You are on page 1of 8

♿ *अपंग व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻

*# कलम ३ (१)*

दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची
जबाबदारी असेल.

*# कलम ४ (१)*

दिव्यांग स्त्रिया व मुले त्यांचे हक्क इतरांप्रमाणेच उपभोगतील हे सुनिश्चित करण्यासाठी शासन व स्थानिक
प्राधिकरणे उपाययोजना करतील.

*# कलम ५ (१)*

दिव्यांग असलेल्या व्यक्तींना समाजामध्ये राहण्याचा अधिकार असेल. *(२)* कोणत्याही विशिष्ट निवासी व्यवस्थेत
राहणे दिव्यांगांना बंधनकारक करता येणार नाही. वय, लिंग विचारात घेऊन राहण्याकरता अावश्यक असणारी
वैयक्तिक मदत समाविष्ट आहे . यामध्ये प्रवेश दिला जाईल.

*# कलम ६ (१)*

सुयोग्य शासन अपंगत्व असलेल्या व्यक्तिंना अत्याचार, क्रूर, अमानुष किं वा अपमानास्पद वागणुकीपासुन संरक्षण
दे ण्यासाठी योग्य उपाय योजना करील.

*# कलम ७ (४)*

कोणताही पोलीस अधिकारी ज्याकडे अपंग व्यक्तीशी गैरवर्तन, हिंसा, किं वा शोषण केले गेल्याची माहिती कळते त्याने
पिडीत व्यक्तीस योग्य कायदे शीर मदत करावी. ज्यात मोफत कायदे शीर मदत मिळविण्याचा अधिकार असेल.

*# कलम ८*

अपंग असलेल्यांना धोका, सशस्त्र संघर्ष, मानवहितवादी आणीबाणी, नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत समान सरु क्षितता
व संरक्षण मिळे ल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्ह्यातील अपंग व्यक्तींच्या तपशिलाची नोंद ठे वेल.
*# कलम ९*

अपंगत्वाच्या कारणांमुळे अपंग व्यक्तीस पालकांपासून वेगळे करता येणार नाही. पाल्याच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने
अावश्यक असल्यामुळे सक्षम न्यायालयाच्या आदे शानुसार असेल तर असे प्रकरण वगळून.

*# कलम १०*

अपंग व्यक्तिस पन
ु रुत्पादन करण्याचा अधिकार तसेच कुटूंब नियोजन माहिती मिळवण्याचा तसेच संमती शिवाय
वैद्यकीय प्रक्रियेला सामोरे न जाण्याचा अधिकार असेल.

*# कलम ११*

अपंग व्यक्तीस निवडणूक आयोग मतदानामध्ये सुगम्यता / सुलभता प्रदान करे ल.

*# कलम १२*

अपंग व्यक्तीस भेदभावाशिवाय न्यायालयीन किं वा इतर कोणत्याही पंचायतीमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार राहिल.
उच्च आधाराची गरज असल्यास शासन योग्य त्या आधाराच्या योजना व्यवस्थित राबविण्यासाठी पावले उचलेल
इत्यादी.

*# कलम १३*

अपंग व्यक्तीस इतरांप्रमाणे चल, अचल मालमत्तेवर मालकी किं वा वारसाने प्राप्त करण्याचे, आर्थिक मुद्द्यांना
नियंत्रित करण्याचे, बँकेचे कर्ज घेण्याचे हक्क असतील. अपंग व्यक्तीला सहाय्य दे णारी कोणतीही व्यक्ती अवास्तव
प्रभावाचा वापर करणार नाही. स्वायत्तता, सन्मान व खाजगीपणाचा आदर करे ल.

*# कलम १४*

अपंग व्यक्तिस पालकत्वासंबंधी अधिकार आहे त.

*# कलम १६*

अपंग व्यक्तीस शिक्षणात सोयी सवि


ु धा मिळविण्याचे हक्क आहे त.
*# कलम १७*

अपंग व्यक्तीस मोफत शिक्षण, शिष्यवत्ृ ती, शिक्षण संस्था इत्यादी विषयी तरतुदी आहे त.

*# कलम १९*

अपंग व्यक्तिच्या व्यावसायिक शिक्षण व स्वयंरोजगार विषयी तरतुदी आहे त.

