You are on page 1of 2

सर्वसाधारण अहवाल

चांदी नदी प्रकल्प ता. नांदगाव (खं) जि. अमरावती


तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणे बाबत.

चांदी नदी हा बृहत ल.पा. प्रकल्पास शासन निर्णय क्र.ल.पा.त.2206(653/2006) ल.पा.2 दि.20/12/2006 नुसार
रु.48.19 कोटी किं मतीस प्रशासकीय मान्यता, शासन निर्णय क्र.ल.पा.त./2009/(179/2009) ल.पा.2 मंत्रालय मुंबई
दि.29/11/2010 अन्वये रु.117.56 कोटी किं मतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता व महामंडळ निर्णय क्र. 87/विपाविम/कातां.7/
(धा.क्र.116/209) चांदी नदी प्रकल्प सुप्रमा/2018 दि 03/04/2018 नुसार 156.76 कोटी किं मतीस द्वितीय सुधारीत प्रशासकीय
मान्यता मंजुर आहे.

चांदी नदी हा बृहत ल.पा. प्रकल्प असुन सद्यस्थितीत धरण, सांडवा व विमोचकाचे काम पूर्ण झाले आहे व सन 2012 पासून
धरणामध्ये जलसाठा निर्माण होत आहे. तसेच मुख्य कालवा कि.मी. 1 ते 16 चे काम पूर्ण झाले आहे. मुख्य कालव्यावरील वितरीका व
लघुकालव्यांची कामे प्रगतीपथावर असुन 65% कामे पुर्ण झाली आहेत व जुन-2022 पर्यंत संपुर्ण प्रकल्पीय सिंचन क्षमता 1835 हे. निर्माण
करण्याचे नियोजित आहे. भाग-1 ची कामे बंद नलिका वितरण प्रणालिद्वारे करण्याचे प्रस्तावित असुन सदर प्रस्ताव मंजुरीस्तव महामंडळास
सादर करण्यात आला आहे.

चांदी नदी प्रकल्पास संदर्भिय पत्र क्र.1 अन्वये रु.156.76 कोटी किं मतीला (सन 2014-15 च्या दरसुचीवर आधारीत) द्वितीय
सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. चांदी नदी प्रकल्पावर फ़े ब्रुवारी-2022 अखेरपर्यंत रु.157.26 कोटी खर्च झाला असुन यामध्ये
बांधकाम घटकावर झालेला खर्च रु.100.92 कोटी व भूसंपादन व ईतर अनुषंगीक बाबींवर झालेला खर्च रु.54.95 कोटी आहे. मंजुर द्वितीय
सुप्रमा मध्ये भूसंपादनासाठी एकु ण 43.26 कोटी ची तरतुद करण्यात आलेली होती. तथापि, आजतागायत भूसंपादनावर रु.51.75 कोटी
म्हणजेच रु.8.51 कोटी चा अतिरीक्त खर्च झालेला आहे. सदर खर्चामध्ये जुना भूसंपादन कायदयामधील कलम-18 व कलम-28 अंतर्गत मा.
न्यायालयाने दिलेल्या वाढीव मोबदल्यामुळे झालेला आहे. सदर बाबीची तरतुद मंजुर द्वितीय सुप्रमा मध्ये करण्यात आलेली नव्हती. सद्यस्थितीत
प्रकल्पाची मुख्य कालव्यावरील वितरीका व लघुकालवे आणि भूविकास भाग-1 ची कामे बाकी असुन उपरोक्त नमुद वाढीव खर्चामुळे प्रकल्पाचे
बांधकाम घटकाचे वास्तविक किं मतीत वाढ/घट चा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

मंजुर द्वितीय सुप्रमा नुसार प्रकल्पाच्या बांधकाम मंजुर सुप्रमा किं मत (-) भूसंपादन (-) अनुषंगीक खर्च
घटकाची वास्तविक किं मत (रु. कोटी)
156.76-43.26-4.07 = 109.43 कोटी

फ़े ब्रुवारी-2022 अखेर बांधकामावर झालेला खर्च रु. 100.92 कोटी

प्रकल्पाची उर्वरीत कामाची किं मत (रु. कोटी) 1) वितरीका व लघुकालवेस्वामित्त्व : 4.21


ल्कसह (एकुण किं मत=8.01,
=3.80)
खर्च
भ) भूविकास भाग-1 (बंद : 8.46
नलिके )
द् वा
रे

क) भुसंपादन 5.38
ड) ईतर उपशिर्षावरील खर्च 1.19
इ) अनुषंगीक खर्च 1.44
एकु ण प्रकल्पाची उर्वरीत कामाची किं मत (रु. कोटी) 20.68

प्रकल्पाची अद्ययावत बांधकाम घटकावरील किं मत (रु. बांधकाम घटकावर झालेला खर्च + प्रकल्पाची उर्वरीत किं मत (भुसंपादन वगळुन)
कोटी)
(100.92) + (15.90) = 116.82 कोटी

(मंजुर सुप्रमा वास्तविक किं मतीच्या तुलनेत 6.75% ने बांधकाम घटाकावर


वाढ.)

मंजुर द्वितीय सुप्रमा नुसार प्रकल्पाची किं मत (रु. कोटी) 156.76

फ़े ब्रुवारी-2022 अखेर प्रकल्पावर झालेला खर्च (रु. रु. 157.26


कोटी)

प्रकल्पाची अद्ययावत एकु ण किं मत (रु. कोटी) 157.26 + 4.21 + 8.46 + 5.38+1.19+1.44 = 177.94 कोटी.

(मंजुर सुप्रमा किं मतीच्या तुलनेत 13.51% ने वाढ.)

प्रकल्पाला द्वितीय सुप्रमा रु.156.76 कोटी मंजुर असुन उपरोक्त नमुद उर्वरीत कामे व भविष्यात अपेक्षीत इतर खर्च गृहीत
धरुन प्रकल्पावर खालीलप्रमाणे खर्च अपेक्षीत आहे.

उपरोक्त नमुद गोषवा-यानुसार प्रकल्पाची अद्ययावत किं मत मंजुर द्वितीय सुप्रमा किं मतीपेक्षा 13.51 % ने जास्त होत
आहे. तथापि, सदर प्रकल्प खर्चातील वाढ हि मुख्यत्वे भूसंपादनामध्ये मा. न्यायालयाने कलम-18 व कलम-28 अंतर्गत दिलेल्या वाढिव
मोबदल्यामुळे झालेली आहे. द्वितीय सुप्रमा मधील प्रकल्पाची फक्त बांधकाम घटकाची किं मत विचारात घेतल्यास, सदर बाबीमध्ये द्वितीय सुप्रमा
च्या तरतुदीच्या तुलनेत 6.75% ने वाढ होत असल्याचे दिसते. चांदी नदी प्रकल्पावर मंजुर द्वितीय सुप्रमा किं मतीपेक्षा, उपरोक्त नमुद मर्यादेत
वाढीव खर्च करण्यास संदर्भीय पत्र क्र.2 अन्वये परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलाआहे.तथापि,अद्याप वाढिव
खर्च करण्यास मंजुरी अप्राप्तआहे.

चांदी नदी प्रकल्प कें द्र शासन पुरस्कृ त बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत समाविष्ट असुन जुन-2023 पर्यंत पुर्ण करण्याचे
उद्दिष्ट आहे. सदर प्रकल्प विहित मुदतीत पुर्ण करुन सिंचन क्षमता निर्मितेचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे दृष्टिने तृतीय सुप्रमा सादर करण्यात येत आहे.

आपले माहिती व पुढील कार्यवाहिसाठी सविनय सादर.

You might also like