You are on page 1of 5

इयत्ता सातवी - व्याकरण

उ भ या न् व यी अ व् य य (CONJUNCTION)

1
उभयान्व्ययी अव्यय ( CONJUNCTION)

दोन किं वा अधिक शब्द , तसेच दोन किं वा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ‘ उभयान्वयी अव्यय ‘
म्हणतात.

(उभय म्हणजे दोन व अन्वय म्हणजे जोडणे)

उभय अव्यये = म्हणून , व , आणि , किं वा , म्हणून

(वाक्यातील दोन शब्द किं वा दोन वाक्ये यांचा सबंध जोडणे हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे.)
2
उभयान्वयी अव्यय हा अव्ययांचा तिसरा प्रकार आहे.

पुढील वाक्ये पहा.

१. आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले.

२. शिरीष दंगा करतो, म्हणून शेवटी मार खातो.

३. देह जावो अथवा राहो | पांडु रंगी दृढ भावो

४. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला , शिवाय त्याला जेवू घातले.

५. एक रुपया म्हणजे शंभर पैसे

६. त्याला बढती मिळाली कारण त्याचे काम चोख के ले.

७. काल काळे ढग दाटू न आले पण पाऊस पडलाच नाही.

3
खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.

१. प्रयत्न के ला तर यश नक्की मिळेल


उत्तर --- तर

२. नळाला पाणी नव्हते सबब मी अंघोळ के ली नाही.

उत्तर : सबब

३. आजीला थोडे बरे नाही बाकी सर्व क्षेमकु शल


उत्तर : बाकी

४. मंगल बासरी पण छान वाजवते.


उत्तर : पण

4
गृहपाठ

प्र१. चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा

( आणि , व , किं वा , कारण , परी )

१. मरावे ______ कीर्ती रुपी उरावे.

२. तुझी तयारी असो ____ नसो , तुला गावी जावेच लागेल.

३. गावात बिबट्या शिरल्याची बातमी आली _________ एकच पळापळ झाली.

४. मला कडक पदार्थ खात येत नाहीयेत _________ माझा दात दुखतो आहे.

५. पाऊस पडला ______ ओढ्याला पूर आला.


5

You might also like