You are on page 1of 18

मी पारधी

(१) मुख पृष्ठ


(२) लेखकाचे मनोगत
(३) प्रस्तावना
(४) शुभेच्छा / शुभसंदेश
(५) पारधी समाज - ओळख लेखकाच्या नजरेतून, भारतीय संस्कृ ती,
अनुसूचित जमाती, अनुसूचित महाराणा कर्नाटक,
मध्यप्रदेश गुजराथ,
(६) मी पारधी -लेखकाचे आत्मपरीक्षण /चरित्र .

प्रकाशित लेख - (१) लोकसत्ता


(२) महाराष्ट्र टाइम्स
(३) लोकमत
(४) दै. सकाळ
(५) दै. सम्राट
(६) दै .महानगर
(७)मानवी हक्क आयोगाचा निकाल
(८) छायाचित्रे – आंदोलन

(७) शुभ संदेश – मा.श्री.नाना पाटोले


अर्पण पत्रिका

ज्यांच्यामुळे मला हे सुंदर जग पहायला मीळाल त्या माझ्या वात्सल्यमुर्ती मातोश्री येनाबाई
नागो साळुंके / पारधी..

पिताश्री नागो सुपडू साळुंके /पारधी.


यांचे चरणी विनम्र अर्पण.......

आप्पासाहेब साळुंके
लेखक
मी पारधी
मी पारधी या आदिवासी जमातीत १२ जानेवारी १९६१ मध्ये जळगाव जिल्हात वाघरी या खेडेगावात
जन्मलो. माझे जन्म नाव सनातन असे होते तर शाळेत नाव टाकताना एकनाथ नोंदवले व जन्म तारीख सुद्धा
शिक्षकांनी त्याच्या सोयीची १ जून १९६० अशी नोंदवली आहे.आई येनाबाई व वडील नागो सुपडू पारधी मुळ
रहिवाशी शहापूर. ता. जामनेर, जि. जळगाव. माझ्या आईचे वडील बंडू पारधी वाघारीला राहत होते. मुळ
रहिवाशी मोढाळा, ता. भुसावळ, जि. जळगाव.सततच्या भटकं तीमुळे मुळ गावे सांगता सुद्धा येत नाही. आईचे
वडील बंडू पारधी वाघारीला वाघारीला स्थायिक झाल्याने त्याच्या प्रेमापोटी माझे आई-वडील राहायला आले.
आईला दोन बहिणी व तीन भाऊ पैकी एक लहान भाऊ शिक्षकाच्या नोकरीनिमित्त बाहेर गावी राहत होते तर
सर्वात मोठे भाऊ नारायण व दोन नंबरचे भाऊ दशरथ हे वाघारीला राहत.माझ्या आई वडील हे मोल मजुरी
करून चरितार्थ चालवत होते. वडील एकटेच होते त्यांना एक बहीण तीही अकाली विधवा, तिला एक मुलगा व
एक मुलगी होती ती पळासखेडे ता. भुसावळ येथे राहत होती आमच्या घरात आई अशिक्षित तर वडिलांचे
चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. परंतु घरात आईचेच वर्चस्व होते. आम्ही एकू ण ९ भावंड ७ भाऊ व दोन बहिणी
जिजाबाई बहिणीचे व प्रल्हाद नावाच्या भावाचे लहानपणीच वेळेवर औषोधोपचार न झाल्याने मृत्यू झाले. मोठे
कु टुंब असल्याने मोलमजुरी करूनही चरितार्थ चालविणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत सुद्धा मुलांनी
शिक्षण घ्यावे अशी आमच्या आईची तीव्र इच्छा असल्याने माझे भाऊ शिक्षण घेत होते. सर्वात मोठा भाऊ
यशवंत व दोन नंबरचा भाऊ हरचंद हे शालेय शिक्षण ७ वी पर्यंतचे संपवून पुढील शिक्षणासाठी शेंदुर्णी व
साकारी - फे करी येथे वस्तीगृहात राहून शिक्षण घेऊ लागले.७ फायनलच्या परीक्षेला आमच्या गावातून
तालुक्याला जाणारा पहिला विद्यार्थी माझा मोठा भाऊ हरचंद होता. माझे तीन मोठे भाऊ वसतीगृहात राहून
शिक्षण घेत होते. तेव्हा मी आई-वडिलांसोबत गावात राहून काम/मजुरीसाठी कधी या गावी तर कधी दुसऱ्या
गावी जात असल्याने ४ पर्यंतचे शिक्षण कसे बसे पूर्ण के ले. त्यानंतर शिक्षणात खंड पडला. मी आई-
वडिलांबरोबर मोलमजुरी करू लागलो. आईबरोबर शेतात खुरपणी, वेचणी, लावणी करणे, पाल्या खोदणे,
सडककाम, खडी फोडणे, विहीर खोदणे, तेंदुपत्ते गोळा करणे, भुईमूग उपटणे, कापूस काढणे अशी विविध
प्रकारची शेती कामे करणे उन्हाळ्यात रोजगार हमीची सडक कामे करणे, शेतकऱ्यांच्या शेतात बिल्डिंगची कामे
(बांध बांधणे) असे काम करून पोटाची खळगी भरण्याचे प्रयत्न करीत असताना शेत काम करताना दुपारची
न्याहारी सुद्धा मिळत नसेल कोणी अर्धी किं वा चतकोरी भाकरी दिली तर आई व मी ती खात असे. मला
खायला जास्त मिळावे म्हणून मी घाईघाईने भाकरी खात असे. हे जेव्हा आईच्या लक्षात यायचे तेव्हा ती स्वतः
खाणे बंद करून भाकरीचा तुकडा माझ्यापुढे ढकलून देत असे. मला जास्त खायला मिळावे म्हणून आई स्वतः
उपाशीपोटी राहत असे. वडील शेतराखणीचे काम करत. मी त्यांच्या बरोबर रात्री शेतराखण करण्यासाठी जात
होतो. हातात बॅटरी, भाला, फरसी, कु राड घेऊन शेतात जायचे. रात्री शेतात फे रफटका मारताना वडील दुसऱ्या
रखवालदाराला मोठ्याने ओरडून आवाज काढून साथ देत असत या अचानक काढलेल्या आवाजाने माझ्या
छातीत धडकी भरत असे. तर शेतातून जाताना अचानक लावा पक्षाचा थवा भुर्र्र र्र असा आवाज करून उठायचा
तेव्हा सुद्धा धडकी भरायची काळजाचे पाणी पाणी व्हायचे. परंतु नंतर सवय झाल्याने भिती वाटत नसे
वडिलांबरोबर शेत राखणे, माती काम, जंगलातून लाकू ड तोडून, लाकडे व सरपण विकणे असे काम करूनही
पोटाला पोटभरून जेवण मिळत नसे म्हणून हातभट्टी दारुचा धंदा सुरु के ला १५ ते २० वर्षे दारुचा धंदा के ला व
मीही त्यांना या कामी दोन चार वर्ष हातभार लावू लागलो. माझ्या वडीलानी आयुष्यात कधीही दारु पिली नाही.
दार पाडणे व विकणे कायदाने गुन्हा होता. अधून मधून पोलीस छापे मारून हे हात भट्टीचे धंदे करणाऱ्यांना
पकडून नेले होते. पोलिसांना गावचे पोलीस पाटील श्री. विठ्ठल पाटील खबर देत असत. माझे वडील हा धंदा
करुनही कधी दारू पीत नव्हते तर सर्व मुलं शिक्षण घेत होती सहानुभूतीपोटी पोलीसांनी कधीच आमच्या घरावर
छापा टाकला नाही किं वा पोलीस के स सुद्धा झाली नाही नारायण मामा व आईचे वडील बंडू पारधी यांचा
दबदबा होताच. आजोबा बंडूबुवा व दशरथ मामा मिळून इमारती व जाळाऊ लाकडांचा व्यवसाय करीत
सोबतच शेती व लाकडी कोळसा तयार करून शहरात बोदवड, जामनेर, जामठी अशा शहरी भागात मारवाडी
व्यापारी, श्रीमंत व नोकरदारलोकांना कोळसा विकत होते. त्यामुळे चांगलाच जनसंपर्क होता. त्यांचा आई-
वडीलांना पूर्ण सहकार्य करायची इच्छा असूनही आजोबा करु शकत न्हवते. त्यात मोठे मामा अतिशय गरम
स्वभावाचे. त्यांचा वडिलांनी आईला मदत कारणे त्यांना आवडत नसावे तसेच ते दारूच्या आहारी गेलेले
होते.रोज दारू व गांजा पिऊन गावात दहशत निर्माण करीत होते. ते शेती किवा त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात
कधीच रमले नाहीत. ४ थी पर्यंत शिकलेले, संस्कृ तचे चांगले ज्ञान, गावात दरवर्षी राम मंदिरात पोथी वाचन
करीत असत अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. अनेकांचे लग्न अष्टगंध वाचून त्यांनी लावले. दारू प्यायचे मात्र
मटण मच्छीला कधीही शिवले नाहीत. शेती राखण चे काम करीत असत. गावात त्यांची दहशत होती. घरात
बायकोशी तसेच आईशी भांडण करीत असत. तसेच दशरथ मामा सुद्धा आमच्यापासून अलिप्त राहत. सर्वात
लहान मामा दौलत गुरुजी यांचे आईशी फारच जिव्हाळ्याचे नाते होते . ते आम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा
प्रयत्न करीत असत. मात्र नोकरी निमित्त ते जास्त काळ बाहेर गावीच राहत होते.

