You are on page 1of 15

आदिवासी हे या प्रदे शातील सर्वात असरु क्षित गट आहे त मात्र यांना

संरक्षित केलं जात नाही असं त्यांनी आदिवासींच्या परिस्थितीबद्दल


बोलताना सांगितलं.
"आमचा तालुका पेसा प्रदे शात येतो आणि पेसा कायद्याने आम्हाला या
प्रकल्पाला विरोध करण्याची परवानगी आहे . मात्र बंदर आणि बंदरांशी
संबंधित रे ल्वे मार्गांच्या योजनेत आदिवासींसाठीचा हा पेसा कायदा
अडचणीचा ठरू शकतो, हे हे रून, राज्यपालांनी एक अध्यादे श जारी केला. या
अध्यादे शाचा आदिवासींच्या कायद्यावर परिणाम होणार आहे .
राज्यपालांनी पारित केलेला हा कायदा हा आदिवासींसाठी धोकादायक
आहे च आणि कायदे शीरदृष्ट्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचं उल्लंघन
करणारा आहे ."
बंदराविरुद्धचा संघर्ष आम्ही सरू
ु च ठे वू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
"बंदराविरुद्धचा लढा आणखी खंबीर होत असन
ू आता अनेक महिला आणि
युवक या लढ्यात सहभागी होत आहे त आणि बंदराची निर्मिती
थांबवण्यासाठी आम्ही संघर्ष सुरूच ठे वू"

मुंबई किनारी रस्ता, महाराष्ट्र


महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे नेते किरण कोळी यांनी याबाबत माहिती
दिली. मंब
ु ई किनारी रस्त्यांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सरु
ु वातीला 2011 मध्ये
मांडण्यात आला होता. 2020 मध्ये या प्रकल्पाचा खर्च 5000 कोटी
रुपयांवरून 15000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. हा प्रकल्प एकूण
29.2 किलोमीटर लांबीचा आणि 244 हे क्टर मध्ये पसरलेला असून त्यापैकी
केवळ 44 हे क्टर क्षेत्र रस्त्यांसाठी प्रस्तावित आहे . उर्वरित क्षेत्रात पर्यटन
स्थळे आणि जॉगिंग पार्क प्रस्तावित आहे त. या परिसरात राहणाऱ्या
लोकांशी या रस्ते प्रकल्पाच्या परिणामां बाबत चर्चा करण्यात आली नाही,
याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा परिसर छोटे मासेमार किंवा दारिद्र्यरे षेखालील
मासेमारांच्या लोकसंख्येनं व्यापलेला परिसर आहे . 
यांत्रिक पद्धतीने मासेमारी नं करता कोळं बी, लॉबस्टर आणि विविध
प्रजातीचे चांगले मासे हाताने जाळे टाकून पकडून ते आपला उदरनिर्वाह
चालवतात. किनारी रस्त्याच्या निर्मितीमळ
ु े या मच्छीमारांचे जीवनमान
आणि रोजगार धोक्यात आला आहे . किनारी रस्त्यामुळे ज्या चार गावांना
याचा मोठा फटका बसणार आहे , तसेच यामुळे नष्ट होणाऱ्या खारफुटी
वनांबाबत कोणतीही योजना आखण्यात आली नसल्याचं त्यांनी निदर्शनास
आणन
ू दिलं. यामळ
ु े होणाऱ्या नक
ु सानाची भरपाई आणि पन
ु र्वसनाबाबतही
स्पष्टता नसल्याचं त्यांनी सांगितलं. किनारी प्रकल्पामुळे होणाऱ्या
स्थानिकांच्या दर्दु शेचा बहृ न्मुंबई महापालिका असो किंवा महाराष्ट्र सरकार
यांनी कोणीही विचार केलेला नाही. या प्रकल्पाला स्थगिती दे ण्याचा उच्च
न्यायालयाचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. या
प्रकल्पामुळे होणाऱ्या विध्वंसाकडे सपशेल दर्ल
ु क्ष करत सर्वोच्च न्यायालयाने
प्रकल्पाच्या अंमलबजावणीला परवानगी दिली आहे . सर्वोच्च
न्यायालयाच्या या निर्णयामळ
ु े आमचा विश्वासघात झाल्यासारखं वाटत
आहे . आम्हाला कोर्टाकडून न्याय हवा आहे "

