You are on page 1of 42

साधना

नक्षलवादाचे आव्हान

६२वा वर्धापनदिन विशेषांक : १५ ऑगस्ट २००९

साने गुरुजी

संस्थापक

नरेंद्र दाभोलकर

संपादक

अजय दांडेकर

विनोद शिरसाठ युवा संपादक

विशेष संपादन सहाय्य

अनुक्रम :
● भूमिका : संपादक / ४

पार्श्वभूमी : नक्षलवादी चळवळीची : गोविंद गारे / ७

पण लक्षात कोण घेतो...: सुरेश द्वादशीवार / १०

खरे आव्हान : मूल्यवान साधनाने मूल्यवान साध्य प्राप्त करण्याचे : मेधा पाटकर / १४

नक्षलवादाशी लढण्याचा फॉर्म्युला : महेश भागवत / १७ सशस्त्र प्रतिकार थोडे चिंतन: बेला भाटिया
/ २६

बस्तर, माओवाद आणि सलवा जुडू म नंदिनी सुंदर / ३३

भारतातील माओवाद : ध्येयधोरण, कार्यक्रम आणि सशस्त्र संघर्ष : तिलक डी. गुप्ता / ४१ ४८

भारतातील माओवाद्यांवरील टीके चा सर्वांगीण परामर्ष : आझाद /

नक्षलवादी चळवळ, तिच्यापुढील प्रश्न आणि अत्याधुनिक प्रतिक्रिया : अजय दांडेकर / ५६

कोंडमारा : देवदत्त दाभोलकर / ६०


मतदार राजा, दिवाणजीला कारभाराचा जाब विचारा! / ६१ निकाल : 'बालकु मार साधना' लेखन
स्पर्धेचा / ६२

विशेष आभार -

अजय दांडेकर – ‘इकॉनॉमिक अॅन्ड पोलिटिकल विकली' मधील चार अत्यंत महत्त्वाचे लेख
मिळवून दिले.

कु मुद करकरे - बेला भाटिया, नंदिनी सुंदर, तिलक डी. गुप्ता, आझाद आणि अजय दांडेकर या पाच
लेखकांच्या इंग्रजी लेखांचे सुबोध मराठीत भाषांतर के ले.

संजय पवार - अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढू न अत्यंत आशयसंपन्न मुखपृष्ठ तयार के ले.
आप्पासाहेब सा. रे . पाटील या अंकासाठी घसघशीत रकमेच्या सहा जाहिराती मिळवून दिल्या.

(साधना साप्ताहिकाचा हा विशेषांक १५-२२ ऑगस्ट २००९ असा जोड अंक आहे .)

भूमिका

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे १५ ऑगस्ट १९४८ रोजी, साने गुरुजींनी
स्थापन के लेल्या 'साधना' साप्ताहिकाचा ६२ वा वर्धापनदिन साजरा करताना आम्हाला विशेष
आनंद होणे स्वाभाविक असले तरी 'नक्षलवादाचे आव्हान' या विषयावरील विशेषांक सादर करताना
मात्र अजिबात आनंद झालेला नाही. 'नक्षलवाद : काल, आज उद्या' किं वा 'नक्षलवाद उगम, विकास,
विस्तार' असा विषय आम्ही निवडलेला नाही आणि नक्षलवाद्यांचे क्रौर्य व सरकारकडू न होणारे
अत्याचार यांच्या कहाण्या रंगवून सांगण्याचा प्रयत्नही के लेला नाही. वाचकांच्या मनात भावनांच्या
लाटा निर्माण होण्यापेक्षा, विचारांच्या लहरी उत्पन्न व्हाव्यात आणि नक्षलवादाच्या आव्हानाबाबत
सजगता यावी हा या अंकाचा प्रमुख उद्देश आहे .

स्थापण्या

नक्षलवादाचे आव्हान या देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला आहे आणि ते आव्हान देशाच्या


विकासाच्या मार्गातील प्रमुख अडथळाही आहे ; पण खऱ्या अर्थाने ते आव्हान या देशातील संसदीय
लोकशाहीला आहे ! शोषणरहित व समन्यायी समाजाची म्हणजे आदर्श राज्याची निर्मिती हेच जर
नक्षलवादाचे अंतिम उद्दिष्ट असेल तर या देशाच्या राज्यघटनेचे अंतिम उद्दिष्ट त्याहून अधिक
व्यापक व उदात्त आहे ; फरक आहे तो के वळ ते अंतिम उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गांचा. पण हा
फरकच अत्यंत महत्त्वाचा असून, त्यामुळेच 'संसदीय लोकशाही' व 'नक्षलवाद' हे परस्परांच्या
मार्गातील अडथळे व आव्हाने ठरतात.

समता शांती ठे वुनी शुद्ध साधनां । करिती साधना त्यांना ठे वो उत्स्फू र्त साधना

२६ जानेवारी १९५० रोजी संसदीय लोकशाहीचा स्वीकार करून, 'प्रजासत्ताक' म्हणून घोषित झालेले
हे राष्ट्र आता हीरकमहोत्सवाच्या उं बरठ्यावर आहे , हे लक्षात घेऊनच नक्षलवादाकडे पाहिले पाहिजे.
नक्षलवादाचे अंतिम उद्दिष्ट व्यवस्था परिवर्तनाचे व आदर्श राज्याच्या निर्मितीचे असले तरी
"संसदीय लोकशाही नष्ट करूनच ते साध्य होईल' अशी त्यांची दृढ 'श्रद्धा' आहे ; म्हणून उपेक्षित,

शोषित, वंचित व तळागाळातील जनतेचे प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणले हे खरे असले तरी, संसदीय
लोकशाहीवर 'विश्वास' असणा-यांनी नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती बाळगणे हे देशासाठी घातक
ठरेल.

उपेक्षित, शोषित, वंचित व तळागाळातील जनतेचे 'महानायक' असलेल्या गांधी आणि • आंबेडकर
या दोघांनीही, कितीही दोष असले तरी संसदीय लोकशाहीच या देशाचे अखंडत्व राखून •सर्वांगीण
विकासाचा मार्ग चोखाळू शके ल' हे नि:संदिग्धपणे सांगितले आहे . 'या देशातील शेवटचा माणूस
सुखी होईल तेव्हाच या देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येईल,' हा विचार गांधींचा होता;
तर 'राजकीय स्वातंत्र्य आले पण, आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य आले तरच या देशात लोकशाही
नांदेल,' असे आंबेडकर मानत होते, आणि तरीही गांधीजी 'साध्यसाधन' विवेकाबाबत कमालीचे
आग्रही होते, तर आंबेडकर 'सनदशीर मार्गांचा जोरदार पुरस्कार करीत होते.

स्वातंत्र्यलढ्यातील गांधीच्या योगदानाबद्दल मतभेद असणाऱ्या कम्युनिस्टांना व हिंदुत्ववाद्यांनाही


'स्वातंत्र्याची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्यात गांधींचे योगदान सर्वाधिक आहे ' हे मान्य

आहे . ...आणि स्वातंत्र्यलढ्यातील आंबेडकरांच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाही शेकडो


वर्षे

१५ ऑगस्ट २००९

वर्ष ६२ / अंक १, २

● संपादक :

नरेंद्र दाभोलकर

• युवा संपादक विनोद शिरसाट

• हे साप्ताहिक मुद्रक, प्रकाशक नरेंद्र दाभोलकर यांनी ब्ल्यू वई (इंडिया) लिमिटेड, पुणे ४ येथे

छापून, साधना साप्ताहिक, ९२६ सदाशिव पेठ, पुणे ४११०३० येथे प्रकाशित के ले.
• दूरध्वनी वर्गणी, पत्ता व अंकासंबंधी, [०२०] २४४५१७२४. संपादक टेलिफॅ क्स – २४४३२४०२. E-mail:

weeklysadhana@gmail.com Website: www.sadhanatrust.com • वार्षिक वर्गणी व्यक्तिगत रु.४००/-,

संस्थांसाठी रु. ५००/- साधना मीडिया सेंटर २४४५९६३५.

