांचे पुर्वज बहामनी साम्राज्यात चाकरी करत
असताना कोकणातील खेळणा किल्ला ु ती करण्यात आली . कर्णसिंहाने आपला
घेण्याकरीता कर्णसिंह भोसल्यांची नियक्
मुलगा भिमसिंहासह किल्ल्यावर हल्ला चढविला. तेव्हा दर्ग
ु म असणारा खेळणा ताब्यात येत नसल्याचे दिसताच
गडाच्या पाठीमागून घोरपडीच्यासाह्याने चढून तो हस्तगत केला . कर्णसिंहाला यात मरण पत्करावे लागले . त्यांचा
पराक्रम बहामनी सुलतानाने भिमसिंहाला राजा घोरपडे बहाद्दर हा किताब व मुधोळची जहागिरी दिला. तेव्हापासून या
भोसले घराण्याला घोरपडे नाव पडले.

बहामनी सत्तेनंतर निजामशाही, आदिलशाही व मोगलांकडे आपली तलवार गाजवत घोरपडे घराण्याच्या
शाखाही विस्तारीत झाल्या. त्यानुसार कापसी, रे ठरे , दत्तवाड, गजेंद्रगड, साटवे, गुत्ती, सांडूर या मुख्य शाखेबरोबर
घोरपड्यांचे वंशज पुण्यातील पिंपरी चिंचवडपासून कर्नाटक, मध्यप्रदे श, गोवा, गुजरात भागातही स्थायिक झालेले
दिसतात. घोरपडे म्हटलं की, आपोआपच संताजीचे नाव पुढे येते.

शिवकालखंडात म्हाळोजी घोरपडेंनी स्वराज्यासाठी अनेक लढाया मारल्या . मोगलाचा सेनापती मुकर्रबखानाने
छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी संगमेश्वर याठिकाणी वेढा घातला तेव्हा म्हाळोजीबाबांनी पराक्रमाची शर्थ करत
राजांसाठी आपले प्राण अर्पण केले.

म्हाळोजीसोबत त्यांची तिन्ही मुले मालोजी, बहिर्जी आणि संताजीने आपल्या कतर्त्वा
ृ ने मख्ययग
ु ात आपली
छाप सोडली. विशेषत: छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनत
ं र या बंधुचा पराक्रम अद्वितीय होता . छत्रपती राजारामांनी
संताजीला सेनापती बनविल्यानंतर त्याने मोगलांना सळो की पळो करून सोडले होते . कोल्हापरू परिसरातील कापशी
याठिकाणी संताजीने आपले जहागिरीचे ठाणे ठे वल्यानंतर पुणे ते जिंजीपर्यंत मोगली फौजांचा समाचार घेतला.
प्रत्येकाला जीवनात उभे राहण्यासाठी कुणाचेतरी बोट धरावेच लागते. ज्याप्रमाणे संताजी छत्रपती शिवरायापासून
राजारामापर्यंत वरच्या पदापर्यंत पोहोचत होता. त्याप्रमाणे त्यांच्या कडक शिस्तीखाली अनेक पराक्रमी माणसं निर्माण
झाली.

असाच एक सर्वसामान्य ब्राम्हणाचा मुलगा संताजीच्या पदराखाली आला आणि त्याचे जीवन बदलून केले .
सिंधुदर्ग
ु जवळील महापण नावाच्या खेडग ू गंगाबाईला वैधव्य आले. त्या आपला
े ावात तेथील कुलकर्णीपणाच्या वादातन
५ वर्षाचा मुलगा घेवून आश्रय घेण्याकरीता स्वराज्यातील कापशी गावात आल्या. मुलगा तल्लक बद्ध
ु ीचा असल्याचे
त्याने घोरपडे सरदाराकडे नोकरी धरली . संताजीच्या पराक्रमासोबत जहागिरीचा व्याप वाढला तसा कारभाराच्या
व्यवस्थेकरीता स्वतंत्र मज ू दार (हिशोबनीस ) म्हणन
ु म ू एका मल ू केली. त्या मल
ु ाची नेमणक ु ाचे नाव होते- नारो महादे व
जोशी.
नारोपंत अतिशय तल्लक बुद्धीचा असल्याने थोड्याच दिवसात त्याने सेनापती संताजी घोरपडेचे मन जिंकले .
संताजीचे दोन विवाह झाले होते. त्यांच्यापासन ु े झाली . छत्रपती राजारामाच्या
ू त्यांना राणोजी व पिराजी ही दोन मल
कालखंडात मराठ्यांची गादी तामिळनाडूमधील जिंजी याठिकाणी असल्याने सेनापती म्हणून संताजीची फारच धावपळ
होत होती. अशावेळी नारोने जहागिरीची व्यवस्था चोखपणे सांभाळण्याचे काम केले . आपल्या कतर्त्वा
ृ च्या जोरावर
नारोपंत संताजीच्या एवढ्या जवळ गेला की, संताजीने आपल्या मुलाप्रमाणे नारोला सांभाळले.