गज
ु रात
उस्मांगनी शेरासिया. ज्येष्ठ नेते. मच्छीमार अधिकार संघर्ष समिती.
गुजरात.
हक्कांची पायमल्ली होणे ही नवीन घटना नाही मात्र गुजरातमध्ये गेली
अनेक वर्ष हे च सरू
ु आहे असं शेरासिया म्हणाले. ब्लू इकॉनोमी चा अभ्यास
करण्यासाठी संशोधकांचे पथक गुजरात मध्ये आले तेव्हा हे स्पष्ट झाले की
गुजरात मध्ये ब्लू इकॉनोमी ची अंमलबजावणी आधीच झाली आहे .
गज
ु रातच्या 1600 किलोमीटर किनारपट्टी पैकी 400-500 किलोमीटर भाग
कच्छ मध्ये येतो‌. मंद्र
ु ामध्ये अदानी समह
ू ानी संपर्ण
ू गजु रात मध्ये निर्माण
केलेल्या कॅप्टीव्ह जेट्टी, बंदर, वेअर हाऊस  कडे पाहिलंत तर ब्लू इकॉनोमी
स्पष्टपणे दिसेल. आणि जामनगर भागात पाहिलं तर रिलायन्सनेही याच
प्रकारची ब्लू इकॉनोमी उभी केली आहे . 
समद्र
ु किनाऱ्यालगत रासायनिक उद्योग आणि बंदरावर आधारित उद्योग
आधीपासूनच आहे त. नरें द्र मोदी जेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते,
तेव्हा गुजरातला लाभलेला मोठ्या समुद्रकिनाऱ्याचा विकास कसा करता
येईल ही त्यांची कल्पना तेव्हापासूनच होती. आणि तेच आता ब्लू
इकॉनोमीच्या रूपाने प्रत्यक्षात आणलं जात आहे . परं तु विकासाच्या या
संकल्पनेत, आणि ब्लू इकॉनोमी मॉडेल मध्येही मच्छीमारांसाठी कुठे ही
जागा नाही. हे विकासाचे प्रारूप, किनारे आणि समुद्र ओरबाडणारे असल्याचं
तज्ञ डॉ.अपर्णा संद
ु र यांनी केलेल्या सादरीकरणात हे स्पष्ट झालं आहे .
1989 पासन
ू किनारपट्टीवरील विकासाचा इतिहास डॉ. संद
ु र यांनी
अभ्यासला. गेल्या 30 वर्षांमध्ये जे घडलं ते समस्या अधिकच वाढवत
नेणारं आहे .‌राज्याकडून केंद्राकडे आणि केंद्राकडून आंतरराष्ट्रीय खाजगी
कंपन्यांकडे होत असलेल्या हस्तांतरणाकडे संद
ु र यांनी लक्ष वेधलं. त्यांनी
सांगितलं की या पद्धतीने प्रामुख्याने सार्वजनिक संसाधनांचे खाजगीकरण, 
खाजगी कंपन्यांच्या नफ्यासाठी सार्वजनिक संसाधनांचा वापर आणि
स्थानिकांना डावलून भांडवली मक्तेदारी निर्माण केली जात आहे . स्थानिक
समद
ु ायांकडून त्यांची जमीन आणि नैसर्गिक संसाधन ओरबाडून घेऊन
भांडवलदार नफा कमावत आहे त.  पर्यटन, उद्योग, राष्ट्रीय सुरक्षा,
खाणकाम, बंदर विकास आणि इतर उद्योग उभे करून त्यांनी या प्रदे शात
अत्यंत हिंसक पद्धतीने त्यांचं स्थान सरु क्षित केलं आहे .  जेणेकरून
स्थानिक समद
ु ाय यापासन
ू दरू राहतील. यासाठी बळाचाही वापर केला जात
आहे हे ही सुंदर यांनी नमूद केले. संवर्धन करणे किंवा नैसर्गिक संकटांच्या
नावाखाली सागरी क्षेत्र बळकावलं जात आहे . "सागरी संरक्षित क्षेत्र आणि
ब्लू कार्बन उपक्रमांकडे पाहिल्यास, तसंच यासाठी वापरली जाणारी भाषा
पाहता लक्षात येईल की संकटांच्या नावाखाली भांडवलीकरणालाच चालना
दिली जात आहे . त्यांनी ओखी चक्रीवादळाचे उदाहरण दिलं. ओखी
चक्रीवादळाच्या नावाखाली इथल्या मच्छिमार समद
ु ायाला किनाऱ्यापासन

दरू केलं गेलं. किनारी पर्यटनासाठी दारं खुली केली. तसंच जागतिक अन्न
संकटाचं कारण दे त औद्योगिक मत्स्यपालनाला मोकळीक दे ण्यात आली. 