साधारण १९६९ साली सतत पडणारा दुष्काळ व मोलमजुरी मिळत नसल्याने काम धंदा मिळत नसल्याने
संपूर्ण कु टुंबावर उपासमारीची वेळ आली होतो तसेच मोठे मामा यांचा त्रास खूपच वाढल्यान गाव सोडून जावे
लागले. आम्ही मोठी मावशी राहत असलेल्या शेलवड या गावी राहायला गेलो. मावशीचा मोठा वाडा
होता,शेती होती. मावशी व त्यांचे भाऊबंद यांचा शेलवड गावात चांगलाच दबदबा होता. मावसा कृ ष्णा पारधी
हे नाना प्पात्लाचे जवळचे सहकारी होते. त्या गावात मोलमजुरी करून काही दिवस काढले. एक दिवस माझे
वडील व मोठे भाऊ हरचंद हे वाघारीला आमचे राहिलेले समान आणण्यासाठी गेले असता नारायण मामला
कळताच दारूच्या नशेत (बल्लम) भाला घेऊन वडिलांना मारायला धावले माझे वडील घरात दरवाजा बंद
करून घरात बसले होते. माझे मामा बाहेरून दरवाजाला भाला टोचत होते. तेव्हा भाकरीसाठी भिजवलेले
ओले पिठ तसेच घेऊन माझ्या वडिलांनी व भावाने तेथून पळ काढून आपला जीव वाचवला होता. आम्ही सर्व
भावंडानी शिक्षण घेणे हे आमचे मोठे मामा यांना पसंत नव्हते. ते आमच्या आईला नेहमी म्हणत असत की,
येने, तु तुझ्या मुलांना कशाला शाळा शिकवतेस ? सर्वांना घरी बसव. कामाला पाठव रोज दोन चौथे ज्वारी
मिळेल पोटाला पोटभरुन खाशील. तुझी मुल शिकु न काय करणार ? माझा मुलगा राम्या शिकू न कलेक्टर होईल
असे दारुच्या नशेन बडबडत असत व ऐन के न कारणावरून भांडण करीत असत कालांतराने शेलवडला सुद्धा
आमच्या घराचा जम बसला नाही. तेथे जेमतेम एखादे वर्ष काढल्यानंतर त्या गावातील काही कु टुंब काम
धंद्याच्या शोधात स्थलांतर करत होती. त्यांच्या बरोबरीने आमच्या आईवडीलांनी सुद्धा स्थलांतरीत होण्याचे
ठरवले. शेलवडहनू भुसावळ रेल्वे स्टेशन गाठले. आमचे आजोबा, आईचे वडील आम्हाला निरोप द्यायला
हजर होते. आम्ही निघालो तेव्हा आजोबा बंडुबुवा भावनावश होऊन रडत होते. भुसावळहून एका
ठेके दाराबरोबर इटारशीला साधारण ४० ते ५० कु टुंबे गेली. इटारशीला काही दिवस काम के ल्यानंतर भोपाळला
काम मिळाले. तेथे एका ठेके दाराने आम्हाला कामासाठी करारबद्ध के ले. दोन बस मध्ये बसवून भोपाळ, झासी,
पठाणकोट उद्धमपुमर असे अनेक शहर पादांकीत करीत प्रवास चालूच होता. मध्येच थांबायचे, जेवण बनवायचे.
जेवण झाले की प्रवास करायचा असे करीत करीत शेवटी जम्मू काश्मिर आले. उध्दमपूर भारत – पाकिस्तान
सिमा रेषेलगत मिलिटरी कॅ म्प साठी, जागा सपाट करून डांबरीकारण करण्याचे काम करण्यासाठी मजूर म्हणून
आम्हाला ठेके दाराने फसवून नेले होते. त्यांना मजूर मिळाले म्हणून त्याने पेढे वाटले होते. आम्ही मात्र आपल्या
नातेवाईक व गावापासून हजारो मैल दूर गेलो होतो. सर्वाच नाजूर कु टुंब अशिक्षीत होते. वर्षभर जम्मू –
काश्मिरला राहिलो परंतु काश्मिरच महत्त्व माहित न्हवत. ठेके दार आमच्या आईला सांगायचा, येनावाई , तुम्हारे
बच्चे को मिलीटरी स्कु ल में भर्ती कर देता हूँ । परंतु माझी आई म्हणत असे, नाही रे बाबा, गावचे लोक,
नातेवाईक म्हणतील की , मी मुलं विकू न टाकलीत! चार सहा महिने काम के ल्यानंतर सर्व लोक कं टाळले.
गावची आस सर्वांनाच लागली होती. ठेके दाराकडून घेतलेले आगाऊ पैसे फिटत नाही म्हणून सर्वांनी रात्री पळून
जायचे ठरवले. सर्व प्लॅन ठरविण्यात आला सामान सुमान बांधून, गाठोडे डोक्यावर घेऊन रात्री पळ काढला.
रेल्वे स्टेशन गाठले उद्धमपूर स्टेशनवरुन रेल्वेने बिना तिकीट रेल्वे प्रवास करून जालिंदरला आलो. सकाळी
ठेके दार विमानाने आमच्या पुढे येवून आम्हा सर्वांना पकडले. पोलीस स्टेशनला नेले. पोलीसांनी सांगितले की,
ठेके दाराकडून आगाऊ घेतलेले पैसे परत करा नाहीतर ठेके दाराचे काम पूर्ण करा. तेव्हाच तुम्ही तुमच्या गावाला
परत जावू शकता. शेवटी सर्वानी नाईलाजाने परत कामावर जाण्याचा निर्णय घेतला व ठेके दाराबरोबर परत
कामाच्या ठिकाणी गेलो. ठेके दाराचे घेतलेले पैसे परत फे ड होईपर्यत काम करण्याचे नाईलाजाने सर्वांनीच
ठरवले. त्यानुसार भारत पाक सिमेवर तंबूत राहून काम करण्याचे सर्वांनी सुरु के ले. मिलीटरी कॅ म्प मधील जवान
वर्षानुवर्ष घरी जात नसल्याने त्यांना आम्ही मुले दिसले की ते, कौतुकाने आम्हाला जवळ घेत असत. नदीवर जर
भेटलो तर आम्हाला अंघोळीचे साबण देत असत. तर कधी कधी आमची अंघोळसुद्धा करुन देत असत. तसेच
डोक्याला सरसोंका तेल लावून देत असत. आमच्या वस्तीच्या शेजारी एक पूल होता. त्या पुलाखाली
मिलीटरीचे काही जवान रास्त घालीत असत. एक नारायण नावाचा जवान मराठी बोलत असे. तो महाराष्ट्रीयन
असावा तो नेहमी आमच्या वस्तीवर यायचा व कधी कधी आमच्या लोकांकडून साडी घेऊन जात असे. साडी
नेसून गस्त घालीत असे. कु ण्या सैनिकाने जर त्याला स्त्री समजून अति प्रसंग करण्याचा प्रयत्न के ल्यास तो त्याला
पकडून त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यासमोर उभा करीत असे व त्यांच्या नियमानुसार त्याला कठोर शिक्षा सुद्धा होत
होती. आम्ही राहत होतो तेथे नागरी वस्ती फारच कमी होती. एकदा आम्हाला एका माणसाने त्याच्या घरी
जेवायला बोलावले होते. त्याला त्याच्या घरी धार्मिक विधी निमित्त काही मुलांना जेवण द्यायचे होते. म्हणून
आम्हाला जेवायला बोलावले होते. आम्ही मुले त्याच्याकडे जेवायला जायला खूपच घाबरत होतो व अनेक
शंका कु शंका काढीत होतो. त्याने आम्हाला जेवणात विष दिले तर ? अशी शंका मनात येत होती. त्यांच्या
खूपच आग्रहखातर आम्ही मुल त्यांच्याकडे जेवायला गेलो. जेवणात खिर होती. जेवताना खिरमध्ये पिठीसाखर
वरून टाकली. तेव्हा आम्हाला वाटले की, जेवणात विषच टाकले कारण आम्ही तोपर्यंत पिठीसाखरच पाहिलेले
नव्हती. भित भित जेवायला सुरुवात के ली आणि कसे बसे जेवण आटोपले व आमची वस्ती गाठली. घरी
आल्यावर गाढ झोपी गेलो. रात्री आई अधून मधून उठून आमचा श्वास चालू आहे किं वा नाही हे बघत होती.
सकाळी उठल्यावर नेहमी प्रमाणे लाऊड स्पीकरवर मोठ्या आवाजात या........ हयू......... कोई मुझे जंगली कहे
। हे कहे। गाण ऐकायला मिळाले व आम्ही सर्व मुले जिवंत असल्याची खात्री पटली. खरोखरच जीवनात असे
भोजन पूर्वी कधीच मिळाले नव्हते. आता आम्ही बरेच स्थिरावलो होतो. रोज नदीवर जाणे, मासे पकडण, आंबा
गोळा करणे,आंघोळी करणे, मिलीटरी कॅ म्पकडे जाणे, मिलीटरी कँ टीनमधून उरलेले जेवण फे कू न न देता रोज
आम्हाला मिळत असे. मिलीटरी कँ टीनचे जेवण फारच चांगले असायचे तुपात तळलेल्या पुऱ्या, भाज्यासुद्धा
स्वादिष्ट असायच्या. ते जेवण मिळाल्यावर सर्व जण त्यावर तुटून पडायचे. ठेके दाराचे काम पूर्ण होण्याच्या
मार्गावर असताना दुसऱ्या कामासाठी करारबद्ध करण्यासाठी ठेके दार विचारत असे परंतु सहा महिने वर्षा
अगोदरच्या कामात कसे निघून गेले कळले सुद्धा नाही. सर्वांना घरची व गावाची ओढ लागली होती. म्हणून
सर्वांनीच पुढील कामाबाबत नकारच दिला. ठेके दाराचे काम पूर्ण झाल्यावर हिसाब करुन उरलेले पैसे सर्वांनी
आपापल्या गावाकडे निघणेच पसंत के ले. पैसे असूनही काही लोक रेल्वेत विनातिकीट बसले होते. झासी
स्टेशनला गाडी चेक झाली व विनातिकीट असलेल्याना टी.सी ने चांगलेच बदडले व खाली उतरुन दिले
आमच्या आई वडीलांनी तिकिटे काढली होती मात्र मुलांचे तिकिट काढले नव्हते. त्याकडे टी. सी ने दुर्लक्ष के ले.
एका वर्षानंतर आम्ही आमच्या मुळ गावी वाघारीला राहायला आलो. आम्ही गावी आल्यावर आम्ही होतो
त्याच ठिकाणी असलेला पूल बॉम्बने उडवण्यात आला. १९७१ चे भारत पाक युद्ध सुरु झाले होते. गावी
आल्यावर मोठे भाऊ यशवंत हे शेंदुर्णीला तर हरचंद व हिरचंद हे जामनेरला वसतीगृहात राहून पुढील शिक्षण
घेऊ लागले. मी आई वडीलांबरोबर परत मोलमजूरी करु लागलो व अधून मधून शाळेत जावू लागलो. शेंदूर्णीला
मोठे भाऊ यांच्या बरोबर मोठ्या मामाचा मुलगा रामकृ ष्णा हा सुद्धा शिक्षण घेत होता. रामकृ ष्ण हा माझा
बालपणीचा सर्वात प्रिय व जवळचा मित्र. तो शिक्षण घेत असतानासुद्धा गावी यायचा तेवढाच आमच्या
सहवासात असायचा. त्या सुट्टीच्या काळात आम्ही खूप खेळायचो राम लक्ष्मण बनून धनुष्य बाण घेऊन
खखेळायचो. जामनेरला वसतीगृहात राहत असताना एकदा वसतीगृह सुपरीटेंडने माझ्या मोठ्या भावाला हरचंद
ह्याला वसतीगृहातून बाहेर काढून टाकले होते. वडीलांनी संस्था संचालक आचार्य गजाननराव गरुड, शेदूर्णी
यांना भेटून विनवणी के ली. परंतु त्यांनीही जामनेरला वसतीगृहात प्रवेश नाकारला. तेव्हाच न्यु इंग्लिश स्कु ल,
जामनेर या हायस्कु लचे उपमुख्याध्यापक श्री. एन. टी. दालवाला सर यांनी माझ्या भावाला अधून मधून सुट्टीच्या
दिवशी त्यांच्या घरी बोलावून त्यांच्या घरचे काम करुन घेत असत. भाड्याने खोली घेऊन तालुक्याच्या ठिकाणी
राहून शिक्षण घेणे आमच्या आवाक्या बाहेरचे होते. तालुक्यातील बरेच मुले भाड्याने खोली घेऊन राहत होती.
अशाच एका मुलाच्या खोलीत माझा भाऊ पार्टनर म्हणून राहू लागला. हाताने स्वयंपाक करून शाळा शिकू
लागला. एकदा मी माझ्या गावाहून ज्वारीचे पिठ घेऊन जामनेरला पायीच जायला निघालो. रस्त्याने घाट व
घनदाट जंगल लागले. त्या जंगलातून (बीडातून) रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठी वानर बसलेली बघून मी
भयभित झालो. वानराच्या अनेक गोष्टी गावात ऐकलेल्या होत्या. आता हे वानर माझ्या कडील पिठाची पिशवी
हिसकावून c घेणार व मला गुदगुल्या करुन मारझोड करणार या भितीने मी जोराने रडू लागलो व जामनेरच्या
दिशेने धावू लागलो. रस्त्याने कोणीही दूर दूरपर्यंत दिसत नव्हते. तेवढ्यात अचानक आमच्या गावाकडुन एक
सायकलस्वार माझ्या जवळ येवून थांबला व त्याने माझी विचारपूस के ली. मी त्याला ओळखले तो आमच्या
गाव तलाच सुधाकर दामू महाले नावाचा तरूण होता. तो गावातून मटका बिट घेऊन जामनेरला रोज जात असे.
त्यांनी मला सायकलवर बसण्यास सांगितले. मी पिठाच्या पिशवीसह त्याच्या सायकलवर बसलो. मनातील
भिती कमी झाली. सायकल भरघाव वेगाने जामनेरच्या दिशेने धावू लागली. साईकलच्या वेगाने मला भिती वाटू
लागली कारण मी सायकलवर पहिल्यांदाच बसलो होतो. जामनेर के व्हा आले ते कळलेच नाही. जामनेरला
आल्यावर शाळेत भावाचा शोध घेऊन पिठाची पिशवी त्याच्या स्वाधीन के ली. व झालेला प्रकार भावाला
सांगितला. घरी परत जाताना मी एस.टी बसने गेलो. कालांतराने खोलीवरून राहणे परवडत नसल्याने भावाने श्री.
दालवाला सरांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा दालवाला सरांनी भावाला सांगितले, कशाला खोली घेऊन
राहतोस, माझ्या घरी येवून रहा, जा तुझी पेटी सामान घेऊन माझ्या घरीच रहा तेव्हा पासून माझ्या भावाने
दालवाला सरांच्या घरीच रहायला सुरुवात के ली. दालवाला सरांना एक मुलगा संजिव व दोन मुली संध्या व
सुरेखा नावाच्या. माझा भाऊ त्यांच्या घरी राहून त्यांच्या घरातील सर्व घरकाम करून शिक्षण घेऊ लागला.
दालवाला सर हे देवमाणूस होते. त्यांची पत्नी स्वभावाने जरा खडूसच होत्या. तरीही माझ्या भावाने कधीही
कोणतीच तक्रार येऊ दिली नाही. सांगाल ते काम करुन ह्याला ते जेवण द्यायचे.अल्प काळातच माझा भाऊ
हरचंद हा दालवाला सरांच्या घरच्या सर्व सभासदांचा अतिशय आवडता झाला व जणू काही त्यांच्या घराचा
एक सदस्यच झाल्यासारखा त्यांच्याकडे राहू लागला व पुढील शिक्षण एक लागला. मोठे भाऊ यशवंत हे
शेंदूर्णीला वसतीगृहात राहून शिक्षण घेत होते रत तीन नंबरचा भाऊ हिराचंद हा जामनेरला वसतीगृहात राहून
शिक्षण रामकृ ष्ण घेत होता. तसेच रामकृ ष्ण माझा मामेभाऊ हा सुद्धा शेंदुर्णीला वसतीगृहात राहून शिक्षण घेत
होता. त्या काळात मी आमच्य गावात शाळेत न जाता आई वडीलांबरोबर काम / मोलमजूरी करणेच पसंत
करीत होतो. अधूम मधून आई म्हणायची की, तू पण जामनेरला जाऊन पुढील शिक्षण घे, मी तुझे नाव जामनेरला
हायस्कु लमध्ये टाकते, तेव्हा वडील म्हणत असत की जाऊ दे. कशाला शाळेत टाकते, शाळा शिकू न कोणता
कलेक्टर होणार आहे ? आणि मी आईला सांगत होतो. तू जर मला जामनेरला शाळेत टाकले तर, मी कु ठेही
पळून जाईन परंतू शाळा शिकणार नाही. घरची हालाकीची परिस्थिती पाहून माझ शिक्षणावरुन मनच उडाल होत.
मात्र जेव्हा माझे भाऊ सुट्टीत घरी यायचे तेव्हा मला रूद्धा मनात त्याचा हेवा वाटत असे. माझा भाऊ हिराचंद हा
अभ्यासात हुशार होता. तो जेव्हा एन.सी.सी.चे कपडे घालून गावात यायचा तेव्हा आमच्या गावातील दारूच्या
हातभट्टीवाले पळत सुटायचे, त्यांना तो पोलीसवाला वाटत असे इच्छा असूनही मी माझे शिक्षण ४ थी च्या पुढे
करु शकलो नव्हतो. मात्र आईच्या व मोठ्या भावाच्या आग्रहाखातर गावात करीत असलेली मोल मजूरी व
हातभट्टीची दारु पाळण्याचे काम बंद करून वयाच्या १५ व्या वर्षी जामनेरला न्यू इंग्लिश स्कू लमध्ये माझे भावाने
इ. ५ वी मध्ये नाव दाखल के ले व मी भाऊ हिराचंद बरोबर वसतीगृहात राहून शाळेत जाऊ लागलो. वाघारीला
राहत असताना आमच्या गावता शंकरशेट जैन यांचे किराणा दुकान होते. त्यांचे दोन नातू कचरू व राजू हे
आमचे मित्र होते. ते आम्हाला त्यांच्या आई वडीलांच्या नकळत आर्थिक मदत करीत असत. त्यांच्या किराणा
दुकानातूनच कचरू हा माझ्या हिराचंद या भावाला तर राजू हा मला किराणा सामान साखर, तेल, गुळ हे नेहमी
जास्त देत असे तर कधी कधी किराणा दुकानाच्या गल्ल्यातून पैसेसुद्धा देत असत. त्यातून आम्ही आमचे शालेय
साहित्य घेत असो.

