You are on page 1of 15

मराठी - इयत्ता नववी

व्याकरण

वाक्याचे प्रकार व
वाक्यरुपांतर
वाक्याचे प्रकार
१. विधानार्थी वाक्य
२. प्रश्नार्थी वाक्य
३. उद्गारार्थी वाक्य
४. होकारार्थी वाक्य
५. नकारार्थी वाक्य
६. आज्ञार्थी वाक्य
१. विधानार्थी वाक्य :
- ज्या वाक्यांत विधाने (Statements) के ली असतात; अशा वाक्यांना विधानार्थी वाक्ये
म्हणतात.
- सुरूवात करत्याने होते व शेवटी पूर्णविराम.

• पप्पा नाशिकला गेले.


• ती बाग खूप स्वच्छ आहे.
• मी दररोज अभ्यास करतो.
• शाळा म्हणजे दुसरी माता होय.
२. प्रश्नार्थी वाक्य :
- ज्या वाक्यांत प्रश्न (Questions) विचारले असतात; अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्ये म्ह
णतात.
- वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह.

• तू क्लासवरून के व्हा परत येणार आहेस?


• ती बाग स्वच्छ आहे का ?
• हे पुस्तक तुला कोणी दिले?
• तू हे काय खात आहेस?
३. उद्गारार्थी वाक्य :
- ज्या वाक्यांत भावनांचा (Feelings) उद्गार काढला जातो; अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्ये म्
हणतात.
- वाक्याच्या शेवटी उद्गारचिन्ह.
- काय, किती! हे शब्द सुरूवातीला.

• किती! स्वच्छ आहे ती बाग.


• अहाहा! किती सुंदर देखावा हा!
• शाबास! छानच खेळलास!
४. होकारार्थी वाक्य :
- होकार दर्शविला जातो.

• नेहमी खरे बोलावे.


• मी आज नवीन कपडे घातले.
५. नकारार्थी वाक्य :
- नकार दर्शविलेला असतो.

• दुसऱ्यांची निंदा करू नये.


• मी आज जुने कपडे घातले नाहीत.
६. आज्ञार्थी वाक्य :
- ज्या वाक्यांत आज्ञा, विनंती, उपदेश, आशीर्वाद, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो; अशा वा
क्यांना आज्ञार्थी वाक्ये म्हणतात.
- ने, आण, कर, बघ, पहा, ये, जा इत्यादी आज्ञार्थक शब्द क्रियापदाच्या जागी यावेत.

• तो दरवाजा बंद कर. (आज्ञा)


• देव तुझे भले करो. (आशीर्वाद)
• कृ पया शांत बसा. (विनंती)
• देवा मला पास कर. (प्रार्थना)
• प्राणिमात्रांवर दया करा. (उपदेश)
वाक्यरुपांतर
• वाक्याचा अर्थ न बदलता वाक्यप्रकार एकमेकांत बदलणे याला वाक्यरूपांतर किं वा वाक्यपरिव
र्तन म्हणतात.

उदा.,
हे अक्षर खूप चांगले आहे (विधानार्थी वाक्य)
वरील वाक्याचे इतर प्रकारात रूपांतर नीट अभ्यासा :
• प्रश्नार्थी वाक्य - हे अक्षर खूप चांगले आहे, नाही ?
• उद्गारार्थी वाक्य - अहा! हे अक्षर किती चांगले आहे !
• आज्ञार्थी वाक्य - चांगले अक्षर काढा.
प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर
• जगात सर्व सुखी असा कोण आहे ?
विधानार्थी व नकारार्थी वाक्य - जगात सर्व सुखी असा कोणीच नाही.
• अपमान के ल्यास प्रत्येकाला राग येतोच.
प्रश्नार्थी वाक्य व नकाराथी वाक्य - अपमान के ल्यास कु णाला राग येत नाही?
• खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध ?
नकारार्थी वाक्य- खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध नाही ?

• प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करताना प्रश्न नकारार्थी असेल तर त्याचे विधानार्थी उत्तर होकारार्थी असते.
• प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी ठेवा.
उदगारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर
• आज गाडीत कोण गर्दी!
विधानार्थी वाक्य - आज गाडीत अतोनात गर्दी होती.
• वा! सर्व ताई-दादांनी मला किती महिली दिली.
विधानार्थी वाक्य - सर्व ताई-दादांनी मला खूप माहिती दिली.

• तीव्र इच्छा व भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारारर्थी वाक्ये वापरतात.


• या वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य करताना कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायची आहे ते स्पष्ट
करावे.
होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर
• ही कल्पना बऱ्यापैकी आहे.
नकारार्थी वाक्य - ही काही वाईट कल्पना नाही.
• आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही.
होकारार्थी वाक्य - आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं अयोग्य आहे.
आज्ञार्थक व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर
• शेण गोठा वैगेरे जी पडतील ती सारी कामं कर.
विधानार्थी वाक्य - शेण, गोठा वैगेरे जी पडतील ती सारी कामं करावीत.
• तू चित्र काढ.
विधानार्थी वाक्य - तू चित्र काढावे.
Assignment
प्रश्न : कं सातील सूचनांप्रमाणे वाक्यांत बदल करा :
१. किती पाऊस पडला काल रात्री! ( विधानार्थी करा )
२ . ही इमारत खूप उंच आहे. ( उद्गारार्थी करा )
३. आज पहाटे रानात उजेड नव्हता. ( होकारार्थी करा )
४. साहित्याचे रंग फु लले आहेत. ( नकारार्थी करा )
५. दररोज अभ्यास करावा. (आज्ञार्थी करा )
६. तू कोणत्या शाळेत जातेस ते मला सांग. (प्रश्नार्थी करा )
७. प्रवासात भरभरून बोलावे. ( आज्ञार्थी करा )
८. पांढरा रंग कोणाला आवडत नाही? ( विधानार्थी करा )
९. भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? ( विधानार्थी करा )
१०. सुट्टीत भरपूर वाचन करावे. (आज्ञार्थी करा )
Thank you

You might also like