● | अंकात व्यक्त झालेल्या सर्व मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.] • मुखपृष्ठ संजय

पवार (संगणकीय साहाय्य: मोहिनी नाईक)

अन्याय सोसत 'मूक' राहिलेल्या पददलित जनतेला 'आवाज' देऊन उभे करण्याचे काम आंबेडकरांनी
के ले, ' हे मान्य आहे . गांधीजींना आपल्या स्वप्नातील भारताची (रामराज्याची) 'घटनात्मक चौकट'
आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार व्हावी असे वाटले, यात योगायोग काहीच नाही. आणि म्हणूनच
या देशात संसदीय लोकशाही रूजली त्याचे सर्वाधिक श्रेय गांधी-आंबेडकर यांच्याकडे जाते.

संसदीय लोकशाहीचा गेल्या साठ वर्षांतील प्रवास पुरेसा समाधानकारक नसेलही कदाचित, पण
म्हणून ती वाटचाल झपाट्याने व सर्वसमावेशक करण्याऐवजी काळाची चक्रे उलटी फिरवायची का,
हा विचार नक्षलवादाबाबत आकर्षण व सहानुभूती बाळगणारांनी के ला पाहिजे. हा प्रश्न के वळ
हिंसेचा नसून व्यवहार्यतेचाही आहे . या विशेषांकातील बेला भाटिया यांच्या लेखात नैतिक, राजकीय
व व्यावहारिक या तीनही दृष्टिकोनांतून विचार के ला तरी नक्षलवादाचे समर्थन होऊ शकत नाही हे
अतिशय नेमके पणाने आले आहे , त्यामुळे त्याची पुनरावृत्ती येथे करण्याची आवश्यकता नाही.

आणि 'साधना' ची याबाबतची भूमिका तर स्वयंस्पष्ट आहे . प्रत्येक अंकातील संपादकीय पानावर जे
"ब्रीद वाक्य' छापले जाते त्याचा अर्थच हा आहे की, 'समता आणि शांती स्थापन करण्यासाठी जे

कोणी शुद्ध साधनांचा अवलंब करून कृ तिशील राहतील त्यांना उत्स्फू र्त ठे वण्यासाठी साधना
साप्ताहिक प्रयत्नशील राहील.'

पण तरीही मुख्य प्रश्न उरतोच तो म्हणजे, नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातील जनतेच्या
विकासाचे काय ? स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही तिथे अन्न, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार या
प्राथमिक गरजाही भागवल्या जात नाहीत याचा सर्वाधिक दोष या देशातील राज्यकर्त्यांकडे जातो,
किं बहुना राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांचा व असंवेदनशीलतेचा तो पुरावाच आहे . पण या
देशातील सामाजिक व वैचारिक नेतृत्वाच्या निष्प्रभतेचा आणि मध्यम वर्गाच्या आत्ममग्न
प्रवृत्तीचाही या दोषात वाटा आहे . सामाजिक व वैचारिक नेतृत्व राज्यकर्त्यांवर अंकु श ठे वण्यास
पुरेसे यशस्वी ठरले नसेल तर त्याचा अर्थ त्यांचे आकलन किं वा त्यांची रणनीती सदोष आहे .
आणि मध्यमवर्गाला सभोवताली काय परिस्थिती आहे याचे भान नसेल तर त्याचा अर्थ त्याची
संवेदनशीलता बोथट झाली आहे किं वा हा वर्ग हावरटपणामुळे जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत
आहे .

या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करत जाणे आणि त्या भागाचा विकास घडवून
आणणे हे खरोखरच आव्हान आहे . अर्थात, हे आव्हान असाध्य नाही असा संदेश, याच अंकात महेश
भागवत या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आदिलाबाद जिल्ह्याची जी कहाणी सांगितली आहे ती
वाचून मिळतो; किं बहुना सरकारने ठरवले तर किती झपाट्याने प्रशासन यंत्रणा काम करू शकते,
याचे दर्शन त्यातून घडते. पण असे पोलीस अधिकारी वा प्रशासकीय अधिकारी मुळातच फार कमी
आहेत आणि असले तरी राज्यकर्त्यांचा खंबीर पाठिंबा असल्याशिवाय ते असामान्य कामगिरी
बजावू शकत नाहीत, हे अस्वस्थ करणारे वास्तव आहे .

शिवाय, नक्षलग्रस्त भागाचा विकास करायचा तर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नापेक्षाही इतर


अडथळेच अनेक आहेत. मुळातच शहरांपासून दूर, डोंगराळ भाग, निसर्गाची प्रतिकू लता आणि
सामाजिक मागासलेपण असलेल्या त्या भागात विकास करायचा असेल तर आधी पाणी, रस्ते, वीज
इत्यादी पायाभूत सुविधा पुरवाव्या लागतील, दळणवळणाची साधने निर्माण करून आरोग्य शिक्षण
या प्राथमिक गरजा भागवाव्या लागतील. मग रोजगारासाठी शेतीची किं वा लहान-मोठ्या उद्योग
व्यापाराची वाढ करावी लागेल. त्यासाठी स्थानिक राजकीय व सामाजिक नेतृत्व सक्षम असावे
लागेल. म्हणजे या भागाच्या कायापालटासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या राजकीय-सामाजिक
कार्यकर्त्यांची व प्रशासनातील स्वच्छ व कार्यक्षम अधिकाऱ्यांची 'फौज' असावी लागेल आणि या
प्रकारच्या विकासाला 'भांडवली विकास' व त्यासाठी काम करणाऱ्यांना 'प्रतिक्रांतिकारक' म्हणणाऱ्या
नक्षलवाद्यांचा प्रभाव प्राधान्याने कमी करावा लागेल.
साने गुरुजींना स्मरून,

'साधना' साप्ताहिकाने के ला आहे निर्धार... बालकु मार विशेषांकाच्या १,००,००० (एक लाख) प्रती

मुलांपर्यंत पोहोचविण्याचा!

त्यासाठी आम्हांला हवे आहे सहकार्य... शिक्षकांचे आणि शाळांचे.

बहुरंगी मुखपृष्ठ, आकर्षक चित्र-सजावट आणि मनोरंजक पण आशयसंपन्न मजकू र असलेला


किं मत : रु. २०/- सवलतीत रु.१०/

३६ पानांचा विशेषांक

: नोंदणीसाठी संपर्क :

साधना कार्यालय : 020-24451724

राजेंद्र बहाळकर : Mob. 9822596370

रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील शैक्षणिक संकु लातील दोन शाळांनी रामभाऊ तुपे व कदम
गुरुजी यांच्या सहकार्याने गेल्या वर्षी साधना बालकु मार विशेषांकाच्या ३६०० प्रती नोंदवल्या होत्या
आणि या वर्षी १०,००० प्रती नोंदवण्याचे आश्वासन दिले आहे . त्यातून प्रेरणा घेऊन हे अभियान
राबविण्याचा निर्धार के ला आहे .
पार्श्वभूमी : नक्षलवादी चळवळीची

इ.स. १९६७ पासून भारताच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रात नक्षलवाद हा शब्द प्रचलित झाला. अल्प
काळातच नक्षलवादी आंदोलन भारतात अनेक प्रदेशात पसरले. माओवादी साम्यवाद्यांचा हा जहाल
क्रांतिकारक गट अखिल भारतीय स्वरूपाचा नसला तरी त्याचे अस्तित्व, हालचाली, कारवाया, त्याचे
एक राजकीय-सामाजिक तत्त्वज्ञान या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर हे आंदोलन नगण्य तर
नाहीच, पण राजकीय नि राष्ट्रीय क्षेत्रात एक नवे आव्हान म्हणून त्या लढ्याला निश्चितच महत्त्व
प्राप्त झाले.