नारो महादे वही संताजीला आपल्या पित्याप्रमाणे मानून जहागिरीची व्यवस्था सांभाळत होता. हे मानामानीचे
नाते असलेतरी नारो हा ब्राम्हण तर घोरपडे मराठा. त्यातच मध्ययुगीन कालखंडात जातीव्यवस्था फारच गत
ुं ागुंतीची
असल्याने भारतातील कुठल्याही लष्करात भोजनाची स्वतंत्र व्यवस्था होत होती. असेच एका निवांतक्षणी
संताजीसोबत नारोपंतही जेवायला बसला. संताजीच्या पत्नी द्वारकाबाई जेवण वाढताहेत. जातीव्यवस्थेचा पगडा
असल्याने नारो महादे व स्वतंत्रपणे वेगळ्या थाळीत जेवण करत होता.

एका बाजल
ू ा पती तर त्यांच्यासोबत त्यांना वडिलासमान मानणारा नारो जेवत असताना द्वारकाबाईंनी
नारोची फिरकी घेत म्हटले की, तू संताजीराजांना वडिलासमान मानतो ना? मग केवळ ब्राम्हण असल्यानेच वेगळ्या
थाळीत जेवण करतो आहे स. त्यांना वडिल मानत असशीलतर त्यांच्यासोबत जेवून दाखव . संताजीबाबावर मनापासून
प्रेम करणाऱ्या नारो महादे व जोशीला या गोष्टीचा फारच खेद वाटला आणि आपला ब्राम्हणी पगडा दरू सारून
क्षणाचाही विचार न करता संताजीच्या ताटात बसून एकत्र भोजन सुरू केले. सर्वांचेच मन भरून आले. परं तु, नारो हा
मनापासून संताजीभक्त होता. त्याचे डोळे भरून आले आणि त्याने त्याच आवेशात द्वारकाबाईला उत्तर दिले,
आईसाहे ब आजपासन ु े जोशीऐवजी घोरपडे आडनाव लावणार आहे .
ू फक्त जेवणच नाहीतर मी माझ्या नावापढ

त्यानुसार नारो महादे व जोशी आता नारो महोदव घोरपडे बनला . संताजीने नारोची भक्ती पाहून स्वत:च्या
मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. एवढे च नाहीतर पुढे त्याला दत्तक घेऊन आपल्या जहागिरीतील इचलकरं जी ठाणे
नारो महादे वला दे ऊन आपल्या बरोबरीचा दर्जा दिला. दिवसेंदिवस इचलकरं जीची जहागीरही फुलायला लागली.

संभाजीराजांच्या निधनामुळे पोरका झालेल्या महाराष्ट्राला पुन्हा संजीवनी दे ण्याचे काम संताजी, धनाजीने सुरू
केले. त्यांच्या पराक्रमापढ
ु े मोगलांच्या घोड्यांनाही पाणी पिताना ते दिसायला लागले. एका म्यानात दोन तलवारी रहात
नाहीत. धनाजी, संताजीमध्ये वितष्ु ट येऊन शिखर शिंगणापरू जवळील महादे वाच्या डोंगरात संताजीचा गफलतीने खन

करण्यात आला. मराठी साम्राज्यासोबतच घोरपडे घराण्यावर द:ु खाचा डोंगर कोसळला. अशावेळी नारोजीने वडिलकीच्या
नात्याने घराला आधार दिला. रामचंद्रपंत अमात्यांच्या मदतीने पिराजीला सेनापतीपद मिळवून दिले . घोरपडे घराण्याची
मोट बांधून पुन्हा एकदा हे घराणे मराठी साम्राज्यात पुर्ववैभवाने उभे राहिले अर्थातच यामागे नारो महादे वाचा सिंहाचा
वाटा होता.