जामनेरला माणिक बागेत आचार्य गजाननराव गरुड, शेंदूर्णी यांच्या संस्थेच्या वसतिगृहात मी व माझा
भाऊ हिराचंद राहू लागलो. माझा भाऊ अतिशय मेहनतीने अभ्यास करणारा, वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक
असल्याने वर्गातील सर्व मुल वर्गणी काढून त्याला शालेय गणवेश व शालेय साहित्य देत असत. हयात
शिक्षकांचा पुढाकार असे. वर्गातील श्रीमंतांचे मुल सुद्धा भावाला मदत करीत असत. वसतिगृहात राहत असताना
एकदा भावाची पेटी शालेय साहित्यासहीत कोणीतरी वसतिगृहातल्याच विद्यार्थ्यांनी चोरुन नेली व एका शेतात
खड्डा खोदून जाळून टाकली. तेव्हा आम्हाला भयंकर मनस्ताप झाला होता. तो मुलगा कोण होता ते आम्हाला
समजलेच नाही. तसेच एकदा वसतीगृह सुपरीनटेंडने मला एका शुल्लक कारणावरुन बेदम मारझोड के ली होती.
तेव्हा मी रात्रभर ढसाढसा रडत होतो. माझा भाऊ मला समजवत होता. मी त्याला सांगत असे की, मी शाळा
सोडून निघून जातो. परंतु भावाने मला समजावले व धीर दिला, हिम्मत दिली. त्यामुळेच मी पुन्हा शाळेत जाऊ
लागलो. नंतर वसतिगृहाच्या अधिकाऱ्याशी सुद्धा माझे चांगलेच जुळून आले. त्यांनाही नंतर पश्चाताप झाला.
वसतिगृहात अन्नधान्य व किराणा माल येत असे खाद्य तेलाचे डबे बाहेरच्या देशातील येत होते. वसतिगृहातील
काही प्रमुख विद्यार्थ्यांना वसतिगृह अधिक्षक हाताशी ठेवत असत व तेल, डाळी, गहू हे कमी वापरुन मुलांना
निकृ ष्ठ दर्जाचे जेवण देत असत. डाळाची भाजी किं वा बेसन अतिशय पातळ पाण्यासारखे करीत असत तर
डाळीच्या भाजीत डाळ शोधून सापडत नसे. मात्र वसतिगृह अधिक्षक यांचा स्वयंपाक वेगळा असायचा. त्यांच्या
जेवणात रोज भाजी, पुरी,शिरा असे पदार्थ असायचे. आमच्या जेवणातून स्वयंपाकी बायका सुद्धा घट्ट डाळ व
त्यावरील तरंग काढून घरी घेऊन जात असत. तर सिनियर व दादा मुलं सुद्धा तरंग ब घट्ट डाळीवर ताव मारत तर
काही ठराविक मुल वसतिगृह अधिक्षकाच्या सोबत त्यांचे विशेष भोजन करीत असत. वसतिगृहाच्या
तपासणीसाठी वरीष्ठ अधिकारी येत असत त्याच दिवशी आम्हाला पोटभरुन व चांगले जेवण मिळत असे सहा
महिने वर्षातच मी वसतिगृहातील परिस्थितीशी जुळवून घेतले वसतिगृह अधिक्षकाशी माझे चांगलेच सुत जुळले
होते शाळेत सुद्धा मी इ. ५ वी वर्गात १ ल्या नंबराने पास झालो. शाळेत माझ्या दोघा भावांची सुद्धा हुशार
विद्यार्थ्यामध्ये गणना होत होती. त्यांच्या व दालवाला सरांच्या आशिर्वादाने मला अल्प काळातच सर्व शिक्षक
ओळखू लागले व मदतही करु लागले. वर्गात अभ्यासात , खेळात सर्व आघाड्यांवर मी प्रथम क्रमांकाने येऊ
लागलो. वर्गातील १० ते १५ मुलांचा ताफा माझ्या आजूबाजूला राहू लागला. इकडे वसतिगृह अधिक्षक
आमच्या वसतिगृहात आलेल सामान गहू, तेल व इतर शिल्लक सामान काळ्या बाजाराने विकू न पैसे कमावत
असताना मी त्यांना रंगे हात पकडल्याने त्यांनी माझ्याशी चांगलेच जमवून घेतले. आम्ही दिवाळीच्या सट्टीत घरी
जात असत. तेव्हा वसतिगृह अधिक्षक मला वसतिगृहातून गहू, तेल वगैरे सामान घरी न्यायला देवू लागले होते.
तर वर्गातील श्रीमंतांची मुले मला सर्वतोपरी मदत करीत असत. माझ्या वर्गातील माझा मित्र विजय पुनमचंद
नाहावयाच्या वडीलांचे धान्याचे दुकान होते तर दुसरा मित्र विजय रामदास कासार हा आपल्या मामाकडे राहत
असे. त्याच्या मामाचे भांड्याचे दुकान होते. ते मला आर्थिक मदत करीत असत. गुरुवारी जामनेरचा बाजाराचा
दिवस असल्याने आमच्या गावचे बहुसंख्य लोक जामनेरच्या बाजारात येत असत. माझे दोन नंबरचे मामा
दशरथ हे लाकू ड व कोळशाचे व्यापारी असल्याने जामनेरला नेहमी त्यांचे येणे-जाणे होत असे. एकदा आम्हाला
सुट्टी लागल्याने घरी जायचे होते. एस.टी.ने गावी जाण्यासाठी दोन रुपयांची मागणी के ली. त्यासाठी दिवसभर
त्यांच्या मागे फिरलो परंतु दशरथ मामांनी दोन रुपये दिले नव्हते. त्याच काळात मित्र विजय ने मला धान्य व
आर्थिक मदत करीत असे म्हणून गुरुवारी बाजाराच्या दिवशी आई किं वा वडील जामनेरला आम्हाला भेटायला
येते होते तेव्हा मी माझ्या मित्रांकडून १० ते २० रुपये घेऊन आई वडीलांना बाजारात देत होतो. कधी कधी गहू,
ज्वारी सुद्धा देत होतो. इतर मुलांचे आई वडील भेटायला येत तेव्हा ते घरून भाकरी, चटणी, लोणचं किं वा लाडू
घेऊन येत होते. मात्र मला उलट आई वडीलांनाच आर्थिक मदत करावी लागत असे.
मी ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण वसतिगृहात राहून घेत असताना मलासुद्धा दालवाला सर त्यांच्या
घरकामासाठी घरी बोलावत असत. माझा भाऊ हरचंद हा ११ वी मॅट्रीक पास झाला होता. तर मोठे भाऊ ११ वी
मॅट्रीक नापास झाले होते. जामनेर तालुके तील फॉरेस्ट रेजेंर पदी श्री. घटी साहेब आले होते. माझे मामा व
आजोबा लाकडाचे व्यापारी असल्याने त्यांचे श्री. घटी साहेबांशी घनिष्ठ संबंध होते. त्यांचाकडे माझे दोन्ही मोठे
भाऊ रोजंदारीवर काम करू लागले होते. त्यामुळे दालवाला सरांकडे मला व माझे मोठे भाऊ हिराचंद यांना घर
कामासाठी बोलावणे असायचे. माझा मोठा भाऊ अभ्यासात हुशार होता. मात्र शारिरीक श्रम व घरकाम करणे
त्याला मुळीच पसंत नव्हते. त्यामुळे तो दालवाला सरांकडे जाण्याचे टाळत असे. मी ७ वी पास झालो, त्याच
वर्षी आम्ही शिकत होतो त्याच न्यु इंग्लिश स्कु लच्या संस्थेने मागासवर्गीय मुलांसाठी इ. ८ वी पासून वसतीगृह
सुरु के ले म्हणून मी व माझा भाऊ हिराचंद आम्ही दालवाला सरांच्या सांगण्यावरुन या वसतीगृहात प्रवेश घेतला
व वसतीगृहात राहू लागलो. त्याच काळात फारेस्ट रेजर श्री .घटी साहेब यांची बदली खांडबारा जि. धुळे येथे
झाली. त्यांचा बंगला बगीचा व हॉटेल ही संपत्ती जामनेरला होती. आमच्या गावचे एक गृहस्थ दामू महाले हे
त्यांच्याकडे मनिम म्हणून काम करत होते. मोठ्या भावाचे सासरेसुद्ध जामनेरलाच राहत होते. त्यामुळे मोठे भाऊ
सुद्धा जामनेरला राहायला आले व श्री. घटी साहेबांच्या बंगल्याच्या आऊट हाऊसमध्ये राहत होते. श्री घटी
साहेबांचा खाडवारा येथे चांगलाच जम बसला व जंगलात जुना जंगल तोडून नविन प्लांटेशन करण्याचे काम
मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्याने श्री.घटी साहेबांनी आमच्या गावाहून अनेक कु टुंब मजूर म्हणून घेऊन गेले. त्यात
आमच्या कु टुंबाचे आई वडील व मोठे भाऊ यशवंत व हरचंद यांचासुद्धा समावेश होता. आई वडीलांनी मोठे
भाऊ यशवंत यांचे लग्न उरकु न टाकले. सर्व कु टुम खांडबारा ता. अक्काकु आ जिल्हा धुळे येथे पुरुष जंगले
तोडत व बायका नर्सरीत रोजंदारीवर कामे करु लागले. मी व माझा मोठा भाऊ हिराचंद जामनेरला शिकत होतो.
नविन वसतीगृह असल्याने विद्यार्थ्याची आवश्यकता होतीच म्हणन मी माझा मामेभाऊ व माझा मित्र रामकृ ष्ण
याला शेंदूर्णीहून जामनेरला शिक्षणासाठी येण्याचा सल्ला दिला व तोही जामनेरला आमच्या वसतीगृहात पुढील
शिक्षण घेऊ लागला. त्याच काळात आमची एकु लती एक बहिण अन्नपूर्णा हिलासुद्धा शिक्षणासाठी जामनेरला
मुलीच्या वसतीगृहात टाकू न पुढील शिक्षण देण्याचा प्रयत्न के ला. त्यात फारसे यश आले नाही. आम्ही
जामनेरला शिकत असताना सुट्ट्यांमध्ये आई वडीलांकडे खांडबारा येथे जात असे. तेव्हा नर्सरीत रोजंदारीवर
काम करावे लागत असे. तेव्हा फारेस्ट खात्यामध्ये फारेस्ट गार्ड व फारेस्टरची भरती प्रक्रीया सुरु होती. श्री. घटी
साहेबांनी माझे भाऊ हरचंद याला फारेस्टरच्या भरतीसाठी पाठवले. कारण तो त्याच्या घरी कान करीत होता व
११ वी मॅट्रीक झाला होता आणि आदिवासी पारधी या मागास वर्गात मोडत असल्याने त्याची निवड करण्यात
आली. एक वर्ष फारेस्टर ट्रेनिंगला चिखलदरा येथे पाठविण्यात आले. यशस्वी प्रशिक्षणानंतर त्याची नेमणूक
खांडबारा - अक्काकु आ देथे झाली. त्याच्याच बराबरीत तेथील अनेक भिल्ल आदिवासी मुलसुद्धा भरती झाले
होते. त्यापैकी श्री. मगन वसावे हे भावाचे जवळचे मित्र आम्ही जेव्हा सुट्टीत भावाकडे जात होतो तेव्हा आमचे
एवढे मोठे कु टुंब त्यात फक्त एकच भाऊ नोकरीला बाकी मोलमजुरी/ रोजंदारीवर काम करीत असत. एकट्या
भावाच्या नोकरीवर सर्वांचा बोजा पडत असे. मुलगा नोकरीला आई वडील व वडीलभाऊ, बहिणी रोजंदारीवर
काम करीत असत. त्यामुळे घरात जरा तणावाचे वातावरण राहायचे. खांडबारा येथे राहत असताना स्व. इंदिरा
गांधी यांची सभा होती. त्या सभेला जमलेला एवढा मोठा जनसमुदाय मी आजपर्यंत पाहिलेला नाही. डोंगरावर,
झाडांवर,घरांवर, शेतात असे सर्वीकडे माणसेच माणसे दिसत होती. आम्ही लहान असल्याने व्यासपिठ दिसाव,
स्व. इंदिरा गांधी यांना पाहता याव म्हणून एकमेकांना उचलून पाहत असे.
माझ्यापेक्षा मोठा भाऊ एस एस. सी. १० वी चांगल्या मार्काने पास झाला. तेव्हा आम्ही सुट्टीत
खांडबारा येथे होतो. भावाचे मित्र मगन वसावे यांनी सल्ला दिला की याला मुंबईला पुढील शिक्षणासाठी
पाठवावे. तेथे शासकीय वसतीगृहात आमच्या समाजाचे अनेक मुले राहत असून वैद्यकीय व अभियांत्रिकी
शिक्षण घेतात व तेथे मेरिटवर नंबर लागतो. म्हणून हिराचंद भाऊ याचा मुंबईतल्या कॉलेजमध्ये व वसतीगृहात
फॉर्म भरला व त्याचा नंबर मेरिटवर कॉलेजात व वसतीगृहात लागला. त्याची डॉक्टर बनण्याची तीव्र इच्छा
असल्याने ११ श्री सायन्सला अॅडमिशन घेऊन वसतीगृहात राहून पुढील शिक्षण पेऊ लागला. तेव्हा मी
जामनेरला ८ वीत शिकत असताना वसतीगृहात राहून फावल्या वेळेत दालवाला सरांच्या घरी जाऊन त्याचे
घरचे काम करीत असो. दळण दळून आणणे, भाजीपाला बाजार आणणे, घरात झाडू मारणे, अंगणात सडा
टाकणे, फरशी पुसणे, पाणी भरणे, झाडांना पाणी घालण झाडाची मशागत करणे, अथरुण टाकणे, अंथरून गोळा
करणे वगैरे सर्व कामे करीत असो. वर्गात अभ्यासात हुशार असल्याने १०-१५ मुला-मुलींचा घोळका माझ्या
सोबत राहत असे. तसेच इ. ५ वी पासून वर्गाचा मॉनिटर मीच असायचो. श्रीमतांच्या मुलांना ट्युशन असायची.
मला अनेक शिक्षक शिकवणीसाठी घरी बोलावत असत मात्र शिकवणीच्या एक तास अगोदर बोलावून त्यांची
घरची कामं माझ्याकडून करुन घेत असत व तेव्हाच इतर मुलांबरोबरीने शिकवणीला बसवत असत. यासाठी
अनेक शिक्षकांत चढाओढ असायची, असेच मी एकदा एका शिक्षकाला घरकामासाठी नकार दिला होता तेव्हा
त्या शिक्षकाने मला वर्गात दुसऱ्या कारणाने शिक्षा के ली होती. (एक चापट मारुन) या अगोदर मला वर्गात
कधीच शिक्षा झाली नव्हती. वर्गात प्रथम येणाऱ्या मुलामध्ये सतत गणना होत होती त्याच वर्षी आमच्या वर्गात
जळगावाहून एक मुलगी शिकायला आली होती. हायस्कु लमध्ये अत्यंत सुंदर, वर्ण गोरा, घारे डोळे तीच्या
वडिलांची जामनेर तहसिलदार कचेरीत बदली झाल्याने हे कु टुंब जामनेर ला राहायला आले होते. वर्ग मॉनिटर व
अभ्यासात व खेळात, एन.सी.सी. त व इतर बाबतीत मी सतत आघाडीवर असल्याने दिसायला सर्वसाधारण व
गरीब कु टुंबाला असूनही कु ठेही कमी पडत नव्हतो. शाळेत शिक्षकात मुलां मुलींमध्ये अतिशय प्रिय कळत
नकळत जळगावहून आमच्या वर्गात शिकायला आलेल्या आहिल्या शिवनारायण जाखेटे या मुलीशी जवळीक
झाली मी एकदा शाळेत गेलो नाही. मला खूप ताप आला होता, तसा निरोप मी वर्ग शिक्षकांना पाठवला होता.
जेव्हा वर्गात माझ्या आजारपणाची चर्चा झाली तेव्हा मधल्या सुट्टीत आहिल्या तीच्या मैत्रिणीसह मला
भेटायला वसतीगृहात आली होती. आमच्या वर्गात इतर मुलीपैकी विद्या सुधाकर काठोके हि मला राखी बांधत.
असे तर पुष्पा कोठारी व अलका पाटील मुलींशी सुद्धा माझे स्नेहाचे संबंध होते. जळगावहून आलेली आहिल्या
हिचे स्थानिक मुलींशी फारसेपटत नसे. स्थानिक मुली तिचा तिरस्कार करत असत. हायस्कु लमध्ये तसे वातावरण
मुला मुलींना फारसे मोकळीक नसे म्हणून आहिल्याने तिच्या भावना मला चिट्ठी लिहून कळविल्या. तिच्या
चिठ्ठीचे उत्तर मी एका चिठ्ठीद्वारेच तिला कळवले. तिच्या दप्तरातून ती चिठ्ठी वर्गातील इतर मुला मुलींच्या हाती
लागली. वर्गातील अलका पाटील हिने ती चिठ्ठी व वर्गशिक्षकाला दिली व वर्गशिक्षकाने मुख्याध्यापकांकडे
पाठवली. त्या चिठ्ठीत पुष्पा कोठारी या मुलीचाही उल्लेख होता. मुख्याध्यापक एल.व्ही . पाटील
उपमुख्याध्यापक दालवाला सर तर हायस्कु लच्या संस्था संचालकामध्ये मारवाडी समाजाचे वर्चस्व. पुष्पा
कोठारी व आहिल्या जाखेटे ह्या दोघीही मारवाडी समाजाच्या मुली होत्या. त्यामुळे मुख्यध्यापकांवर मला
शाळेतून काढून टाकावे म्हणून दयाव होता. मला मुख्याध्यापकाच्या कॅ बिनमध्ये बोलावून विचारण्यात आले.
की ही चिठ्ठी तु लिहीली आहे का ? तेव्हा मी सांगितले की, होय परंतु आहील्यानेच मला चिठ्ठी लिहिली म्हणून
तिला बोलावून विचारण्यात आले. तेव्हा तिने काय सांगितले देव जाणे काही दिवस ती शाळेत आली नाही. तर
कळले की तिथेच शाळेतून नाव काढले व ति परत जळगावलाच शिकायला गेली मला वाटत होते की, आता
मला शाळेतून व वसतीगृहातून काढून टाकतील मी मुख्याध्यापकांना खूप विनवण्या के ल्या. माझे वडील
मुख्याध्यापकाना भेटले. खूप विनवण्या के ल्या. वडीलांनी त्यांचे पाय धरले व सांगितले की, आता ती मुलगीच
शाळा सोडून गेली आता माझ्या मुलाला शाळेतून काढू नका. मुख्याध्यापक एल. ई. पाटील सर फार चांगले होते
ते देवमाणूस होते त्यांनी मला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय बदलला व मी माझे पुढील शिक्षण सुरु के ले.
प्रेम कळण्याअगोदरच माझा प्रेमभंग झाला होता.
त्यानंतर आहिल्या मला परत कधीच भेटली नाही. मी जळगावला सुद्धा अनेक फे ऱ्या मारल्या मात्र मला कधीच
ती भेटली नाही.