*# कलम २०*

कोणतीही शासकीय आस्थापना अपंग कर्मचारी व्यक्तीशी भेदभाव करणार नाही. वाजवी सोयी आणि योग्य असे
अडथळामुक्त व अनुकूल वातावरण निर्माण व उपलब्ध करून दे ईल. अपंगत्वाच्या आधारे बढती / पदोन्नती नाकारली
जाणार नाही. सेवेच्या दरम्यान अपंगत्व आलेल्या व्यक्तीला बडतर्फ करणार नाही. सांभाळत असलेल्या पदासाठी
कर्मचारी योग्य ठरत नसेल तर त्याला दस
ु र्‍या पदावर स्थानांतरीत केले जाऊ शकते. तसेच जर दस
ु र्‍या पदावर
समाऊन घेणे शक्य नसेल तर त्याला दस
ु रे योग्य पद मिळे पर्यंत किं वा तो सेवानिवत्ृ तीच्या वयाला पोचत नाही तोवर
त्याला एका सुपर न्युमरी / मानद पदावर ठे वले जाऊ शकते. सुयोग्य प्रशासन अपंग कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि
स्थानांतराबद्दल धोरण आखेल.

*# कलम २२*

प्रत्येक आस्थापना अपंग कर्मचारी व्यक्तींच्या अभिलेखांची नोंद ठे वेल. प्रत्येक रोजगार केंद्र सद्ध
ु ा रोजगार शोधणार्‍या
अपंग व्यक्तीच्या नोंदी ठे वतील.

*# कलम २३*

प्रत्येक शासकीय आस्थापना तक्रार निवारण अधिकार्‍यांची नेमणूक करे ल. कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवल्यास दोन
आठवड्याच्या आत चौकशी केली जाईल. पिडीत व्यक्ती केलेल्या कारवाईने समाधानी नसल्यास जिल्हास्तरीय अपंग
समितीला संपर्क करु शकतो.

*# कलम २५*

अपंग व्यक्तीस प्राधान्यक्रमाने आरोग्य सेवा मिळविण्याचा अधिकार आहे .

*# कलम २९*
अपंग व्यक्तीस सांस्कृतिक जीवन आणि इतरांसह मनोरं जक उपक्रमात सहभागी होण्याचा हक्क आहे . अपंग कलाकार
आणि लेखकांना त्याची आवड आणि गुणांचा पाठपुरावा करण्यासाठी सुविधा, सहाय्य आणि प्रायोजकत्व इत्यादी
अधिकार.

*# कलम ३०*

अपंग व्यक्तीस क्रिडा विषयक सवि


ु धा मिळविण्याचा हक्क आहे .

*# कलम ३४*

अपंग व्यक्तींना किमान ४% शासकीय आस्थापनेत आरक्षण असेल.

*# कलम ३५*

अपंग व्यक्तींना खाजगी क्षेत्रात किमान ५% आरक्षण असेल.

*# कलम ३७*

अपंग व्यक्तीस शेतजमीन आणि घर वाटपात ५% आरक्षण आणि अपंग महिलांना योग्य प्राधान्य.

*# कलम ३८*

लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तिस उच्च सहाय्य.

*# कलम ४१*

अपंग व्यक्तीस सग
ु म्य वाहतुक सुविधा - बस थांबे, रे ल्वे स्टे शन, विमान तळ इत्यादीवरील जागा, तिकिट काऊंटर,
शौचालय इत्यादी अपंग व्यक्तीशी सुसंगत असावे.

*# कलम ७४* नस
ु ार मख्
ु य आयक्
ु त तर *# कलम ७९* नस
ु ार राज्य आयक्
ु त अपंगांना न्याय दे ण्यासाठी असतील.

*# कलम ८४* नुसार विषेश न्यायालय तर *# कलम ८५* नुसार विषेश सरकारी वकील अपंगांसाठी असतील.
*# कलम ८८*

शासन अपंग व्यक्तींसाठी राज्य निधीची तरतूद करे ल.

*# कलम ८९*

नियमाचे उल्लंघन केल्यास ₹ १०,०००/- ते ₹ ५,००,०००/- पर्यंत दं डाची तरतुद.