संताजीचे वंशज म्हणून दोन्ही मुले राणोजी व पिराजी कापशीत राहिले. तर घोरपडेंच्या पदस्पर्शाने नारोचे
भाग्यही उदयाला आले. इचलकरं जी संस्थानाने एवढे बाळसे धरले की , सातारचे छत्रपती शाहुमहाराज, रामचंद्रपंत
अमात्य, पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथबरोबर त्याचे घनिष्ट संबंध निर्माण झाले . पुढे नारो घोरपडेचे वजन एवढे
वाढले की, बाळाजी विश्वनाथाने आपली मल
ु गी अण्णब ु गा व्यंकटरावाशी निश्चित केला.
ू ाईचा विवाह नारोबाचा मल
शाही विवाहसोहळा इचलकरं जी याठिकाणी होणार असल्याने सातारा आणि कोल्हापूरच्या छत्रपतीबरोबरच
अनेक शाही पाहुणे दाखल झाले होते. परं तु नारोला आस होती आपल्या आईसाहे ब द्वारकाबाई -संताजी घोरपडेंच्या
आगमनाची. तेवढ्यात बाईसाहे ब आल्याची हरकार्‍याने वर्दी दिली. सन्मानपुर्वक द्वारकाबाईसाहे बांची पालखी मंडपापुढे
येवून टे कविली. भोई बाजूला झाले आणि उतरण्यापूर्वी बाईसाहे बांनी पडद्यातून मंडपामध्ये सहज नजर फिरविली . सर्वत्र
पुणेरी भरणा असल्याने स्त्रियांच्या डोक्यावर पदर ना पडदा दिसला. ९६ कुळी द्वारकाबाईसाहे बांनी नारोकडे याचा जाब

विचारत म्हटले, हे लग्न जोशीचे नाही घोरपडेंचे आहे .

नारोची पंचाईत झाली. एका बाजूला खूद पेशव्यांचे वऱ्हाड आणि दस


ु ऱ्या बाजूला आईसाहे ब . परं तु त्याही
अवस्थेत त्याच्यातला घोरपडे जागा झाला आणि त्याने ही गोष्ट पेशव्यांच्या कानावर घातली आणि कडक शब्दात
ताकीद दिली की, आमच्या ग्रामीण रितीरिवाजाप्रमाणे तुमच्या पुणेरी स्त्रियां पदर आणि पडदा वापरणार असतील
तरच लग्न होणार, नाहीतर होणार नाही. ही अट मान्य झाल्यानंतर आईसाहे ब पालखीतून बाहे र आल्या आणि हा
शाही विवाह पार पडला.

अण्णुबाई या बाळाजी विश्वनाथच्या मुलगी तर पहिल्या बाजीरावाच्या बहिण असल्याने त्यांचे पुण्यातील
वजन वाढले. पती व्यंकटरावसह त्या पुण्यामध्ये मोठ्या वाड्यात रहात असत. साहजिकच यामुळे मराठ्यांच्या
राजकारणात इचलकरं जी गावाचे महत्वही वाढले . इचलकरं जीच्या या घराण्याने आजतागायत घोरपडे नावात बदल
केलेला नाही. ब्राम्हण समाजात घोरपडे आडनाव अन्यत्र सापडणारही नाही. परं तु या घराण्याने मिळविलेले नाव

ू नावारूपाला आणले. पुढे व्यंकटराव दस


कर्तुत्वातन ु रे यांच्या काळात इचलकरं जीत सुतगिरण्याच्या रूपाने एवढी प्रगती
केली की, गावाला पश्चिमेकडील मॅनचेस्टर म्हटले गेले. अशारितीने कतर्त्वा
ृ ने एखाद्याने नाव मिळविले म्हणतात
त्यांच्याकरीता हे एक आदर्श उदाहरण आहे .

You might also like