2. धोरणे आणि कायद्यांमध्ये कॉर्पोरे ट कंपन्यांना अनक


ु ू ल बदल
नागरिकांच्या गरजांच्या विरोधी, मात्र कॉर्पोरे ट कंपन्यांच्या फायद्याची
ठरतील अशी धोरणे आणि कायदे करून उद्योगांना भक्कम बनवलं
जातं असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे . केंद्रीय आणि राज्य या दोन्ही
पातळ्यांवर पर्यावरण आणि मच्छीमार समुदायांना संरक्षण दे णारे कायदे
आणि धोरणे बदलली, शिथिल करण्यात आली.
यात खालील कायद्यांचा समावेश आहे .

2019 च्या किनारी नियामक क्षेत्र अधिसूचनेत 1991 आणि 2011 च्या
CRZ - किनारी नियामक क्षेत्र अधिसूचनेतील अनेक महत्वाच्या तरतुदी
शिथिल केल्या.

राष्ट्रीय जलमार्ग कायदा 2016.


111 जलमार्गांच्या राष्ट्रीयीकरणाद्वारे दे शांतर्गत जलवाहतक
ू विकसित
करण्यासाठी हा कायदा आणला होता.

पर्यावरण प्रभाव मल्


ू यांकन अधिसच
ू ना 2020 मसद
ु ा.
या अधिसच
ू नेत मळ
ू चा पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि 2006 च्या
अधिसूचनेतील तरतुदी शिथिल करण्यात आल्या.
यासह राष्ट्रीय मत्स्य पालन धोरण 2020, सागरमाला, स्वदे श दर्शन अन्य
काही योजनांमुळे किनारी प्रशासन व्यवस्थेतील बदलाचा पायाच घातला
आहे . यापैकी बहुतांश उपक्रम हे थेट कार्यकारी पातळीवरून आले आहे त.
यात केल्या जाणाऱ्या बदलांसाठी संसदीय किंवा सार्वजनिक चर्चा झालेली
नाही. अशाच प्रकारचे बदल कायदे आणि धोरणांमध्ये करण्यात आले असून
यामध्ये कॉर्पोरे ट कंपन्यांचं हित साधले जात असून मच्छीमारांच्या
हक्कांवर आणि पर्यावरण सरु क्षेवर गदा आली आहे . दे शात सर्वच किनारी
राज्यांमध्ये दे खील अशीच कॉर्पोरे ट हिताची धोरणं आखली जात आहे त.
केरळमध्येही ब्लू इकॉनोमी ला चालना दे णारे कायदे आणि धोरणे आणली
गेली आहे त. यात खालील कायद्यांचा समावेश आहे .

केरळ राज्य मत्स्यपालन धोरण 2019


हे धोरण खोल समुद्रातील मासेमारीला प्रोत्साहन दे तं, तसंच या धोरणांतर्गत
पर्यटनाला चालना दे ण्यात आली आहे .

केरळ सागरी मासेमारी नियमन सध


ु ारणा कायदा 2017
या कायद्यानस
ु ार नौकांची संख्या मर्यादित करण्याच्या उद्देशाने नोंदणी
करणे अनिवार्य ठरवण्यात आलं. आणि परवाना नसलेल्या सर्व पारं परिक
मासेमारी नौका बेकायदे शीर ठरवण्याची तरतूद या कायद्यात आहे .
या कायद्यामुळे मत्स्य पालन व्यवस्थापनासाठी त्रिस्तरीय पद्धत लागू
करण्यात आली आहे . मात्र केरळ संबंधीच्या अहवालात असं आढळून आलं
आहे की, "सह-व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकार पारं परिक संस्थांमध्ये
घुसखोरी करत आहे आणि महत्वाचे अधिकार स्वतःकडे घेत आहे . परिणामी
पारं परिक प्रशासन व्यवस्थेचा पद्धतशीरपणे ऱ्हास होत आहे . 

केरळ मत्स्य लिलाव, विपणन आणि गुणवत्ता नियंत्रण अध्यादे श 2020


2017 मध्ये आणण्यात आलेल्या या कायद्याच्या विधेयकाला विरोध झाला
होता. परु वठा साखळी सरकारी नियंत्रणाखाली आणण्याचं यात प्रस्तावित
आहे . मोठ्या खाजगी कंपन्या मासळी विक्रीसाठी ज्या प्रमाणात येत आहे त
त्यावरून हा अध्यादे श पारं परिक लिलाव पद्धती संपवण्याचा मार्ग मोकळा
करू शकतो. यामळ
ु े लिलावापासन
ू विक्रीपर्यंत अनौपचारिक परु वठा मल्
ू य
साखळीवर अवलंबून असणाऱ्या सर्व लोकांचा विशेषतः मच्छिमार महिलांचा
रोजगार नष्ट होऊ शकतो.