माओवादी क्रांतिकारकांच्या लढ्याची सुरुवात पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील 'नक्षलबाडी' या


ग्रामीण भागात झाल्यामुळे एकू णच लढ्याला 'नक्षलवादी आंदोलन' असे नामाभिधान प्राप्त झाले.
तेथून ही चळवळ भारताच्या अन्य प्रदेशात पसरली. भारतासारख्या विशाल देशाच्या एका
कोपन्यात एका ग्रामीण भागात, वरवर पाहता अनपेक्षित आणि राष्ट्रीय प्रवाहापासून अलिप्त असे
हे 'माओवाद्यांच्या नेतृत्वाखालील किसान आंदोलन' जसे प्रक्षोभक होते, तसेच भारतीय
कम्युनिस्टांची व एकू णच लोकशाही मार्गाचे अनुसरण करणान्या व मधूनमधून गरिबांच्या आर्थिक
प्रश्नांवरून आंदोलन करणाऱ्या पक्षांचीही झोप उडविणारे ठरले.

१९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षात मोठी फू ट
पडली. त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सी.पी.आय.) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष - मार्क्सवादी
(सी.पी.आय.एम.) असे दोन गट उदयाला आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मवाळ धोरण पक्षातीलच

एका मोठ्या गटाला मान्य नव्हते. आंध्र प्रदेशामधील पक्ष अधिवेशनात त्याचा पुढे स्फोट झाला.
पक्षनेतृत्वाने जहाल गटाचे म्हणणे फे टाळले. त्याचा परिणाम ज्योती बसू, रणदिवे वगैरेंनी पक्ष
सोडला आणि "मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष" या नावाचा अधिक कडवा पक्ष काढला. या नव्या पक्षाने
१९६७ च्या निवडणुकीत भाग घेतला तेव्हा "क्रांतीचा मार्ग टाकू न संसदीय मार्ग स्वीकारलात
काय?" असा प्रश्न या पक्षातील तरुण विचारू लागले. “बांगला काँग्रेस' या काँग्रेसमधील फु टील
गटाशी हातमिळवणी करून हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सत्तेवरदेखील आला. तेव्हा "आता कु ठे
गेली तुमची क्रांतीवरील निष्ठा?" असा रास्त प्रश्न विचारत चारू मुजुमदार, कानू संन्याल, विनोद
मिश्रा, महादेव मुखर्जी वगैरेंनी पक्ष सोडला आणि नव्या माओवादी (लेनिनवादी) पक्षाची घोषणा
के ली. या पक्षातून निर्माण झालेली चळवळ पुढे 'नक्षल चळवळ' म्हणून नावारूपाला आली.

या नव्या क्रांतिकारी पक्षाचे कें द्र उत्तर बंगालमधील 'नक्षलबाडी' क्षेत्रात होते. त्यावरून पुढे या
दहशतवादी गटाला 'नक्षलवादी गट' म्हणून संबोधण्यात येऊ लागले. नक्षलवाद या नावाला तसा
काही तात्विक अर्थ नव्हता. परंतु नक्षलवाद्यांच्या या लढ्याला अन्याय, जुलूम, शोषणाविरुद्धचा
सशस्त्र लढा असे रूप मिळाले. त्यातून जुलमी जमीनदार, निष्क्रिय राज्यकर्ते, भ्रष्ट शासकीय
अधिकारी व पोलीस अशा लोकांच्या हत्या या जहाल गटाकडू न के ल्या जाऊ लागल्या व दहशतीचे
नवे दालन या चळवळीने प्रस्थापित के ले.

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यामधील 'नक्षलबाडी' हे एक गाव आहे . नक्षल चळवळीचे


अध्वर्यू चारू मुझुमदार यांचे हे गाव. या गावाच्या नजिक बड़ा मणिराम जीत नावाचे एक गाव
आहे . या गावाहून काही तरुणांनी तांदूळ लुटू न तो शेजारील नेपाळ देशात नेऊन विकला. ही नक्षल
बंडाळीची सुरुवात होती. नागनजोत हे आणखी एक गाव या काळात गाजले. या गावचा जमीनदार
नागराय चौधरी हा वृद्ध आणि के वळ नावापुरताच जमीनदार होता. परंतु जमीनदारांविरुद्ध हा लढा
असल्याने यात पहिली आहुती या नागराय चौधरीची पडली. या गदारोळात नागरायची हत्या
नक्षलबाडीत झाली अशी वार्ता सर्वत्र पसरली. त्यामुळे बंडाळी करणाऱ्या या पक्षाच्या लोकांना
'नक्षलवादी' ही उपाधी कायमची चिकटली आणि त्यांच्या हिंसाचाराला 'वाद' असा तात्त्विक अर्थ

त्यांनीच लावला.

पश्चिम बंगालमधील नक्षलवादी चळवळ सलग तीन वर्षे टिकली. हजारोंचे बळी या हिंसाचारात
पडले. त्यात जमीनदारांपासून कोलकात्यातील सामान्य वाहतूक नियंत्रक पोलिसांपर्यंत सर्वांचा
समावेश होता. याच सुमारास पश्चिम बंगालमधील अनेक पक्षांचे संयुक्त सरकार कोसळले आणि
सिद्धार्थ शंकर रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेवर आली. त्यांनी आल्या आल्या काही
महिन्यांतच या नक्षल बंडाळीवर अक्षरश: वरवंटा फिरवला. साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर
झाला. चारू मुजुमदार पकडले गेले. कोलकात्यातील 'लाल बझार' तुरुं गात त्यांचा पुढे अंत झाला
आणि चीनच्या 'पीपल्स डेली' या वृत्तपत्राने "Spring Thunder over India" "तथाकथित क्रांती विझून
गेली" असे शेवटी वर्णन के ले.

नक्षलबाडीतील हा उठाव जरी फसला, तरी भूमिगत कार्यकर्त्यांनी आपापले स्वतंत्र अस्तित्व कायम
राखून क्रांती अद्याप संपली नसल्याची घोषणा के ली. परिणामी त्यातून अनेक नक्षलवादी गट
उदयास आले. वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक जनतेला स्थानिक प्रश्नांवरून भडकावण्याचे कार्यक्रम
सुरू झाले. भारत हा एक देश नसून यात अनेक देश आहेत, अशी 'अनेक राष्ट्रवादाची' नवी
संकल्पना पुढे आणण्यात आली. आज भारताच्या विविध भागात नक्षलवाद्यांचे सत्तावीस गट
कार्यरत आहेत. या सर्वांची हिंसाचारातून क्रांती घडवण्याच्या संकल्पनेवर निष्ठा आहे .