इ. ९ वी मध्ये शिकत असताना सुट्टीत खांडबारा येथे आलो होतो तेव्हा मुंबईला शिकत असलेला भाऊ
हिराचंद हा सुद्धा सुट्टीत खांडबारा येथे आला होता. देवळाली नासिक येथे माझा एन. सी. सी चा कॅ म्प होता. तो
कॅ म्प नुकताच संपला होता. म्हणून माझ्या भावाने मला मुंबईला मुंबई बघायला म्हणून त्याच्या सोबत आणले
होते. खांडबारा नंदुरबार मुंबई व्हाया सुरत असा प्रवास करून मुंबईला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी बेस्ट बसने
मुंबई शहरातील प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी भावाबरोबर बाहेर पडलो. बसमधूनच मुंबईची माहिती सांगत भाऊ
मला मुंबईदर्शन घडवत होता. मला मात्र त्याच फारस आकर्षण नव्हतं. भाऊ मोठ्या हौसेने मला मुंबईतील
प्रक्षणीय स्थळांबद्दल माहिती सांगत असत तर त्याच वेळी मी बसमध्ये शेजारच्या सीटवर बसलेल्याच्या
खांद्यावर] डोके ठेवून झोपून जात असे. हे बघून माझा भाऊ माझ्यावर खूप संतप्त होत असे. मुंबईत काय काय
पाहिले त्याची यादी भावाने करून दिली. ती आजही माझ्याजवळ आहे. मला मुंबईला आणून मुंबई व मुंबईतील
शिक्षण राहणीमान वसतीगृह वगैरे वधून मी १०वीला चांगला अभ्यास करून चांगल्या मार्काने पास व्हावे व
पुढील शिक्षणासाठी मी सुद्धा मुंबईला यावे अशा उद्देशाने भावाने मला मुंबईला नेले होते.