कर्नाटक राज्यात ब्लू इकॉनोमी सल


ु भ करण्यासाठी आणले गेलेले नवीन
कायदे आणि धोरणांमध्ये कर्नाटक औद्योगिक धोरण 2014 -2019
समाविष्ट आहे . या धोरणांतर्गत औद्योगिक वापरासाठी  40,000 एकर
जमीन अधिग्रहित करण्याचं उद्दिष्ट होतं. प्रत्येकी 100 एकर पेक्षा अधिक
पूर्णपणे खाजगी मालकीचे खाजगी औद्योगिक क्षेत्रांची स्थापना प्रस्तावित
होती. खाजगी जमीन मालकी हस्तांतरणावरील निर्बंध हटवून एक खिडकी
योजनेतून मंजुरीच्या औपचारिकता कंपन्यांसाठी सोप्या करण्याचा
प्रस्ताव आहे .

कर्नाटक लघुबंदर विकास धोरण, 2014 मध्ये सध्याची लहान मासेमारी


बंदरे विकसित करून व्यावसायिक बंदरांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव
आहे . खाजगी बंदरे दे खील अधिग्रहित करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे .
सर्व संयुक्त बंदर प्रकल्पांमध्ये सरकारी गुंतवणुकीची जास्तीत जास्त
मर्यादा 11% निश्चित करण्यात आली आहे .

कर्नाटक पर्यटन धोरण 2015 - 2020. या धोरणाअंतर्गत 100 कोटी आणि


त्याहून अधिक किमतीच्या मोठ्या पर्यटन प्रकल्पांवर भर दे ण्यात आला.
तसंच मंगळुरू आणि कारवार मध्ये क्रूज पर्यटनाला चालना दे ण्यात आली.
कृषी व्यवसाय आणि अन्न प्रक्रिया धोरण 2015
या धोरणाद्वारे मासळी बाजाराच्या आधनि
ु कीकरणाचा प्रस्ताव दिला. 500
टन क्षमतेचा सागरी अन्नप्रक्रिया उद्योग एका खाजगी कंत्राटदाराला
भाडेतत्त्वावर दे ण्यात आला. फ्रेश टू होम आणि लिशियस सारख्या
ऑनलाइन मासळी परु वठा कंपन्या सध्याच्या परु वठा साखळीला भेदन

व्यापार करतात. आधुनिकीकरणाचा या प्रकारामुळे सध्याचे पारं परिक
मच्छीमार, विशेषतः महिला उपेक्षित राहतात.

गोवा राज्यातही ब्लू इकॉनोमी सल


ु भ करण्यासाठी नवे कायदे आणि धोरणे
आणण्यात आली. यात खालील धोरणांचा समावेश आहे .

गोवा गंत
ु वणक
ू धोरण 2014
हे धोरण दर्जेदार पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी खाजगी गुंतवणुकीला
प्रोत्साहन दे ते. खाजगी जेट्टी किंवा टर्मिनल बांधण्यास तसेच पुरवठा
केंद्रांच्या निर्मितीला परवाना दे ते.

गोवा पर्यटन धोरण 2020


हे धोरण, स्थानिक समद
ु ायाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या बीच शॅक्स वर
खप
ू परवानग्यांच्या कचाट्यात अडकवन
ू निर्बंध घालते. मात्र दस
ु ऱ्या
बाजूला निवासी सुविधांच्या विकासाला हॉटे लच्या निर्मितीला प्रोत्साहन
दे ते तसेच किनारपट्टीवरील अनेक पर्यटन स्थळांच्या किनाऱ्यावर ब्लू फ्लॅ ग
प्रमाणपत्र प्रस्तावित करते.

गोवा सागरी मासेमारी नियमन सुधारणा कायदा 2019.


या कायद्याने 12 सागरी मैलांच्या आत मासेमारी करणाऱ्या नौकांना
थांबवणं, त्यात प्रवेश करणे शोध घेणे तसंच मच्छीमारांची चौकशी करण्याचे
अधिकार मरीन पोलिसांना दे ण्यात आले. तसंच कारवाई दरम्यान मासेमारी
करणाऱ्या नौकांचं काही नक
ु सान झाल्यास त्यासाठी पोलीस उत्तरदायी
राहत नाहीत तसेच पोलिसांना या कायद्यामळ
ु े संरक्षण मिळाले आहे . 

महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2016


बंदरे आणि बंदरांना जोडणाऱ्या मार्गिका, कॅप्टिव जेट्टी, किनारी विशेष
आर्थिक क्षेत्र, आणि दे शांतर्गत जलमार्ग वाहतूकीच्या विकासासाठी या
धोरणांतर्गत तरतूद करण्यात आली आहे .

महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016. 


या अंतर्गत येत्या 2025 पर्यंत पर्यटन क्षेत्रात 30,000 कोटी रुपयांची
गुंतवणूक आकर्षित करण्याचं उद्दिष्ट ठे वण्यात आलं आहे . उपलब्ध
अधिग्रहित जमिनीवर मेगा पर्यटन प्रकल्प उभे करण्यास प्रोत्साहन दे ण्यात
आलं आहे .

महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019


या धोरणांतर्गत उद्योगांसाठी लँ ड बँक तयार करण्याचा प्रस्ताव आहे .
सध्याच्या (CIIF) क्रिटिकल इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि खाजगी
पायाभत
ू सवि
ु धांच्या विकासाला प्रोत्साहन दे ण्यासाठी 1000 कोटी रुपयांचा
वर्धित निधी तसेच उद्योगांसाठी लागणाऱ्या विविध परवान्यांच्या
मंजुरीसाठी एक खिडकी पद्धत या धोरणाअंतर्गत प्रस्तावित आहे .

ब्लू इकॉनोमी प्रारूप महत्वकांक्षीरीत्या राबवणाऱ्या सरु


ु वातीच्या राज्यांमध्ये
गुजरात राज्य प्रथम स्थानी होते. 1990 च्या उत्तरार्धापासूनच गुजरात
मध्ये ब्लू इकॉनोमी राबवण्यास सुरुवात झाली. गुजरात मधील जुने आणि
नवीन कायदे आणि धोरणे सर्वच खाजगीकरणाचा परु स्कार करणारे आहे त.
1995 मध्ये गज
ु रात बंदर धोरणांतर्गत बंदर आणि बंदर विषयक
उद्योगांमध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी दिली. खाजगी गुंतवणूकदारांना
कॅप्टीव्ह जेटी, खाजगी बंदरे , रे ल्वे लिंकेज, जहाज बांधणी आणि दरु
ु स्ती
यार्डांच्या तसंच परू क सेवा उद्योगाच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दे ण्यात
आलं. या धोरणामुळे भारतातील सर्वाधिक खाजगी गुंतवणूक गुजरात च्या
किनाऱ्यावर झाली. बंदराच्या खाजगीकरणाचे हे प्रारूप इतर औद्योगिक
क्षेत्रांमध्येही वापरलं गेलं. 

1999 मध्ये गुजरात पायाभूत सुविधा विकास GID कायदा लागू करण्यात
आला.  या कायद्याने सार्वजनिक खाजगी भागीदारीला कायदे शीर चौकटीत
बसवलं गेलं.

2009 मध्ये सरकारने गुजरात मधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी


'ब्लू प्रिंट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर इन गज
ु रात' BIG 2020 जारी केली. जागतिक
पातळीवर गुजरात ला व्यवसायासाठी पसंतीचे ठिकाण बनवण्याच्या
उद्देशाने ही ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे .

गुजरात औद्योगिक धोरण 2015 


10 कोटी भांडवलाच्या सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांपासून (MSME) 4000
कोटींपर्यंतच्या मोठ्या उद्योगांना (ultra mega projects) प्रोत्साहन
दे ण्यासाठी आणि खाजगी औद्योगिक पार्क ची स्थापना करण्याची तरतद
ू या
धोरणात करण्यात आली.