१९६७ मध्ये नक्षलवादी जनतेच्या शस्त्राने लढत होते. धनुष्यबाण व कु न्हाड अशी ती हत्यारे होती,
पण त्यानंतर परिस्थिती पालटली. अत्याधुनिक शस्त्रांनिशी नक्षलवादी सज्ज झाले. के रळ, आंध्र,
मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये त्यांचे सक्रिय कार्यकर्ते वाढले. शिवाय पंजाब,
काश्मीर आणि आसाममधील अतिरेकी कारवायांनी हा देश सतत पोखला जात असताना, त्यांना
कधी नव्हे अशी परिस्थिती अनुकू ल बनत गेली. १९६७ मधील त्यांचा उठाव मोडण्यास सरकारला
सैन्यास पाचारण करावे लागले आणि उठाव मोडण्यास तब्बल चार वर्षे लागली. आज देशभरात
दहा हजारांच्या आसपास नक्षलवाद्यांची सशस्त्र फळी उभी आहे . आदिवासी, शेतमजूर, काही
प्रमाणावर दलित यांची त्यांना सहानुभूती आहे . पोलिसही त्यांच्याविरुद्ध मनापासून कारवाई करीत
नाहीत, हे अनेक राज्यांतील परिस्थितीवरून स्पष्ट झालेले आहे . पाच-सहा टोपणनावे असलेल्या
आणि स्वतःचा पत्ता नसलेल्या नक्षलवाद्यांना पोलिसांनी पकडले तरी, त्यांच्या जामिनाचीही
तात्काळ व्यवस्था होते. पोलिसांच्या गाड्या जंगलात लांबवर जाऊ शकत नाहीत. स्थानिक जनतेचे
पोलिसांना सहकार्य मिळत नाही अशी आजची परिस्थिती आहे . "

•बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू , महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांतील काही

भागातून नक्षलवाद्यांनी चांगला जम बसविलेला आहे . शेतमजुरांची व आदिवासींची पिळवणूक,


जमीनदारी पद्धत, आर्थिक शोषण, स्थानिक राजकारण, विकासातील असमतोल, सरकारी खात्यातील
भ्रष्ट कारभार यामुळे या चळवळीला खतपाणी मिळत गेले आहे . नक्षलवाद्यांना लपून राहण्यासाठी
वेळोवेळी जंगलांचा आणि आदिवासींचा आधार घ्यावा लागतो. गरिबांसाठी

लढणारे ' अशी नक्षलवाद्यांनी प्रतिमा निर्माण के ल्यामुळे स्थानिक लोकही त्यांना मदत करतात.
देशाच्या अनेक भागात नक्षलवादी कार्यकर्ते समांतर न्यायव्यवस्था उघडपणे चालवत आहेत.
प्रस्थापित व्यवस्था व राज्यकर्त्यांविषयीच्या घृणेतून नक्षलवादी चळवळीने जोर धरला आहे .
जमीनदारांच्या जमिनी वाटपात सरकारला आलेले अपयश, आदिवासी मजुरांचे होणारे शोषण,
दुष्काळ व पूर या आपत्तींच्या वेळी सरकारकडू न दाखवली जाणारी निष्क्रियता यामुळे लोकांना
सरकारविषयी घृणा वाटणे व नक्षलवाद्यांबद्दल आत्मीयता निर्माण होणे स्वाभाविक आहे . यातूनच
अनेक जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव वाढला आहे .

मधल्या काळात त्यांचे भरपूर साहित्य बाहेर आले. भांडवलदार, मक्तेदार नववसाहतवाद,
प्रतिक्रांतिकारक, • प्रतिक्रियावादी अशा निवडक शब्दांचा वापर करून के लेली वाक्यरचना हे त्या
साहित्याचे वैशिष्ट्य होते. सामान्य जनांनाही नक्षलवाद्यांच्या भूमिके पेक्षा त्यांचे कार्यक्रम आणि
त्या कार्यक्रमातून स्वत:ला होणारा लाभ याच्याशीच प्रामुख्याने कर्तव्य असते. नक्षलवाद्यांची
कार्यपद्धतीही याच एका महत्त्वाच्या कें द्रबिंदूभोवती गुंफली गेली आहे .

नक्षलवाद्यांच्या सशस्त्र दलममध्ये ९ ते ११ तरुणांसोबत एक-दोन तरुणींचाही समावेश असतो. या


सर्वांना विविध शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे जंगलातील वाटा-आडवाटा
यांचीही माहिती दिली जाते. दोन-दोन दिवस अन्नावाचून जंगलामध्ये काढणे, दिवसाला चाळीस-
पन्नास किलोमीटर चालून जाणे अशा अनेक गोष्टींचा प्रशिक्षणात अंतर्भाव असतो. स्वीकारलेल्या
मार्गावरील 'असीम श्रद्धा व निष्ठा' यामुळे अविचल मनाने हे तरुण, तरुणी ही कामगिरी
स्वीकारतात. दलममधील तरुणांची वैषयिक भूक भागवण्यासाठी प्रत्येक दलममध्ये तरुणींची
योजना के लेली असती असे बोलले जाते, पण ते बरोबर नाही. तरुणींची योजना ही खास कामासाठी
अतिशय चाणाक्षपणे के लेली असते. प्रत्येक दलममध्ये एक कमांडर, एक डेप्युटी कमांडर व एक
पोलिटिकल प्रोपगंडीस्ट असतो. त्याच्या आज्ञेचे पालन विनातक्रार करणे हे दलमच्या प्रत्येक
सभासदाकडू न अपेक्षित असते. दलम् कमांडरला आपल्या वरिष्ठांच्या आज्ञा पाळणे बंधनकारक
•असते. धोरणात्मक निर्णय दलममध्ये घेतले जात नाहीत. पीपल्स वॉर ग्रुपची किं वा अन्य गटांची
कें द्रीय समिती हे निर्णय घेते. निर्णयांची अंमलबजावणी दलम्कडू न अपेक्षित असते आणि ती
तत्परतेने के ली जाते.

कमांडर, डेप्युटी कमांडर आणि ७ ते ९ सदस्य अशी साधारणत: ९ ते ११ नक्षलवादी सदस्यांची


टोळी असते. टोळीत एक किं वा दोन महिला असतात. त्यांना राजकीय प्रचारक म्हटले जाते.
टोळीतील सदस्यांची संख्या नेहमी विषम असते. त्यांना लोकशाही मान्य नसली तरी विविध
प्रश्नांवर ते अखेर मतदान घेऊन निर्णय करतात. चार-पाच टोळ्या मिळून एक गट तयार होतो. १५
ते २० गावांसाठी एक टोळी काम करते. १५ ते २० दिवसांत प्रत्येक गावात सभा होते.
सुरक्षिततेसाठी सभेच्या वेळी इतर एक-दोन टोळ्यादेखील त्या गावात येतात. महिला सदस्य आधी
येऊन सभेचा प्रचार करतात. काही वेळा हस्तलिखित भित्तीपत्रके लावून सभेचा प्रचार के ला जातो.
सभेत गावातील सावकार, दुकानदार, पुढारी, सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सरकारी अधिकारी,
प्रामुख्याने वन कर्मचारी आणि पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध, शोषणाविरुद्ध जहाल भाषणे के ली
जातात.

गटातील महिला साधारणत: त्याच गटातील एखाद्या नक्षलवाद्याची पत्नी असते किं वा कोणाशीही
तिचे नाते नसते. पण अद्याप तरी त्यांच्या संबंधांविषयी संशयाचे वातावरण नाही. गावातील
महिलांविषयीदेखील विकृ त दृष्टिकोन कु ठे ही नाही. त्यांच्या मुक्त संबंधांच्या चर्चा खऱ्या नसून ते
स्वैराचारी नाहीत. उलट अधिक संवेदनक्षम आहेत. त्यामुळे या नाजूक प्रश्नात झालेली थोडीशी
घसरण नक्षलवाद्यांविषयी अप्रीती निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.