मुंबईहून परत आल्यावर मी ९ वी व १० वीत खूप अभ्यास के ला. हरचंद भाऊ यांचे फारेस्टरचे
प्रशिक्षण संपले होते. ते नोकरीवर हजर झाले होते. तेव्हा त्यांच्या लग्नाची तयारीत घरचे लोक होते. नोकरीला
असल्यामुळे अनेक स्थळ त्याला येत होती हरचंद भाऊ स्वभावाने जरा चंचल होते. उंच, वर्ण, गोरा, अतिशय
देखणा असल्याने समाजात व समाज बाहेरील सुद्धा स्थळ येत होती. त्यातच 'काळखेडा’ येथील दलापात माळे
यांची उषा नावाची मुलगी पसंत पडली. लग्नाची तयारी करीत असताना गावातच मामांना प्रत्येकी तीन चार मुली
होत्या. त्यांची अपेक्षा होती की, बहिणीने तिच्या एखाद्या मुलीचे तरी आमच्या मुलीशी लग्न करावे. याच
भावनेतून सर्वात लहान मामा दौलत गुरुजी यांची मोठी मुलगी रजनी हिचे लग्न मुंबईला शिकत असलेल्या
माझ्या हिराचंद नावाच्या भावाबरोबर करण्याचे ठरले. त्याला भावाची समती भावनिकरित्या मिळवली व दोन्ही
भावाचे लग्न एका दिवसाआड करण्याचे ठरवून दोघांचे लग्न अनुक्रमे वाघारी काळखेडे येथे पार पडले.
कालांतराने दौलत मामांनी मुलगा होत नसल्याने पहिल्या पत्नीपासून पाच मुली असूनही दुसरे लग्न के ले. सावत्र
आई घरात आली. पहिल्या पत्नीला घराबाहेर काढल्यामुळे लग्न झालेल्या मोठ्या मुलीला आमच्या आई
वडीलांनी सांभाळणे भाग पडले. भाऊ मुंबईला पुढील शिक्षण घेत होता. आई वडील काही दिवस वाघारीला
राहत असत तर काही दिवस नोकरीवाले भाऊ हरचंद याच्याकडे राहत होते. एकदा खांडबारा येथून हरचंद
भाऊकडे सुट्टीत राहून जामनेरला यायला निघालो. तेव्हा त्यांनी मला नविन कपडे घेऊन देण्यासाठी दुकानात
नेले. तेव्हा निळ रंगाचा पेंटपिस मला आवडला परंतु तो खूप महाग होता. तोच पेंटपिस घेऊन द्यावा असा मी हट्ट
धरला तेव्हा हरचंद भाऊने तोच पेंटपिस व शर्टपिस असा मला नविन ड्रेस घेऊन दिला. तो माझ्या जीवनातील
पहिला नविन फु ल ड्रेस होता. त्या अगोदर फक्त शाळेचा गणवेश हेच कपडे असायचे तर दालवाला सरांचा
मुलगा संजिव याचे जुने कपडे वापरत असो. खांडबारा येथून वाघारीला आई वडीलांकडे बसने यायला निघालो
तेव्हा हरचंद भाऊने माझ्यासोबत १ पोते गहू व तेलाचे दोन डबे आई वडीलांसाठी दिले होते. त्यांच्या
खात्यातील मजुरांना मजूरीसह धान्य व गोडेतेल जागतिक योजनेतून मिळत असे. ते गहू व एका पिशवीत
गोडेतेल व नविन टॉवेल व इतर कपडे असे एस. टी बसने खांडबारा येथून धुळे बसने धुळे येथे आलो व
धुळ्याहून बस बदलून जळगाव व बसने जळगाव किं वा जामनेरला यायचे होते. माझे सामान धुळे एस.टी. स्टैंड
मध्ये ठेवले व बस बघायला बाजूला गेलो तेवढ्यात माझी पिशवी चोरीला गेली. त्यात दोन तेलाचे डबे व टॉवेल
व इतर कपडे होते. धुळे एस. टी. स्टैंडवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांना सांगितले त्यांनी माझी तक्रार तर घेतली
नाहीच उलट सर्व प्रकार हसण्यावारी घालवला. एका हमालाने मला सांगितले की, तुमची पिशवी पोलिसांनीच
घेतली आहे. मग दाद तरी कोणाकडे मागायची ? म्हणून जळगाव बस लागताच, मी गव्हाच्या पोत्यासह तेथून
निघालो व जामनेरला आलो. जामनेरहून वाघारीला गेलो व झाला प्रकार
आई वडीलांना सांगितला व सुट्टी संपल्याने जामनेरला वसतीगृहात राहून १० वी ची वर्ष असल्याने खूप अभ्यास
करू लागलो. वसतीगृहात राहत असल्याने अधूनमधून मुलांबरोबर सिनेमा बघायला सुद्धा जात होतो.
अभ्यासाच्या अनेक उजळण्या झाल्या होत्या. १० वीच्या परिक्षेला बसलो मार्च १९८१ मध्ये निकाल लागला.
एस. एस. सी परिक्षा ६१.२७ टक्के मार्क मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो.