एकात्मिक सागरी धोरण 2017 समद्र


ु ातील मत्स्यसंवर्धन, सागरी
जैवतंत्रज्ञान, सागरी ऊर्जा आणि समुद्रतळाचे खाणकाम यासह सागरी
क्षेत्राच्या विविध क्षेत्रांशी संबधि
ं त असलेल्या समस्यांवर काम करण्यासाठी
समन्वित दृष्टिकोन दे णे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे . या व्यतिरिक्त, सागरी
क्षेत्रातील घडामोडींचे कार्यक्षम आणि शाश्वत व्यवस्थापन करता यावे
यासाठी सागरी अवकाश नियोजनाचीही योजना प्रस्तावित आहे .
आधुनिकीकरणाच्या नव्या पद्धतीने ब्लू इकॉनोमी अंतर्गत नैसर्गिक
संसाधनांचे स्रोत अधिग्रहित करून संस्थांच्या आणि कायद्याच्या
अखत्यारीत आणणे, तसेच खाजगीकरण करणं अशा बाबी समाविष्ट आहे त
असं डॉक्टर अपर्णा संद
ु र यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे .
"ते केवळ मासेमारी समुदायांच्या पारं पारिक अधिकारांवर गदा आणत
नसून, या समुदायांनी मोठ्या प्रयत्नांनी मिळवलेले संरक्षण प्रदान करणारे
कायदे च कमकुवत किंवा नाहीसे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे "
संद
ु र यांनी किनारी क्षेत्र नियामक अधिसच
ू ना 2019 (coastal zone
regulation notification 2019) चे उदाहरण दिले.
या धोरणाने  पर्यटन उद्योगाला अधिक सवलती दिल्या. नो-डेव्हलपमें ट
झोन कमी केला, इको टुरिझमला परवानगी दिली, समद्र
ु किनाऱ्यावर अधिक
बांधकामांना परवानगी दिली, कचरा विल्हे वाटीचे नियम आणि भूजल उपसा
यावर असलेले निर्बंधही कमी केले, पारं परिक हक्क असलेल्या स्थानिक
लोकांना वगळून राखीव क्षेत्रांच्या निर्मितीला चालना दिली. 
" इथल्या संसाधनांवर नैसर्गिक हक्क असणाऱ्या या समद
ु ायातील
लोकांकडे हक्कच राहिले नसून ते आता नोकर झाले आहे त. बहुतेक वेळा
तर त्यांना नोकरीही नसते ते केवळ बेरोजगारीपायी नोकरीच्या शोधात
वणवण करत असतात."
ब्लू इकॉनोमी प्रारूपामुळे धोक्यात आलेल्या स्थानिक समुदायांच्या
पारं परिक अधिकारांकडे अपर्णा सुंदर यांनी लक्ष वेधले. आधुनिकीकरणाच्या
प्रक्रियेने ग्रामीण संस्थांच्या अस्तित्वाला आव्हान दिले आहे . या ग्रामीण
संस्था सागरी संसाधनांचा अतिरिक्त वापर होऊ नये यासाठी मासेमारीच्या
ं गिअर्सच्या वापरावरील
हं गामाच्या मर्यादा, अंतरावरील तसेच फिशिग
मर्यादा अशा नियमांच्या आधारे पारं परिक रित्या नियमन करीत असत.
सर्वसामान्यांच्या सामहि
ू क हक्कांची जाणीव विकासाच्या नव्या प्रारूपामळ
ु े
पस
ु न
ू टाकली जात आहे असं त्यांनी नमद
ू केलं. 
पारं परिक ज्ञान, सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दव्ु याचे
महत्व ओळखण्याची नितांत आवश्यकता असून, अन्न आणि शेती संघटना 
FAO - food and agriculture organisation सारख्या आंतरराष्ट्रीय
संघटनेच्या संहितेनुसार छोट्या मासेमारी प्रकल्पांसाठी ही  मार्गदर्शक
तत्वे सच
ु वलेली आहे त असं त्या म्हणाल्या.