आदिवासी नक्षलवाद्यांना 'अण्णा' म्हणजे भाऊ संबोधतात. आदिवासींना त्यांच्याबद्दल सहानुभूती


आहे , कारण एका बाजूला सावकार, व्यापाऱ्याबद्दल आणि दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांबद्दल त्यांना जो
राग आहे , संताप आहे , तो व्यक्त करण्याचे त्यांचेजवळ धाडस नाही, संघटना नाही. तेच काम अण्णा
करीत आहेत यात ते बरेच समाधानी आहेत.
एकीकडे ही जशी सहानुभूती आहे तशी दुसरीकडे भीतीही आहे . सभेला न येणान्याला विरोध
करणाऱ्याला नक्षलवादी मारझोड करतात. सभेला गेले नाही तर नक्षलवाद्यांची भीती आणि गेले
तर पोलीस चौकशीला येतात, माहिती विचारतात. माहिती दिली नाही तर पोलिसांचा मार, पुन्हा
माहिती दिली तर नक्षलवाद्यांचा मार अशा भयानक दहशत चक्रात आदिवासी अडकलेले आहेत.

(भारतीय प्रशासकीय सेवेतून गोविंद गारे यांनी निवृत्त झाल्यानंतर 'नक्षलवादी आणि आदिवासी'

(सुगावा प्रकाशन, पुणे) हे पुस्तक २००३ मध्ये लिहिले, त्यातील निवडक उतारे )

पण लक्षात कोण घेतो...

सुरेश द्वादशीवार

देशातील मोठी व विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे अजूनही नक्षलवाद्यांची वर्णने रॉबिनहूडसारखी


करतात आणि या प्रश्नाची जराही माहिती न घेणारे संपादक व लेखक त्यांच्या हिंसाचाराला
चळवळ म्हणून गौरविण्यात भूषण मानतात. तात्पर्य, नक्षलवाद्यांचा

शस्त्राचार, सरकारची उदासीनता, समाजाचा बेफिकीरपणा,

विचारवंत म्हणविणाऱ्यांकडू न के ला जाणारा अपप्रचार आणि आपल्या वाट्याला आलेले


संरक्षणशून्य दारिद्य अशा आपत्तीत या भागातील आदिवासींचा वर्ग अडकला आहे . त्याचे हे
नष्टचर्य ज्या दिवशी संपेल, त्या दिवशी त्याच्याएवढाच हा देश संपूर्ण व खऱ्या अर्थाने स्वतंत्र
होईल.

नक्षलवादाची लागण १९६०च्या दशकात प. बंगालच्या उत्तरेला असलेल्या नक्षलबारी या लहानशा


खेड्यात झाली. गेल्या ४५ वर्षांत त्या दहशततंत्राने देशाच्या किमान १५० जिल्ह्यांत आपल्या
अस्तित्वाची नोंद के ली. नागालँडपासून छत्तीसगडपर्यंत आणि नेपाळातील पशुपतीपासून दक्षिणेच्या
तिरुपतीपर्यंत या शस्त्रधारी चळवळीने आपला कमीअधिक जम कायम के ला. देशाच्या या टोकांना
जोडणारा व अरण्यप्रदेशातून जाणारा एक आडरस्ताही (कॉरिडॉर) त्यांनी या काळात स्वतःसाठी
तयार के ला. महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांतील पोलिस यंत्रणेने
साऱ्या शर्थीनिशी या आक्रमणाशी झुंज देत त्याला आपल्या जिल्ह्यांच्या सीमांवर थोपवून धरले
आहे . नक्षल्यांच्या दहशतवादाशी कराव्या लागलेल्या गनिमी युद्धात या शूर पोलिसांनी आपल्या
१३५ हून अधिक साथीदारांना शहीद झालेले पाहिले आहे .

नक्षलवाद्यांच्या चळवळीने एके काळी सामान्य माणसांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतानाच त्यांच्या
मनात आपल्याविषयी सहानुभूतीही निर्माण के ली. अरण्य प्रदेशात राहणाऱ्या गरीब, निरक्षर व
नेतृत्वहीन आदिवासींना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेऊन त्यांना न्याय नाकारणाऱ्या
व्यवस्थेविरूद्ध त्यांनी एक विधायक संघर्ष आरंभी उभा के ला. आदिवासींना रोजगार नाकारणाऱ्या
अधिकाऱ्यांना भीती घातली; त्यांना ठरलेली मजुरी न देणाऱ्यांना प्रसंगी कठोर वाटाव्या अशा शिक्षा
के ल्या. आदिवासी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या व्यापारी व अधिकाऱ्यांचे हात तोडू न त्यांना
कायमची अद्दल घडविली. इतिहास व भूगोल या दोहोंनीही आपल्यावर लादलेला अन्याय निमूटपणे
स्वीकारणाऱ्या आदिवासींना त्यातून आपली कधी सुटका होईल, असे तोवर वाटलेही नव्हते.
स्वाभाविकच नक्षलवाद्यांनी त्यांची बाजू घेतली तेव्हा आदिवासींनाही ते त्यांच्या प्रेषितासारखे
वाटले. या काळात नक्षलवाद्यांच्या बाजूने लिहिणाऱ्या व बोलणाऱ्या लेखक आणि कलावंतांचा एक
मोठा व स्वतःला प्रगतिशील म्हणवून घेणारा वर्गही उभा राहिला. या वर्गाने त्यांची प्रतिमा
रॉबिनहूडसारखी रंगविली. धनवंतांनी जुलूम जबरदस्तीने मिळविलेली मालमत्ता लुटू न ती उपेक्षित
व वंचितांच्या वर्गात वाटू न देणारे शूर लढवय्ये अशी नक्षलवाद्यांची वर्णने या भावड्या माणसांनी
लोकांसमोर आपापल्या परीने उभी के ली. (खुद्द प्रस्तुत लेखकाने त्याच्या 'हाकु मी' या कादंबरीतून व
त्या कादंबरीवर नंतर निघालेल्या 'लाल सलाम' या चित्रपटातून नक्षलवाद्यांची अशीच काहीशी
प्रतिमा रंगवली आहे .) आदिवासींच्या बाजूने लढणारे व त्यांच्यावर अन्याय लादणाऱ्यांना शिक्षा
करणारे , असे जोपर्यंत या चळवळीचे स्वरूप होते, तोपर्यंत तिच्याविषयी समंजस वर्गाने चिंता
बाळगण्याचेही कारण नव्हते.
चळवळीचे विध्वंसक रूप

आरंभी विधायक वाटलेली ही चळवळ १९८० च्या सुमारास विध्वंसक बनण्याची चिन्हे दिसू
लागली, ज्या धनवंतांविरुद्ध सुरुवातीला त्यांनी शस्त्र उगारले, त्यांच्याचकडू न नियमित खंडणी घेणे
व त्या रकमांच्या बळावर शस्त्रे खरेदी करून आपली दहशत वाढवित नेणे, असे तिचे स्वरूप या
काळात होताना दिसले. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या तीन जिल्ह्यांतील व्यापारी, उद्योगपती व
कारखानदार यांच्याकडू न हप्ते बांधून घेऊन त्या बळावर ही चळवळी माणसे पुरेशा इतमामानिशी
जगतानाही दिसू लागली. चंद्रपूर जिल्ह्यातील एक मोठा उद्योग समूह या चळवळीला दरवर्षी
काही कोटींची खंडणी देतो, असा सप्रमाण आरोप महाराष्ट्राच्या विधिमंडळातच के ला गेला.
नक्षलवाद्यांचा वावर अरण्यप्रदेशात असल्यामुळे व वनाधारित उद्योग त्या प्रदेशातून होणान्या
कच्च्या मालाच्या नियमित पुरवठ्यावर अवलंबून असल्यामुळे अशा उद्योगपतींना अडविणे व
त्यांच्याकडू न पैसा वसूल करणे, या गोष्टी नक्षलवाद्यांना सहजपणे जमणाऱ्या होत्या. व्यापारी व
नक्षलवादी यांच्यातील हे साटेलोटे पुढे एवढे वाढले, की नक्षलवाद्यांनी या वर्गाकडे पैशांऐवजी सरळ
शस्त्रे पुरविण्याचीच मागणी के ली. व्यापाऱ्यांनी आणि

वस्तू पुरविणे हे गावकऱ्यांचे कर्तव्य आहे व त्या घेणे हा आपला अधिकार आहे अशी भावना
त्यांच्यात बळावत गेली. दुसरीकडे नक्षलवाद्यांना जेवण वा वस्तू पुरविल्या म्हणून पोलिसांनी
आदिवासींना पकडणे व कबुलीजबाब घेण्यासाठी त्यांच्यावर करणे सुरू के ले. पोलिसांना माहिती
दिली, तर नक्षलवादी मारणार आणि नक्षलवाद्यांना जेवण दिले, की पोलिस मारणार, भरडला गेला.