मार्च १९८१ मध्ये एस. एस. सी चा निकाल आई वडील व मुंबईला शिकत असलेल्या हिराचंद
भावाला कळविला त्याने सुट्टीत मुंबई मधील गौतम वसतीगृह, गोरेगाव मुंबई येथून अॅडमिशन फार्म तसेच
मुंबईतील सर्व पॉलिटेक्निक कॉलेजेस व पोदार मेडिकल कॉलेज प्रवेश फार्म आणले. सर्व कर्म व्यवस्थित भरुन
कॉलेज सबमिट के ले. मेरिटनुसार वसतीगृह व सर्वच पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अनुसूचित जमती एस.टी
के टेगरित नंबर लागला तसेच पोदार मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा बी. ए. एम. एस साठी नंबर लागला
होता.हिराचंद भावाला १२० सायन्स नंतर एम.बी.बी.एस. करुन डॉक्टर व्हायचे होते. मी अभियांत्रिकी पदविका
करून इंजिनियर व्हावे असा विचार के ला. बी.ए.एम.एस. कोर्स १० वी नंतर ७ वर्षांचा होतर तर VJTI
पॉलिटेक्निक कॉलेजला १० वी नंतर पदविका चार वर्षांचा कोर्स होता. म्हणून मी सोमय्या प्रथम सत्र तीन वर्षांचा
यांत्रीका पदविका कोर्सला प्रवेश घेतला व गौतम वसतीगृह गोरेगाव, मुंबई येथे वसतिगृहात प्रवेश घेवून शिक्षण
सुरु के ले हिराचंद भाऊ १२ वी सायन्सला असल्याने खूर अभ्यास करीत होते. तर मी एस. एस.सी मराठी
माध्यमातून शिकलो असल्याने सुरवातीचे दोन तीन
महिने कॉलेजातून काय शिकवतात तेच कळत नव्हते. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. माझ्या वयाचे माझे
सर्व मित्र लग्न करुन गावाला संसारात मग्न झाले होते. मुंबईचा झगमगाट कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमातून
शिकवला जाणारा अभ्यासक्रम हे सर्व डोक्यावरुन जात होते. प्रथमसत्र संपले परिक्षा जवळ आली. कॉलेज
नविन असल्याने फारसे मित्र वगैरे नाही फक्त आमच्या तालुक्यातील राजेंद्र पाटील आमच्या जामनेर हायस्कु लचे
हेड मास्तर श्री. एल.ई. पाटील यांचा मुलगा व रेल्वे स्टेशनमास्टर श्री. परदेशी यांचा मुलगा हे दोघ VJTI
कॉलेजला अभियांत्रिकी पदवी चे शिक्षण घेत होते तर जामनेर तालुक्यातील कै लास दशरथ पाटील हा माझ्या
वर्गात होता. प्रथम वर्ष के व्हा संपला कळलच नाही परिक्षा आली. निकाल लागला. मला ATKT मिळाली तर
माझा भाऊ हिराचंद हा १२ वी सायन्सला दोन विषयात नापास झाल्यामुळे

पुढील वर्षी दोघांनी गॅप सर्टीफिके ट जोडून वरळीला सन एकनाथ वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज के ला.
तर शासकीय अभियात्रिकी कॉलेज, मुंबई येथे मी अर्ज के ला व मला प्रथम वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी
पदविके ला प्रवेश मिळाला. हिराचंद भावाने सुद्धा M.B.B.S. होण्याचे स्वप्न सोडून परिस्थीतीशी जुळवून १२
वी नापास झाल्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी पदविका कोर्स शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, मुंबई येथे प्रवेश
घेतला होता व दोघ भाऊ संत एकनाथ शासकीय वसतीगृह वरळी, मुंबई येथे राहून पुढील शिक्षण घेऊ लागलो.
शासकीय वसतीगृहात राहण्याची व जेवणाची उत्तम सोय होती. वसतीगृहात वैद्यकीय व अभियांत्रिकी तसेच जे
जे स्कू ल ऑफ आर्टचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर राहत होते. वसतीगृहातून शालेय साहित्य कॉलेज
प्रिन्सिपालकडून मंजूर करुन आणलेल्या यादीप्रमाणे सर्व मिळत असे. सर्व साहित्य मिळण्यासाठी
वसतीगृहामार्फ त दुकानदारांना ठेका दिलेला असायचा. त्याप्रमाणे शालेय साहित्य मिळत असे तसेच खेळाचे
साहित्य सुद्धा मिळत असे चेंबूरच्या नावाने एक मुलांचे वसतीगृह वरळीलाच मुलीच्या बसतीगृहाच्या
तळमजल्याला सरु करण्यात आले तेव्हा त्या नविन वसतीगृहात मी प्रवेश घेतला. वसतीगृहाचा सर्व कारभारच
नविन होता. वसतीगृहाचे वार्डन श्री. कदम हे सुद्धा नविनच होते त्यामुळे वसतीगृहाचा कारभार सांभाळण्यास सी
वार्डनला मदत करु लागलो. त्यामुळे त्यांचे व माझे मैत्रीचे नाते झाले. त्याच वेळेला समाजकल्याण विभागीय
कार्यालय, मुंबई येथे श्री. एन जे सदावर्ते हे वसतीगृह निरिक्षक म्हणून नियुक्तीवर आले व आमच्या
वसतीगृहाच्या शेजारील बी.डी.डी. चाळ क ११७ मध्ये राहायला आले. ह्या इमारतीत सर्व शासकीय कर्मचारी
समाज कल्याण खात्यातील राहत होते तर बी.डी.डी. चाळ क्र. ११८ मध्ये संत एकनाथ वसतीगृह तर बी डी डी
चाळ क्र ११६ मध्ये संत मिराबाई शासकीय मुलांचे वसतीगृह तर तळमजल्याला शासकीय मुलाचे वसतीगृह
चेंबुर हे होते. हे सर्व वसतीगृह मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासनाच्या समाज कल्याण विभाग मुंबई मार्फ त
चालवली जात होती. वसतीगृहात सिनीयर मुलांचीच चालायची त्यानुसार वार्डन नंतर सर्व सुत्र माझ्याकडे आले
होते. वसतीगृह निरीक्षक श्री. सदावर्ते यांच्याशी माझे घरोब्याचे संबंध होते ते मला लहान भाऊच मानत असत.
त्यांची पत्नी मला बाबाजी म्हणून हाक मारत असे. श्री सदावर्ते दारुच्या आहारी गेले होते. त्यांच्या लग्नाला
बरीच वर्षे झाली होती. मात्र त्यांना मुलबाळ होत नव्हतं. श्री. सदावर्ते यांनीच माझं नाव मुंबई समाजकल्याण
एम्प्लाय्मेंट मध्ये एस. एस.सी वर नोंदवले होते. हे कार्यालय त्यांचाच आफीस आगारात होते. त्यांना आमच्या
घरच्या परिस्थितीची जाणीव होती. म्हणून आम्ही भावांनी झटपट नोकरीला लागाव अस त्यांना वाटत असे. या
भावनेतूनच त्यांनी माझं एम्प्लायमेंट कार्ड काढून ठेवलं होतं. याच काळात आमच्या एकु लती एक बहिण
अन्नपूर्णा हिच्या लग्नासाठी स्थळे शोधने सुरु होते. तोरखेडा ता. शहादा येथे राहणारे श्री. रामा चव्हाण यांचा
मुलगा नंदूरबारला ITI मध्ये फिटर चे शिक्षण घेवून अॅप्रेन्टीसशिप करीत होता. त्यांच्याशी बहिणीच लग्न
करण्याचे ठरविण्यात आले. आई- वडीलांना लग्नाच्या खर्चाची काळजी वाटत होती. नोकरीला असलेल्या
भावाने धान्य व बाजार करुन दिला. बाकी सर्व खर्च करणे बाकी होते. माझ्या मनात एक कल्पना आली.
कॉलेजमधील इतर मुलांप्रमाणे प्रिन्सीपलकडून शालेय साहित्याची लिस्ट मंजूर करुन आणली. वार्डन कडून
ऑर्डर घेऊन कॉन्ट्रॅक्टरकडून साहित्य घेतले व शेजारील दुकानात विकू न मिळालेले पैसे घेऊन बहिणीच्या
लग्नाला गेलो. चार ते पाच हजार रुपायात १५ हजार रुपयाचे शालेय साहित्य विकू न हे सर्व पैसे बहिणीच्या
लग्नाला वापरले. इतर विद्यार्थी अशाप्रकारे पैसे मिळवून मौजमजा करीत असत. तरीही मी चुकीचे काम
के ल्याची खंत माझ्या मनात कायमच राहीली. बहिणीच्या लग्नानंतर भाऊजीना कामधंदा / नोकरी नसल्याने
त्यांनाही मुंबईला बोलावून घेतले वसतीगृहात पॅरासाईड ठेवन त्यांना नोकरी शोधने सुरु के ले. सार्वजनिक
बांधकाम खात्यात नोकरभरती होती.भाऊजी एम्प्लायमेंट मधून कॉल काढला जोडोरीची एक जागा होती. बरेच
मूल मुलाखतीसाठी आलेली होती. कार्यकारी अभियंता श्री. भडांगे होते. मी त्यांना मुलाखतीपूर्वी भेटून घरची
परिस्थीती सांगितली.भाऊजींची निवड करण्याबाबत विनंती के ली. त्यानुसार त्यांनी भाऊजींची निवड के ली
भाऊजींना नोकरीची ऑर्डर मिळाल्यानंतर आमच्या सर्व कु टुंबाला फार आनंद झाला. मी भडांगे साहेबांना
पावकीलो पेढे देऊन त्याचे आभार मानले. भाऊजींना वरळी जांबोरी मैदान येथेच नियुक्ती मिळाली होती.
मी स्थापत्य अभियांत्रिकी कॉलेज, मुंबई मध्ये प्रथम व द्वितीय सत्र पास झालो होतो तर हिराचंद भाऊ
स्थापत्य अभियांत्रिकी पदविके च्या शेवटच्या सेमिस्टरला शिकत होता. तेव्हा मला समाज कल्याण एम्प्लोयमेंट
मुंबई येथून महाराष्ट्रराज्य विद्युत मंडळात निम्नस्तर लिपीक पदासाठी लेखी परिक्षेचा कॉल आला श्री. सदावर्ते
दादां यांना विचारून लेखी परिक्षेला बसलो त्यात पास झाल्याने परत तोंडी परिक्षेचा कॉल आला तोंडी मुलाखत
झाल्यानंतर श्री. सदावर्ते दादा यांच्या ओळखीचे मंत्रालयातील कक्ष अधिकारी श्री. प्रितम आठवले यांना भेटलो.
एक दोन आठवड्यातच मला तीन महिने तात्पूर्ती नियुक्तीची आर्डर आली. त्यात निम्नस्तर लिपीक पदाचे मूळ
वेतन ४१५ रुपये होते तर स्थापत्य अभियांत्रिकी पदविका पूर्ण के ल्यावर कनिष्ठ अभियंता पदाचे मुळ वेतन ४२५
रुपये होते. त्यातच मला दिड ते दोन महिने सुट्टी होती. त्यामुळे हिराचंद भाऊ व सदावर्ते दादा यांच्याशी विचार
विनिमय करून MSEB मध्ये निम्नस्तर लिपीक पदी हजर झालो सुरुवातीला एक - दोन महिने नोकरी करून
कॉलेज जॉईन करूया असा विचार के ला होता.तसा सल्ला हिराचंद भाऊ,
सदावर्ते दादा व डॉ. मोहनदादा व डॉ. गुलाबदादा यांनी सुद्धा दिला होता. डॉ मोहन जाधव व डॉ. गुलाब सोनवणे
हे MBBS चे विद्यार्थी हिराचंद भाऊचे खास मित्र होते. कालांतराने ते माझेही मित्र झाले. आम्ही त्यांना दादा
म्हणत असो. वसतीगृहात राहून मी व भाऊजी नोकरी करीत होतो. माझे कॉलेजला अॅडमिशन होतेच. त्यामुळे
मी अधून मधून कॉलेजला जात होतो १४ ऑगष्ट १९८४ साली मी MSEB मध्ये निम्नस्तर लिपीक पदी हजर
झालो व मला MSEB भविष्य निर्वाह निधी विभाग धारावी. मुंबई येथे नेमणूक मिळाली होती सुरुवातीचे एक
वर्ष कधी कॉलेज तर कधी ऑफीस असे करून पाहिले परंतु कार्यालयीन कामकाजात कॉलेजला जाणे कठीण
झाले. तीन महिन्यानंतर परत तीन महिने व परत तीन महिने असे नोकरीला एक्स्टेंशन मिळत गेले व मी नोकरी
किं वा कॉलेज कराव या द्विधा मनस्थितीत असताना आर्थिक अडचणी व घरची जबाबदारी यामुळे नोकरी
करणच भाग पडल. निम्नस्तर लिपीकाचा पहिला पगार १०८९ रुपये असा आला होता. फोरफीगर पगार सॅलरी
मिळतो असे अभिमानाने सांगत असे. पगारामुळे पॉके टमनी राहत होता. पगारातून काही पैसे गावी आई-
वडिलांना पाठवत असो तर बाकी स्वतःच्या खर्चांसाठी ठेवत असो. वसतीगृहात राहत असल्याने राहायची व
जेवणाची सोय होतीच. नविन कपडे व राहणीमान उच्चावले होते. कॉलेज व वसतीगृहातील माझे अॅडमिशन
मी अजूनही रद्द के ले नव्हते. त्याच काळात शासनाने एफ. जी. आर काढून वसतीगृहातील मेस (खाणावळ) बंद
करून मुलांना जेवणासाठी रोख रक्कम देण्याचे ठरवले व शालेय साहित्यावर बंधने आणले होते. याविरुद्ध
विद्यार्थांमध्ये भयंकर असंतोष पसरला होता. महाराष्ट्रातील सर्व विभागीय पातळीवरील मागासवर्गीय
मुला/मुलीच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन सुरु के ले होते. त्याच काळात औरंगाबाद, पुणे,
नागपूर व मुंबई येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब होस्टेलर्स असोसिएशन नावाची संघटना
स्थापन के ली होती. त्या संघटनेचा मी पदाधिकारी होतो.