3. समद
ु ायांशी सल्लामसलतीचा अभाव
कोणत्याही प्रकल्पावर स्थानिक समुदायांशी सल्लामसलत किंवा पूर्वसूचना
दे ऊन संमती घेण्यात आली नसल्याचं वरील सर्व उदाहरणांमध्ये लक्षात
येतं. 2014 च्या लोकसभा आणि 2016 च्या विधानसभा
निवडणुकांदरम्यान केरळ मधील विझिंजम बंदरांचं बांधकाम थांबवावं या
मागणीसाठी काही महिला, आमदार आणि खासदारांशी बोलल्या होत्या असं
एम. अमला यांनी सांगितलं. एका राजकीय संमेलनात पंधरा-वीस महिलांनी
बंदराचे काम थांबवण्याची मागणी थेट व्यासपीठावर जाऊन केली होती.
यापैकी काही महिलांनी बंदराच्या ऱ्हासाबाबत अभ्यास करण्यासाठी एका
स्वतंत्र संशोधन संस्थेसोबत सुद्धा काम केलं होतं. परं तु, कशाचाही उपयोग
झाला नाही. अमला यांच्या मते, "आपण हे सर्व प्रयत्न केले तरीही
सरकारला मात्र केवळ कॉर्पोरे ट कंपन्यांची वाढ/हित हवे आहे . एखाद्या
ठिकाणी विकास प्रकल्प सुरू करत असताना स्थानिकांशी चर्चा करूनच
निर्णय घेतले पाहिजेत मात्र याचा कोणाला फायदा होतोय, कोणावर वाईट
परिणाम होतो, मच्छीमारांच्या व्यवसायावर काय परिणाम होतो, यापैकी
कशाचाही विचार सरकार करीत नाही. "
महाराष्ट्रात, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने 2012 मध्ये पण
ु े येथील
राष्ट्रीय हरित लवादाकडे किनारी महामार्ग - कोस्टल रोडच्या विरोधात
याचिका दाखल केली होती. मात्र 2014 मध्ये निवत्ृ त झालेल्या
न्यायाधीशांच्या जागी नव्या न्यायाधीशांची नियुक्ती नं झाल्याने या
खटल्याची सन
ु ावणी प्रतीक्षेतच आहे . मच्छिमार कृती समितीचे किरण
कोळी यांच्या मते, " हरित लवादातील या रिक्त जागांवर नियुक्ती
करण्याबाबत सरकारची उदासीन आहे . राष्ट्रीय हरित लवादाने यापूर्वी जे
काही चांगले निर्णय दिले होते ती तत्व आता पाळली जात नाहीत लक्षात
येतंय. यापर्वी
ू 2005 मध्ये जेव्हा पेडर रोड उड्डाण पल
ु ाचा प्रश्न उपस्थित
झाला त्यावेळी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी त्या पुलाच्या
बांधकामाला विरोध केला होता आणि त्यानंतर ते बांधकाम थांबवण्यात
आलं होतं. प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचं म्हणणं ऐकून घेणारे सरकार हजारो
मच्छीमारांचे प्रश्न ऐकून घेऊ शकत नाही हे खरोखर खप
ू निराशाजनक
आहे .
या प्रश्नांशी निगडित असणाऱ्या आमच्यासारख्या संस्थांना दे खील
विश्वासात घेतलं गेलं नाही, 2019 च्या किनारी नियमक क्षेत्र
अधिसूचनेतील (CRZ) कलमांचे हे उल्लंघन आहे . 2011 मध्ये तत्कालीन
पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी CRZ 2011 ला कायदे शीर स्वरूप
दे ण्यापूर्वी मच्छीमारांना विश्वासात घेऊन चर्चा केली होती. 

CRZ कायद्यात 2019 मध्ये सुधारणा केल्या जात असताना मच्छीमारांशी


कोणतेही सल्लामसलत केली गेली नाही. असे कायदे अधिकृतपणे
अस्तित्वात आणण्यास जे सरकार काम करते, त्या सध्याच्या सरकारला
दोष दे ण्यात आम्हाला काहीही चुकीचे वाटत नाही. थोडक्यात, आता
आम्हाला खात्री पटली आहे की, कायद्यांमध्ये या सगळ्या दरु
ु स्त्या किनारी
रस्ते प्रकल्प सक्षम करण्यासाठीच करण्यात आल्या होत्या तसेच यापर्वी

आम्हाला दे ण्यात आलेली किनारी जैवविविधतेच्या संरक्षणाची हमी ही
मळ
ु ातच खप
ू च मवाळ / फसवी होती. ब्लू फ्लॅ ग बीचेस संदर्भातही मच्छीमार
आणि इतर किनारी समुदायांशी कोणतीही चर्चा अथवा सल्लामसलत
झालेली नाही असं न्यायालयीन समितीला सादर केलेल्या अहवालातही
निदर्शनास आले आहे . केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील कप्पड मध्ये
काही पंचायत समित्यांशी जुजबी चर्चा करण्यात आली होती, मात्र स्थानिक
समुदायाशी कोणत्याही प्रकारची चर्चा घेण्यात आली नाही. कर्नाटकातील
उत्तर कन्नडा जिल्ह्यातील टीन कासारगोड समुद्रकिनाऱ्यावरील
मच्छीमारांनी सांगितलं की, त्यांना बीचवर उभारल्या जाणाऱ्या कोणत्याही
प्रकल्पाबद्दल माहिती दे ण्यात आली नव्हती. कप्पड आणि कासारगोड या
दोन्ही ठिकाणी अंमलबजावणी करणाऱ्या विभागांमध्ये स्थानिक
समद
ु ायाचा समावेश नाही तसंच त्यांच्याशी चर्चाही केलेली
नाही. महाराष्ट्राच्या अहवालात असेही दिसन
ू आलं आहे की, ब्लू फ्लॅ ग
बीचसाठी भोगवे आणि दे वबाग या गावांजवळ, पाच किलोमीटरचा पट्टा
निश्चित करण्यात आला होता. हे किनारे पर्यटनविषयक उपक्रम विकसित
करण्यासाठी खाजगी कंपन्यांना भाडेतत्वावर दे ण्यात आले आहे त.
समुद्रकिनारे भाडेतत्त्वावर दे ण्याबाबत आपण पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं
ं ीच्या निविदा प्रक्रियांसाठी किंवा
मासेमारांनी म्हटलं आहे . तसंच यासंबध
सार्वजनिक सुनावणीसाठीही स्थानिकांचा कोणताही सल्ला घेण्यात आला
नसल्याचं या अहवालात नमद
ू करण्यात आलं आहे .