आपत्तीत

आदिवासींचा नेतृत्वहीन वर्ग

उद्योगपतींनी नक्षल्यांना अशी शस्त्रे पुरविल्याचे अनेक पुरावे नंतरच्या काळात पोलिसांना
सापडलेदेखील. कें द्रीय गुप्तचर विभागाने नुकत्याच जाहीर के लेल्या आकडेवारीनुसार नक्षलवाद्यांचा
वार्षिक जमाखर्च १५०० कोटी रुपयांच्या पुढे जाणारा आहे . मेघालय, अरुणाचल, नागालँड, मणिपूर,
मिझोराम आणि त्रिपुरा या सर्व राज्यांचे मिळून होणारे अंदाजपत्रकही एवढ्या मोठ्या रकमेचे
नाही, ही गोष्ट लक्षात घेतली, की नक्षलवाद्यांच्या कारवायांचा आवाका के वढा मोठा आहे , हेही
ध्यानात येते.

या काळात या चळवळीतील सशस्त्र लोकांनी आदिवासींवरील आपली पकड कायम करण्यासाठी


त्यांच्यावर जुलूम लावायला सुरुवात के ली. आरंभी आदिवासी वस्त्यांनी आपल्याला अन्न व इतर
आवश्यक चीजवस्तू पुरविल्या पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे होते. त्या काळात या वस्तूंची किं मतही
ते गावकऱ्यांना देत. पुढल्या काळात या वस्तू पुरविणे हे गावकऱ्यांचे कर्तव्य आहे व त्या घेणे हा
आपला अधिकार आहे अशी भावना त्यांच्यात बळावत गेली. दुसरीकडे नक्षलवाद्यांना जेवण वा
वस्तू पुरविल्या म्हणून पोलिसांनी आदिवासींना पकडणे व कबुलीजबाब घेण्यासाठी त्यांच्यावर
अत्याचार करणे सुरू के ले. पोलिसांना माहिती दिली, तर नक्षलवादी मारणार आणि नक्षलवाद्यांना
जेवण दिले, की पोलिस मारणार, अशा दुहेरी आपत्तीत आदिवासींचा नेतृत्वहीन वर्ग भरडला गेला.
या वर्गाची बाजू घ्यायला या काळात कोणीही पुढे आल्याचे दिसले नाही. पोलिस बंदोबस्त तैनात
के ला, की आपली जबाबदारी संपली, असे शासनाने मानले आणि अरण्यप्रदेशातील आदिवासी
जीवनाची माहिती नसलेल्या समाजालाही त्यांच्याविषयी आपली काही जबाबदारी आहे असे कधी
वाटले नाही. देशभरची प्रसिद्धीमाध्यमे आदिवासींवरील अन्यायाला वाचा फोडण्यापेक्षा नक्षलवाद्यांनी
पोलिसांच्या चालविलेल्या ससेहोलपटीच्या सनसनाटी बातम्या प्रसिद्ध करण्यातच धन्यता मानत
राहिली. परिणामी, नक्षलवाद्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत गेला.

या आतंकाविरुद्ध सरकारने दाखल के लेले पोलिस दल पुरेसे नव्हते. पोलिसांना गनिमी लढ्याचे
प्रशिक्षण नव्हते; अरण्यातील युद्धाचा सराव नव्हता आणि नक्षलवाद्यांजवळ असलेल्या अत्याधुनिक
शस्त्रांच्या तुलनेत त्यांच्याजवळची हत्यारेही जुनी होती. झालेच तर बाहेरून येणाऱ्या पोलिसांना या
प्रदेशाची माहिती नव्हती आणि नक्षलवाद्यांजवळ असलेले राजकीय मनोबलही त्यांच्याजवळ
नव्हते. शांतता व सुरक्षेच्या सामान्य कामांत राहिलेली माणसे एकाएकी युद्धाच्या आघाडीवर
पाठविली, तर त्यांचे जे व्हायचे तेच आरंभी पोलिसांचेही झाले, नक्षलवाद्यांच्या 'राजकीय' भूमिके ला
उत्तर देण्याचा कार्यक्रम ना सरकारजवळ होता, ना देशातील कोणत्या राजकीय पक्षाजवळ त्यांच्या
आंदोलनामागे एक राजकीय विचारसरणी आहे , असे वेळीअवेळी सांगणाऱ्या विचारवंतांनाही त्या
विचारसरणीचे नेमके स्वरूप कधी सांगता आले नाही. त्यामुळे नक्षल्यांना समोरासमोरच्या वादात
व राजकीय स्पर्धेत ओढू शके ल असा नेता वा संघटनही या भागात कधी उभे राहिले नाही. एक
अपवाद राजे विश्वेश्वरराव यांचा. गडचिरोली भागातून लोकसभा व विधानसभेवर निवडू न आलेला
आदिवासींचा हा लोकप्रिय नेता आज हयात नाही; पण आपल्या हयातीत नक्षल्यांपासून सावध
राहण्याचा व ते आपले शत्रू आहेत, हे आपल्या अनुयायांना सांगण्याचा वसा त्यांनी सोडला नाही.
मात्र कोणत्याही अखिल भारतीय पक्षाची साथ नसल्याने व विश्वेश्वरराव राजकारणात
सरकारविरोधी भूमिका घेणारे असल्याने त्यांच्या लढतीचे स्वरूप एकाकी व दुर्लक्षितच राहिले.

•महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या छत्तीसगड या राज्यात नक्षलवाद्यांनी आता 'पर्यायी सरकार'

स्थापन के ले आहे . त्या राज्याचा उल्लेख ते 'मुक्त प्रदेश' असा करतात. छत्तीसगडपासून थेट
नक्षलबारी आणि नेपाळपर्यंत त्यांचे दळणवळण अबाधित सुरूही आहे . महाराष्ट्राच्या (व विशेषतः
विदर्भाच्या) दक्षिणेला असलेल्या आंध्रप्रदेशच्या तेलंगण या मुलखातही नक्षलवाद्यांचे प्राबल्य मोठे
आहे . छत्तीसगड आणि तेलंगण यांच्यातील दळणवळण गडचिरोली जिल्ह्यातून चालत असल्याने
या जिल्ह्याचा वापर नक्षलवाद्यांनी आपल्या दळणवळणाचा निकटचा मार्ग म्हणूनही के ला आहे .
या मार्गावर त्यांनी आपली ठाणी व दले उभी के ली आहेत.…

सलवा जुडू म

• नक्षलवाद्यांच्या आतंकाविरुद्ध सरकार व लोक यांना एकत्र आणण्याचा पहिला व मोठा प्रयत्न