१९८३ साली हिराचंद भाऊचे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका फायनल सेमिस्टर पास झाल्यानंतर
लगेचच कल्याणला वाटर सप्लाय खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी मिळाली होती. त्याने दोन तीन महिने
नोकरी के ल्यानंतर नासिकला मेरी मध्ये कनिष्ठ अभियंता पदी निवड झाल्याने कल्याण वाटर सप्लायचा
राजीनामा देऊन नासिकला मेरीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून हजर झाला. आता आमच्या घरातून तीन भाऊ
नोकरीला होते तर भाऊजी सुद्धा नोकरीला लागले होते बहिणीचे लग्न झाले होते मात्र भाऊजीनी मुंबईत
राहायला घर नसल्याने ते बहिणीला मुंबईला आणू शकत नव्हते. तर कनिष्ठ अभियंता पदी नियुक्ती मिळालेल्या
भाऊ हिराचंद विवाहीत असुनही पत्नीकडे ढुंकू नही पाहायला तयार नव्हता. भावनेच्या भारात के लेले लग्न
त्याला मान्य नव्हते. तो आता मामाच्या मुलीशी रजनीशी झालेलं लग्न मोडून सुशिक्षित मुलीशी लग्न करणार
होता तेव्हा घरतून त्याला कडाडून विरोध झाला. आम्ही त्याची समजूत काढण्यात यशस्वी झालो त्याला मेरी
कॉलनीत सरकारी क्वार्टस् मिळाल्यानंतर त्याने आई-वडील व पत्नीसह नाशिकला आपला संसार थाटला.
त्यानंतर माझ्यापेक्षा लहान भाऊ रंगनाथ व रघुनाथ हे शाळेत जात असत.दोन्हीही अभ्यासात जेमतेम होते.
रंगनाथ जेमतेम १० वी पर्यंत (नापास) शिकू न आई वडिलांबरोबर राहत होता. तर रघुनाथ सर्वात लहान भाऊ,
आई - वडिल विवाहित बहिण व या दोन भावाना एकत्रित ठेवणे कोणालाच परवड नसे तेव्हा मी जेव्हा गावी
जात होतो तेव्हा आई मला या दोघांबद्दल चिंता व्यक्त करून मला सांगत असे की तुमचे सर्वांचे बरे झाले आता
या दोघांच काय होणार ? हे तर शिक्षणही पूर्ण करीत नाही. तेव्हा मी आईला धीर देवून सांगत असे की आई मी
यांना वाया जाऊ देणार नाही. मी त्यांच्यासाठी काहीतरी करीन.

वरळी बी.डी.डी. चाळीत शासकीय वसतीगृहात राहत असताना एकाच प्रिमायसेसमध्ये एकाच बी.
डी. डी. चाळ क्र. ११६ मध्ये मुला/मुलींचे वसतीगृह असल्याने मुलामुलींचे एकमेकाबरोबर संबंध येत असत.
त्यातुनच एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण होऊन अनेक मुलामुलीमध्ये प्रेम संबंध जुळून येत असत. एखाद्या
मुलीच्या तिच्या कॉलेजातील मित्र भेटायला आल्यास वसतीगृहातील मुलांना राग यायचा प्रेम संबंधातूनच
अनेक मुलामुलींचे प्रेमविवाह सुद्धा होत असत. आमचे मित्र डॉ. मोहन जाधव यांचेसुद्धा संत मिराबाई
वसतीगृहातील प्रभा रणधीर या BDS करत असलेल्या मुलीशी प्रेमसंबंध होते व नंतर त्यांनी प्रेमविवाह सुद्धा
के ला. अशीच माझी उज्वला सोनवणे नावाच्या मुलीशी ओळख झाली. ती ११ वीला डॉ. आंबेडकर
कॉलेजमध्ये शिकत होती. ती मुळची नासिकची राहणारी होती. माझे मित्र भास्कर पाटील, सुरेश पाटील व
कै लास पाटील यांना अनेक मुली स्वत हून संपर्क करीत असत. माझे मित्र भास्कर पाटील याने उज्वला सोनवणे
हिला माझ्याबद्दल खूप चांगले सांगितले. माझी नोकरी, फे मिली बेकग्राउंड व माझा स्वभाव खूप चांगला
असल्याबद्दल व मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो तु सुद्धा त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दे ,तेव्हा ती म्हणाली होती
की प्रेम प्रकरणामुळे माझ्या एक दोन मावशांना जिव गमवावा लागला आहे. म्हणून मला त्यात मुळीच इंटरेस्ट
नाही. माझ्या सततच्या आग्रह व संपर्कामुळे तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेमभावना निर्माण झाली व आम्ही बाहेर
फिरु हिंडू लागलो. सिनेमाला जाणे, चौपाटीवर फिरायला जाणे सुरु झाले. उज्वला ही अतिशय प्रेम व सोज्वळ
मुलगी होती लांब के स, गौर वर्ण,साधे राहणीमान माझ्यावर जीवापाड प्रेम करीत होती तीची माझ्याशी लग्न
करण्याची तीव्र इच्छा होती व माझीही पूर्ण तयारी होती. मी आई व मोठ्या भावांनासुद्धा माझी इच्छा सांगून
टाकली होती. तेव्हा मोठे भाऊ हरचंद व हिराचंद दोघेही मुंबईला आले माझे न कळत उज्वलाला बघून गेल्याचे
माझे मित्र भास्कर पाटील याने मला सांगितले व माझ्या पलंगावर गादीखाली ठेवलेले उज्वलाचे फोटोसुद्धा
काढून नेल्याचे सांगितले. माझी आई व भावांना मुलगी पसंत होती मात्र तिची जात महार पसंत पडली नाही.
त्यामुळे घरच्यांचा विरोध होता. आम्ही आदिवासी पारधी जमातीचे असुनही आमच्या गावात आम्हाला संपूर्ण
आयुष्यात खालची वागणूक कोणत्याही समाजाकडून कधीही मिळाली नव्हती. उलट आमच्या गावातील महार,
मांग व चांभार समाजाच्या लोकांना माझी आई वेगळ्या भांड्यात चहा, पाणी, जेवण देत असे. परंतु माझी
विचारसरणी वेगळीच होती. मला चळवळीची आवड होती. जात पात मानणारी मी नव्हतोच त्यामुळे मी सर्वांचा
विरोध पत्करून उज्वलाशी प्रमविवाह करण्याचे ठरवून तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले व वाढवले.दोन वर्षे आमचा
संपर्क होता. एकमेकांवर खूप प्रेम के ले अनेक प्रेमपत्र एकमेकाना लिहिले लग्नाच्या आणा शपता घेतल्या.
आयुष्यभर एकमेकांबरोबर राहण्यासाठी प्रतिज्ञा के ली. उज्वलाची १२ वी ची परिक्षा झाली ती १२ वीत नापास
झाली. तिच्या चुलत बहिणी सदा वसतीगृहात रहात होत्या. त्यांनी तिच्या आई-वडिलांना उज्वला व माझ्या
प्रेमप्रकरणाबद्दल सांगितले असावे व प्रेम प्रकरणामुळेच उज्वला १२ वीत नापास झाली असा समज तीच्या
वडिलांचा करून देण्यात आल्याने त्यांनी तीला पुढील शिक्षणासाठी नासिकला घेऊन जाणेच पसंत के ले.
उज्वला नासिकला गेल्याने तिचा माझा संपर्क च तुटला. ती मला भेटून तिच्या भावनासुद्धा व्यक्त करु शकली
नाही. उज्वला वसतीगृह सोडून गेल्यामुळे माझे मन वसतीगृहात लागल नव्हते. माझा पुन्हा एकदा प्रेमभंग झाला
होता. त्यानंतर आजपर्यंत उज्वला मला भेटली नाही. त्याच काळात माझा वर्गमित्र कै लास पाटील याने त्याच्या
गावच्या शिक्षकाच्या ओळखीने बिना डीपॉझिट भाड्याने विठ्ठलवाडी, कल्याण येथे खोली घेतली होती. मी
सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवारी त्याच्या खोलीवर राहायला यायचो. तो एकटाच राहत असल्याने मला
त्याच्या खोलीत पार्टनर म्हणून राहण्याबद्दल सांगितले व मीही तयार झालो. माझ्या ऑफीसमधील बरेच
कर्मचारी विठ्ठलवाडी, कल्याण व उल्हासनगर ला राहत होते. मी कै लास पाटील याच्या बरोबर काही दिवस
राहिलो. तेव्हा भाऊजी वसतीगृहातच राहत होते. आई वडील व भावाचे म्हणणे होते की, भाऊजीनी सुद्धा
विठ्ठलवाडीला भाड्याने खोली घेऊन पत्नीला पिऊन रहावे मात्र खोली भाड्याने घेण्यासाठी डिपॉझिटला ५ ते
१० हजार रुपये आणायचे कु ठून ? डिपॉझिटशिवाय खोली भाड्याने मिळत नव्हती. माझा मित्र कै लास पाटील
याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने मी त्याला विनंती के ली की, आपण राहत असलेली बिना
डिपॉझिटची खोली ताई भाऊजीना देवू व आपण त्याच्या जवळपास दुसरी खोली डिपॉझीट देवून घेऊ म्हणजे
भाऊजीबरोबर ताई राहायला आल्यास आपल्याला जेवणाचा प्रश्न सुटेल. माझा मित्र कै लास पाटील तयार
झाला. भाऊजीनी गावाहून ताईला आणले व ताई व भाऊजी त्या खोलीत राहू लागले कै लास पाटीलने दुसरी
खोली घेतली व मीसुद्धा ताई भाऊजीच्याच खोलीत राहू लागलो.