4. पर्यावरणीय परिसंस्थांचा नाश


ब्लू इकॉनोमी मॉडेलला पर्यावरणीय परिसंस्थांबद्दल आणि स्थानिक
समुदायांबद्दल कोणतीही पर्वा नाही याचे प्रतिक्रियांच्या स्वरूपातील पुरावे
न्यायालयाला सादर करण्यात आले आहे त. गुजरातमध्ये, समस्त भरूच
जिल्हा मच्छिमार समाजाचे नेते कमलेशभाई मढीवाला, भरूच जिल्ह्यातील
अडचणींबद्दल बोलले. नर्मदा नदी अरबी समद्र
ु ाला जिथे मिळते त्या खाडी
परिसरावर जवळपास 15000 मत्स्य कामगारांचे जीवनमान अवलंबन

आहे . मढीवाला यांच्या मते, गुजरात औद्योगिक विकास महामंडळाच्या
चार मोठ्या क्षेत्रांमध्ये हजारो उद्योग आहे त, जातील अनेक उद्योगांकडे
सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसन
ू ते सांडपाणी नर्मदा नदीत
सोडतात. मच्छीमारांवर याचा खूप वाईट परिणाम झाला आहे , यावर त्यांनी
भर दिला.
" त्यांनी नर्मदा नदीचे गटार बनवले आहे . पर्वी
ू मच्छिमार मासळीने भरलेली
बोट घेऊन समद्र
ु ातन
ू परत यायचे. मात्र जलप्रदष
ू णामळ
ु े मत्स्य उत्पादनात
मोठ्या प्रमाणात घट झाली आहे . पर्वी
ू इथे मोठ्या प्रमाणात हिल्सा मासे
मिळायचे, आमचे 500 ते 600 कोटी रुपयांचे उत्पादन होत असे. परं तु
गेल्या काही वर्षात, मोठमोठे उद्योग वाढल्यामळ
ु े संपर्ण
ू किनारपट्टी
प्रदषि
ू त झाली आहे . अनेक ठिकाणी पाईपलाईन तट
ु ल्या आहे त, गाळ
अडकून पडला आहे आणि तो किनारपट्टीवर सोडण्यात आला आहे .
कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या गाळात निकेल आणि शिसे यासारखी
रसायने असल्यामळ
ु े लाखो मेलेले लहान मासे किनाऱ्यावर आम्हाला
दिसतात. "
गुजरात प्रदष
ू ण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या मात्र कोणतीही कारवाई
झाली नाही असं मढीवाला सांगतात. नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या
नव्या बंधाऱ्याच्या प्रस्तावामळ
ु े होणाऱ्या संभाव्य धोक्याबद्दलही मढीवाला
यांनी सांगितलं. नर्मदा खाडीच्या मध्यभागी भाभूत बंधारा प्रस्तावित आहे .
यातील 80% पाणी दहे ज आणि विलायत GIDC मध्ये वळवण्याची तरतूद
प्रस्तावित आहे . मात्र हे पाणी शेतीसाठी, शहरातील पिण्याच्या वापरासाठी
अडवत असल्याचं लोकांना सांगितलं जात आहे . यामळ
ु े इथले मच्छीमार
जीवसष्ृ टी आणि निसर्ग नष्ट होत आहे . लोकांकडून त्यांची जीवनावश्यक
साधने हिरावन
ू घेऊन ती उद्योजकांना दे ण्याची पद्धतच झाली आहे .

You might also like