छत्तीसगड या राज्यात सलवा जुडू म या चळवळीच्या रूपाने झाला. सरकार, विरोधी पक्ष आणि
स्थानिक आदिवासी या साऱ्यांनी मिळून नक्षलवाद्यांना आपल्या प्रदेशातून हुसकावून लावण्याचा
प्रयत्न या चळवळीच्या माध्यमातून के ला. मात्र अपुरे नियोजन आणि चुकीची दिशा यामुळे ही
चळवळ यशस्वी झाली नाही. आता तर ही चळवळ चुकीच्या मार्गाने व तेवढ्याच चुकीच्या
विचाराने के ली गेली, असा अभिप्राय सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे . सलवाजुडू म या चळवळीत
सरकारने आदिवासींच्या हाती बंदुका देऊन त्यांना नक्षल्यांविरुद्ध समोरासमोरच्या सामन्यात उभे
के ले. त्यांच्यासोबत काही तरुण राजकीय कार्यकर्ते, सामाजिक जाणिवा असलेले लोक व पोलिस
यंत्रणाही या लढ्यात सरकारने उतरविली. काही काळ प्रचंड गाजावाजा होऊन या चळवळीने देशाचे
लक्ष स्वतःकडे वेधले.

कें द्रीय गुप्तचर विभागाने

नुकत्याच जाहीर के लेल्या नक्षलवाद्यांचा वार्षिक जमाखर्च १५०० कोटी रुपयांच्या पुढे जाणारा
आहे . मेघालय, अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या सर्व राज्यांचे मिळून होणारे
अंदाजपत्रकही एवढ्या मोठ्या रकमेचे नाही, ही गोष्ट लक्षात घेतली, की नक्षलवाद्यांच्या
कारवायांचा आवाका के वढा मोठा आहे , हेही ध्यानात येते.

नक्षलवाद्यांना असलेला गनिमी युद्धाचा सराव, आदिवासी समूहांना त्याची नसलेली माहिती,
सहभागी नागरिकांना अरण्यप्रदेशाचा नसलेला अनुभव आणि एकू णच नियोजनाचा अभाव यांमुळे
सलवाजुडू मच्या वाट्याला अपयश येणे स्वाभाविक होते. या उपक्रमात तयारीहून उत्साह अधिक
होता. आदिवासींना त्यांच्या गावांतून काढू न सरकारी वसाहतीत (कॅ म्पस) आणून वसविण्याच्या
प्रकारावर आदिवासीच नाराज होते. त्यांतील गैरसायींवरही त्यांचा राग होता. सर्वांत गंभीर चूक ही,
की सरकारने या चळवळीत सहभागी झालेल्या लोकांना शस्त्रे दिली. शस्त्राचाराचा बंदोबस्त
करण्याची जबाबदारी ज्याच्या शिरावर आहे . त्या सरकारने स्वतःच लोकांना शस्त्राचार
शिकविण्याचा तो प्रकार होता.

लोकयात्रेचे अभियान

या संदर्भात विदर्भातील कार्यकत्यांनी नक्षलग्रस्त क्षेत्रात दि. २० मार्च २००५ ते १४ एप्रिल २००५ या
काळात काढलेली लोकयात्रा वेगळी ठरावी अशी होती. ही यात्रा नक्षलवादाविरुद्ध नसून
नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराविरुद्ध असेल, ही बाब प्रथम निश्चित करण्यात आली. महाराष्ट्रात पिपल्स
वॉर ग्रुपवर बंदी नाही. या चळवळीतील लोकांना राजकारणात सरळ व खुलेपणाने प्रवेश करता
येतो. ही चळवळ या क्षेत्रात येऊन जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर सत्तेची पदे हस्तगत करीत
असेल तर तिला कोणाचा विरोध नसावा. मात्र तसे न करता आपले मत व विचार बंदुकीच्या
जोरावर समाजावर लादण्याच्या तिच्या आचाराला लोकयात्रेचा विरोध असावा.

लोकयात्रेत कोणालाही प्रवेश घेता यावा. मात्र तिचे निमंत्रण कोणालाही दिले जाऊ नये.
अरण्यप्रदेशात व हिंसाचाराच्या विरोधात निघणारी यात्रा कशातही परिणत होण्याची शक्यता
असल्यामुळे तिच्यातील सहभागाचा नैतिक दबावही कोणावर टाकला जाऊ नये, ही गोष्ट निश्चित
करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या आसरअली या गावाहून ही
यात्रा सुरू व्हावी व निबिड अरण्यातून प्रवास करून ती गडचिरोलीला यावी. या प्रवासात
लागणाच्या लहानसहान गावांत नागरिकांशी संपर्क साधला जावा व त्यांना हिंसाचारापासून दूर
राहण्याची विनंती के ली जावी. अरण्याबाहेर असलेला नागर समाज तुमच्यासोबत आहे व तुमच्या
अडचणींची त्याला पूर्ण जाणीव आहे हे या भागातील लोकांना सांगितले जावे. अन्याय पोलिसांकडू न
झाला किं वा नक्षलवाद्यांकडू न झाला, तरी त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि नागरिक
म्हणून सबळपणे उभे राहिले पाहिजे. तुमच्या अशा प्रयत्नांत आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे यात्रेने
त्या प्रदेशातील आदिवासींना सांगायचे, इत्यादी गोष्टी आरंभी ठरविण्यात आल्या.

यात्रा जाहीर होताच तीत सहभागी होण्यासाठी अनेक गावांतून लोक पुढे आले. ही माणसे सामान्य
होती. त्यात कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते वा पुढारी नव्हते. काही सत्प्रवृत्त लोक आर्थिक मदत
घेऊनही पुढे आले. सुमारे ३०० हून अधिक लोकांनी यात्रेत येण्याची तयारी दर्शवली. प्रत्यक्षात
त्यातील २४५ लोक यात्रेत आले. त्यातील काही पूर्णकाळ तर काही एखाद्या आठवड्यासाठी तीत
सामील झाले. प्रत्यक्षात ही यात्रा २० मार्च ते १४ एप्रिल २००५ अशी २५ दिवसांची आखली गेली.

लोकयात्रा हे साधे प्रकरण नव्हते. नक्षलवाद्यांच्या धमक्या येत होत्या. त्यांची पत्रके निघत होती.
एटापल्ली परिसरात त्यांनी रस्त्यावर झाडे पाडू न रस्ते अडविण्याचा प्रयत्न के ला होता. दोन जागी
त्यांनी अतिशय मोठे सुरूं ग स्फोट घडवून आणले होते आणि यात्रेच्या मार्गातही सुरूं ग टाकू न
ठे वण्याचा प्रकार त्यांनी के ला होता. यात्रेत सहभागी झालेली सारी माणसे यांपैकी कोणत्याही
गोष्टीला भीक न घालता सारे दिवस अत्यंत धैर्याने व एकोप्याने चालत राहिली व गावकऱ्यांशी
अतिशय आत्मीयतेने बोलतही राहिली. सामान्य माणसांच्या असामान्य धाडसाचे दर्शनच या यात्रेने
सान्यांना घडवले. लोकयात्रेचा परिणाम दीड वर्ष टिकला. आपल्या विरोधात परवापर्यंतचे मुके
आदिवासी समोर येऊन बोलताना पाहून नक्षलवाद्यांनी त्यांचा हिंसाचार या काळात आवरल्याचे
दिसले. या यात्रेची ही उपलब्धी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनाही समोरासमोरच्या भेटीत
सांगितली.