मी व कै लास पाटील सुट्टीच्या दिवशी मुंबईला वसतीगृहात अधून मधून जात होतो. माझी कार्यालयात
काही नविन लोकांशी मैत्री झाली होती. रविंद्र तावडे, दिपक भेरे व राके श जाधव तसेच माझ्याच बरोबरीने
MSEB मध्ये नोकरीला लागलेले संतोष तोडासे, उत्तम जाधव व मधुकर भिडे पैकी राके श जाध्ये भारतीय
मजदूर संघ प्रणीत संघटना महाराष्ट्र विज कामगार संघ. संघटनेत सर्क ल सेक्रे टरी पदी कार्यरत होता व
उल्हासनगरला भाड्याच्या खोलीत राहत होता. तोडासे शहाडला भाडयाच्या खोलीत राहत होते. रविंद्र तावडे
बोरीवलीला त्याच्या बहिणीकडे राहत होता. त्याच्या बहिणीच्या शेजारी राहत असलेल्या एका मुलीबरोबर
त्याचे प्रेमसंबंध होते. एके दिवशी अचानकच त्याने त्या मुलीशी प्रेमविवाह रजिस्टर पद्धतीने के ला. दिपक भेरे व
राके श जाधव कोर्टात साक्षीदार होते. तीला य सामान घेऊन रविंद्र तावडे उल्हासनगरला आला. आमच्या
कार्यालयातील एका महिला कर्मचारीने उल्हास बिना डिपॉझिटवर खोली भाड्याने मिळवून दिली मी व माझा
मित्र कै लास पाटील सुट्टीच्या दिवशी रविंद्र तावडे यांच्या खोलीवर गेलो. रवीने माझी व कै लास पाटीलची
ओळख त्याच्या नववधुशी करुन दिली. तिचे नाव वंदना टोपणनाव पप्पू होते. तिच्या आई वडीलांचेसुद्धा
आंतरजातीय प्रेमविवाह झालेला होता. वडील चांभार तर आई खिश्चन वंदना स्वभावाने गरम, चंचल होती
दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पण प्रेमापेक्षा दोघांमध्ये भांडण अधिक अशी परिस्थिती होती. सततची भांडण
होत असल्याने दोघांमध्ये तणाव असायचा. रवी व आम्ही ऑफिसला नियमीत जात असो. रवी कधी कधी
ओव्हरटाईम करीत असे. तर कधी कधी सुट्टीच्या दिवशीही ऑफीसला जात असे. तो तसा मुळचा मालवणचा.
गावी थोडी शेती बाकी असल्याने त्याची ओढ गावाकडे होतीच. रविच्या मालकाने रविला खोली खाली
करायला सांगितले रविने खोली खाली के ली मात्र दुसरी खोली भाड्याने घ्यायला व त्याच्याकडे डिपॉझिटला
पैसे नसल्याने त्याचे न घरसामान विठ्ठलवाडीच्या माझ्या बहिणीच्या खोलीत टाकले. डिपॉझिटसाठी पैशाची
व्यवस्था झाल्यावर आमच्या शेजारीच त्यांना भाड्याने खोली घेऊन दिली. मी अविवाहीत असल्याने
बहिणीकडे राहत होतो व जेवणसुद्धा त्यांच्याकडेच करत होतो. त्या बदल्यात मी बहिणीला काही पैसे दरमहा देत
होतो. परंतु रवी आमच्या शेजारीच राहायला आल्यानंतर मला त्याच्याकडेसुद्धा जेवण असायचे. पप्पू मालवणी
पद्धतीचे जेवण छान बनवत असे. मला तिच्या हातचे जेवण आवडत असे. आमचे सबंध घरोब्याचे झाले होते.
आमचे घर वेगळे होते परंतु आम्ही एकत्रच राहत असो. रवी दरवर्षी १० ते १५ दिवसासाठी मालवणला जात
असे. त्याने त्याच्या मुळगावी हापूस आंब्यांची बाग लावलेली होती.

मी विठ्ठलवाडीला बहिणीकडे राहत असताना अशाळेगाव, उल्हासनगर ४ येथे नविन चाळीचे बांधकाम
सुरु होते व चाळीतील खोल्याविक्री चालू होते. माझ्या ऑफीसमधील माझा मित्र राके श जाधवने त्या चाळीत टू
रूम किचनचे बैठे घर घेतले होते. त्याच्या आग्रहामुळे मी सुद्धा वनरूम किचनची खोली २३,५००/- रुपयांत
विकत घेतली होती. ही खोली विकत घेण्यासाठी मला माझे मोठे भाऊ हरचंद यांनी आर्थिक मदत के ली होती.

नविन खोलीत राहायला जाण्याअगोदर ठाणे डेपोत कं डक्टर असलेल्या आमच्याच पारधी समाजाचे
श्री. चव्हाण यांनी मला एक स्थळ सुचवले होते. त्यांना ठाण्याला रोज आमच्या पारधी समाजाची एक नोकरदार
महिला भेटत होती त्या महिलेने त्याला सांगितले होते की माझ्या मामाची मुलगी लग्नाची आहे. तिच्यासाठी
स्थळ सुचवावे. त्याने मला स्थळ सुचवल्यानुसार मी व माझे मोठे भाऊ हिराचंद एका रविवारी डोंबिवलीला सौ.
देवकाबाई काशिनाथ सोळके यांच्या घरी गेलो. सौ. देवकाबाई सोळके ह्या ठाणे RTO कार्यालयात नोकरीला
होत्या. मी त्याच्या घरी जाण्याअगोदर त्यांना ठाण्याच्या RTO ऑफीसमध्ये जाऊन भेटलो होतो. तेव्हा त्यांनी
आम्हाला रविवारी त्यांचा घरी डोंबिवलीला बोलावले होते. त्यांच्या मामाची मुलगी तेव्हा त्यांच्याकडे आलेली
होती मी व माझे मोठे भाऊ माझ्यासाठी मुलगी बघायला डोबिवलीत गेलो. सौ.देवकाबाईची मामेबहीण सविता
एस. एस. सी पास होती. गव्हाळ वर्ण. लांब के स व चेहऱ्यावर तेज होते सोज्वळ बालीश चेहरा, सविताला
पाहताक्षणीच माझ्या चेहऱ्यावरील हावभाव बघून मला न विचारताच माझ्या भावाने आम्हाला मुलगी पसंत
आहे असे सांगून टाकले.
अर्थात मलाही मुलगी पसंत होतीच. चेहरा प्रसन्न झाला. माझा चेहरा व हावभाव पाहून मला न विचारताच
भावाने मुलगी पसंत असल्याचे सांगून टाकले. अर्थात मला मुलगी पसंत असल्याची खात्री त्याला होतीच मीही
त्याचक्षणी होकार दिला. देवकाबाईची आई सोनाबाई ही सविताची सख्खी आत्या जरा जुन्या विचारांची होती.
आमचे व सविताचे साळुंके - सोळंके असे आडनाव सारखेच असल्याने सविताच्या आत्याने लग्नाला प्रथम
नकार दिला. त्यामुळे माझ्यासह माझ्या घरचे सर्व लोक नाराज झाले. एकतर मला समाजातील मुलगी पसंत
पडत नव्हती. ही मुलगी पसंत पडली तर तिच्या आत्याने नकार दिला. त्यामुळे माझ्या आईने मला समाजातील
जळगाव व धुळे जिल्हयातील काही पदवीधारक मुली दाखवल्या परंतु मला मुलगी पसंत पडत नव्हती. तेव्हा मी
आई वडील व भावांना विनंती के ली की, तुम्ही परत सविताच्या आत्यांना भेटा व तिला समजवा. त्यानुसार माझे
आई वडील सविताच्या आत्याला, सोनाबाई हिला एका वर्षानंतर भुसावळला भेटायला गेले. सोनाबाईचा
एकु लता एक मुलगा रामचंद्र हा भुसावळला रेल्वेत नोकरीला होता व भुसावळलाच रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत
होता. सोनाबाईने तिची भाची कु सम म्हणजे सविताची मोठी बहिण हिलाच आपली सुन के ली होती व तिला एक
दोन मुल होते. घरकामासाठी मुलं सांभाळायला म्हणून सविताला त्याच्याकडे ठेवले होते सविता दोन वर्षांची
असतानाच तिची आई वारली होती. व वडिलांनी तीन मुली व दोन मुलं असूनही या मुलांचा सांभाळ
करण्यासाठी म्हणून दुसरी बायको के लेली होती. माझे आई वडील जेव्हा भुसावळला सोनाबाईला भेटायला गेले
तेव्हा सोनाबाईने सांगितले

You might also like