*# कलम ९२*

जो कुणी अपंग व्यक्तीचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करतो, धमकी दे तो, मारहाण करतो, शक्ती वापरतो, अप्रतिष्ठा
करतो, अपंग महिलेचा विनयभंग करतो, अपंग व्यक्तीवर ताबा व नियंत्रण मिळवतो, अन्न किं वा द्रव्य नाकारतो,
लैंगिक शोषण करतो, कोणत्याही अंगाला किं वा ज्ञानेंद्रियाला स्वेच्छे ने जखमी करतो, सहायक साधनांना क्षती
पोहोचवतो किं वा तसा प्रयत्न किं वा हस्तक्षेप करतो, अपंगत्व असलेल्या महिलेवर तिच्या संमतीशिवाय वैद्यकीय
प्रक्रिया निर्देशित करणे किं वा चालवणे, ज्यामध्ये गर्भाचा गर्भपात होतो किं वा होण्याची शक्यता असते (मात्र वैद्यकीय
तज्ञांच्या व पालकाच्या व अपंग स्त्रीच्या संमतीने वैद्यकीय प्रक्रिया केली जाऊ शकते.) यासाठी ६ महिने ते ५
वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा तसेच दं डही होऊ शकतो.

*# कलम ९३*

जो कुणी अपंग हिताची माहिती, दस्तावेज, लेखा किं वा अन्य कागदपत्रे सादर करण्यास अपयशी ठरतो जे त्याचे
कर्तव्य आहे . यातील प्रत्येक गुन्ह्याबाबतीत जास्तीत जास्त ₹ २५,०००/- पर्यंत दं डाची शिक्षा होऊ शकते आणि
सातत्याने अपयश आल्यास किं वा नकार दिल्यास दं डाची शिक्षा दिलेल्या मळ
ु आदे शाच्या तारखेनंतर पढ
ु ील प्रत्येक
दिवसासाठी ₹ १०००/- असेल.

*# कलम ९६*

या कायद्यातील तरतुदी इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अतिरिक्त असतील, ना की त्यांचे महत्व कमी
करणार्‍या.

(या कायद्यातील तरतुदींचा विस्ताराने अभ्यास करण्यासाठी *निःशक्त व्यक्ती अधिकार विधेयक २०१६ / P.W.D.
ACT 2016* अभ्यासावा.)

*-: संकलन :-*


*- शेख सादिक इब्राहिम (आतार)*

१००% दिव्यांग ♿

कळं ब, जि. उस्मानाबाद

*संपर्क : ८६००३८२७७७*

*-: मार्गदर्शक :-*

*१) महादे व ह. शिंदेपाटील*

जिल्हाध्यक्ष,

म.रा.अपंग कर्मचारी संघटना,

उस्मानाबाद

*संपर्क : ९७३०१६०७८०*

*२) दत्ता सांगळे * ♿

दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते

डोंबिवली, जि. ठाणे

*संपर्क : ८१६९०८५७६६*

🙏🙏 *माझे मनोगत.!* 🙏🙏

*महोदय,*

या कायद्यापर्वी
ु सद्ध
ु ा भारत सरकारने *अपंग समान संधी कायदा - १९९५* हा कायदा केला होता. तो कायदा सद्ध
ु ा
प्रभावी होता. परं तू त्या कायद्यात अपंगांना त्रास दे णार्‍यास शिक्षेची तरतूद नव्हती. आता या *निःशक्त / दिव्यांग
अधिकार कायदा - २०१६* मध्ये ₹ पाच लाखापर्यंत दं ड तसेच पाच वर्षापर्यंत शिक्षेची तरतद
ु केलेली आहे .
एकंदरीत आतापर्यंत अपंगाविषयी कायद्यांचा व शासन निर्णयांचा अभ्यास केला असता मला असे जाणवले की,
सरकार कोणतेही असो ते अपंगांच्या हितासाठी सकारात्मकच होते आणि आहे . विविध अपंग संघटनेने शासनाला
केलेल्या विविध योजनेची मागणी सुद्धा शासन मान्य करुन सकारात्मक निर्णय दे त आहे तसेच लोक प्रतिनिधी सुद्धा
अपंगांशी सहकार्याची भावना ठे वताना दिसत आहे त. कुणा सरपंच, पंचायत समिती सदस्य अगर सभापती, जिल्हा
परिषद सदस्य अगर अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, मख्
ु यमंत्री, पंतप्रधान किं वा राष्ट्रपती महोदयांंकडे अपंग /
दिव्यांगांच्या फायली प्रलंबित नाहीत. असेल तरी अपवादात्मक.!

परं तू कायदे व शासन निर्णय उपलब्ध असताना ग्रामसेवक किं वा ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी,
तहसीलदार, समाजकल्याण अधिकारी, जिल्हाधिकारी, अन्य कार्यालयातील संबंधीत अधिकार्‍यांकडे अपंगांना सवलती व
न्याय दे ण्याची जबाबदारी असून सुद्धा हे अधिकारी *संबंधित कायद्यातील व शासन निर्णयातील तरतुदीनुसार
अपंगांना त्यांच्या अधिकाराच्या योजनेचा लाभ का दे त नाहीत ? अपंगाने सर्व कागदपत्रांची पर्त
ू ता करुन सुद्धा यांच्या
किं वा यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या टे बल व कपाटात अपंगांच्या फाईली धुळ खात का पडलेल्या असतात ? शासनाने
दिलेल्या वस्तू किं वा साधने कुजून / गंजून जातात पण हे अधिकारी लाभार्थ्यांना का दे त नाहीत ? मा. मुख्यमंत्री
महोदयांनी पुढाकार घेऊन काढलेल्या दि. २५ जून २०१८ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अधिकारीवर्ग का करत
नाहीत ?*

या प्रश्नांची उत्तरे शोधली असता असा *"निष्कर्ष"* निघाला की, संबंधित अधिकाऱ्यांना असे वाटत असावे की :-
आपण अपंगाचे काम केले तरी आपणास या लाचार अपंगापासन
ू काय लाभ मिळणार आहे ? तोच खायला महाग
आहे मला काय दे ईल ? तेव्हा मी या लुळ्यापांगळ्याचे / आंधळ्याचे / वेडपटाचे काम का करु ? या अपंगाचे काम
नाही केले तरी तो आपले काय वाकडे करणार आहे ?

सांगायचे म्हणजे अपंगांच्या विकासाची जबाबदारी असलेल्या काही अधिकाऱ्यांना भिती राहिलेली नाही म्हणूनच, अपंग
बंधू - भगिनींनो... आपल्या न होणाऱ्या कामास *सरकार जबाबदार नसन
ू संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार*
आहे त. कारण अपंग हिताचे सक्षम कायदे आणि शेकडो शासन निर्णय असून यांची अंमलबजावणी करण्याची
जबाबदारी *'अधिकारी व कर्मचारी'* यांच्यावर आहे . परं तू काहीजण आपणास कायद्याची व जीआर ची माहिती
नसल्याने डोळे झाक करतात. काही अधिकारी चांगले पण असतील. त्यांच्याबद्दल मला आदरच आहे .

कायदा व जीआर चा स्वतः अभ्यास करा. इतरांना माहिती द्या. कायद्याचा / जीआर चा संदर्भ दे ऊन अर्ज करा.
पोहोच घ्या. काम होत नसेल तर *मा. अपंग आयक्
ु त , पण
ु े किं वा मा. न्यायालयात* धाव घ्या. अपंगांच्या संघटनेशी
जोडले जा. पाठपुरावा करा. आपल्याकडे मनगट बळ नसते म्हणून कायद्यालाच मनगट बळ बनवा आणि हलगर्जी व
अन्याय करणार्‍यास कायदे शीर धडा शिकवा. अशिक्षित किं वा तीव्र अपंगत्वाने अचल व अंध अवस्थेत आहे त किं वा
आर्थिक तणावात आहे त अशांची मदत करा. त्यांना त्यांचे अधिकार मिळवून द्या. *यापेक्षा मोठे "पुण्य" अन्य कशात
असेल ? मला तरी वाटत नाही...!!!*

लेखक :-

*- शेख सादिक इब्राहिम (आतार)*

१००% दिव्यांग ♿

कळं ब, जि. उस्मानाबाद

*संपर्क : ८६००३८२७७७*

© कृपया Copy Paste न करता लेखकाच्या नावासहीत प्रत्येक अपंग व्यक्तीपर्यंत शेअर करावे, ही नम्र विनंती.!

🙏🙏🙏🙏♿🙏🙏🙏🙏🙏

You might also like