१२ : साधना ६२वा वर्धापनदिन विशेषांक : १५ ऑगस्ट २००९

मात्र नंतरच्या काळात जे शासकीय व राजकीय कार्यक्रम या भागात घेणे आवश्यक होते, ते
सरकार व राजकीय पक्ष यांपैकी कोणीही हाती घेतले नाहीत. परिणामी पुन्हा एकवार नक्षलवादी
त्यांच्या हिंसक वळणावर गेलेले दिसले. याच काळात नक्षलवाद्यांनी स्वतःला माओवादी म्हणविणे
सुरू के ले. नेपाळमध्ये साडेतेरा हजार नागरिकांची हत्या करून माओवाद्यांनी त्या देशाची सत्ता
ताब्यात घेतली. त्या देशातील लोकशाही यंत्रणा व राजकीय पक्ष यांच्या बोटचेप्या धोरणाची ती
अपरिहार्य परिणती होती. नेपाळातील माओवाद्यांच्या या विजयाने हर्षभरित झालेल्या
नक्षलवाद्यांनी मग त्यांचेच हिंस्र तंत्र हाती घेतले.

पूर्वी पंधरा ते वीस जणांच्या टोळ्यांनी वावरणारे

नक्षलवादी आता शंभर ते तीनशेच्या

वावरू लागले

हतबल आहे .
तयारीनिशी उभे आहे असे कोणाला

नक्षलवाद्यांचा

घोळक्यांनी गडचिरोलीच्या आहेत. या आक्रमणाला तोंड देणारी पोलिस यंत्रणा अपुरी, अप्रशिक्षित
आणि तिच्यामागे सरकारही फारशा वाटत नाही. बंदोबस्त करण्यासाठी सहा राज्यांतील पोलिस
एकत्र येऊन चढाई करणार आहेत; त्यासाठी पोलिसांची स्वतंत्र दले उभी होणार आहेत; या दलांना
हवाई संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे यांसारख्या आश्वासनांवर विश्वासही बसू
नये असा त्यांचा आजवरचा इतिहास आहे .

नक्षलवाद्यांच्या क्रू रकर्मांसमोर पोलिस हतबल

ज्याला लक्ष्य बनविले, त्याला पूर्वी गोळ्या घालून ठार करणारे नक्षलवादी मग त्याला हातपाय
तोडू न, डोळे काढू न, कातडी सोलून ठार मारू लागले आणि इतरांना दहशत बसविण्यासाठी हा
हिंसाचार ते लोकांसमक्ष करू लागले. या हिंसाचाराची कारणेही हतबुद्ध करणारी आहेत. आदिवासी
मुलांनी सरकारी नोकरीत जाऊ नये असा •फतवा काढू न तशी नोकरी धरणाऱ्या अनेक तरुण
मुलांना नक्षलवाद्यांनी या काळात ठार के ले. मुलांनी शाळेत जाऊ नये यासाठी त्यांना जरब
बसविली गेली. ती न ऐकता शाळेत जाणाऱ्या मुलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या घरातील माणसांना
कापून काढण्याचा राक्षसी प्रकार त्यांनी अनेक ठिकाणी के ला. त्याहीपुढे जाऊन जंगलातली कामे
करू नका, सरकारी रोजी घेऊ नका, मोह वेचायला जाऊ नका यांसारखे आदेश काढू न
नक्षलवाद्यांनी आदिवासींवर सक्तीची उपासमार लादण्याचाही प्रयत्न के ला. या भागात असलेली
पोलिसांची ठाणी दूरदूर व अपुऱ्या शस्त्रांनिशी उभी आहेत. एटापल्लीच्या पोलिस ठाण्यापासून
अवघ्या दीड फर्लांगावर असलेल्या रस्ते बांधणान्या सीमावर्ती यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना
नक्षलवाद्यांनी ठार मारून त्यांची सारी यंत्रणा आगीच्या भक्ष्यस्थानी टाकली तरी त्या ठाण्याला
त्या सान्या प्रकाराचा साधा सुगावाही अखेरपर्यंत लागला नाही.

• गेल्या तीस वर्षांत नक्षलवाद्यांनी सातशेहून अधिक आदिवासी स्त्रिया आणि पुरुष अतिशय

क्रू रपणे मारले आहेत. या काळात त्यांची ताकद वाढलीही आहे . पूर्वी पंधरा ते वीस जणांच्या
टोळ्यांनी वावरणारे नक्षलवादी आता शंभर ते तीनशेच्या घोळक्यांनी गडचिरोलीच्या अरण्यप्रदेशात
वावरू लागले आहेत. या आक्रमणाला तोंड देणारी पोलिस यंत्रणा अपुरी, अप्रशिक्षित आणि हतबल
आहे . तिच्यामागे सरकारही फारशा तयारीनिशी उभे आहे असे कोणाला वाटत नाही. नक्षलवाद्यांचा
बंदोबस्त करण्यासाठी सहा राज्यांतील पोलिस एकत्र येऊन चढाई करणार आहेत; त्यासाठी
पोलिसांची स्वतंत्र दले उभी होणार आहेत; या दलांना हवाई संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यात
येणार आहे यांसारख्या आश्वासनांवर विश्वासही बसू नये असा त्यांचा आजवरचा इतिहास आहे .

मारल्या जाणान्या प्रत्येक पोलिसाच्या घरी सरकारने ठरवून दिलेली रक्कम पोहचती झाली, की
सरकारची जबाबदारी संपते आणि ठार झालेल्या आदिवासीला दोन लाख रुपये दिले, की
समाजालाही आपण आपले कर्तव्य पूर्ण के ले असे वाटू लागते. परिणामी एका गड़चिरोली जिल्ह्यात
हजारावर माणसे मारली जाऊनही महाराष्ट्र सरकारची कातडी जराही थरथरलेली कधी दिसली
नाही आणि मराठी समाजाला हा प्रश्न आपला आहे असेही जाणवल्याचे कु ठे आढळले नाही.
आदिवासींबाबत समाजाला असलेल्या बेपर्वाईतून हे होते, की अजूनही त्यांना मारणाऱ्या
नक्षलवाद्यांकडे क्रांतिकारक म्हणून पाहण्याच्या त्याच्या स्वप्नाळू मनोवृत्तीमुळे हे घडते हे
कळायला मार्ग नाही. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करायला तैनात असलेल्या पोलिस यंत्रणेलाही
त्यांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या आघाडीच्या संघटनांवर नियंत्रण ठे वता येत नाही आणि
त्यांच्याकडू न के ल्या जाणाऱ्या हिंसाचाराच्या समर्थनाचा प्रचार थांबविताही येत नाही. देशातील मोठी
व विशेषतः इंग्रजी वर्तमानपत्रे अजूनही नक्षलवाद्यांची वर्णने रॉबिनहूडसारखी करतात आणि या
प्रश्नाची जराही माहिती न घेणारे संपादक व लेखक त्यांच्या हिंसाचाराला चळवळ म्हणून
गौरविण्यात भूषण मानतात. तात्पर्य, नक्षलवाद्यांचा शस्त्राचार, सरकारची उदासीनता, समाजाचा
बेफिकीरपणा, विचारवंत म्हणविणान्यांकडू न के ला जाणारा अपप्रचार आणि आपल्या वाट्याला
आलेले संरक्षणशून्य दारिद्य अशा आपत्तीत या भागातील आदिवासींचा वर्ग अडकला आहे . त्याचे
हे नष्टचर्य ज्या दिवशी संपेल, त्या दिवशी त्याच्याएवढाच हा देश संपूर्ण व खऱ्या अर्थाने स्वतंत्र
होईल.

सुरेश द्वादशीवार

( काही काळ प्राध्यापक, नंतर 'लोकसत्ता' दैनिकाच्या नागपूर आवृत्तीचे संपादक..

सध्या दै . 'लोकमत' नागपूरचे संपादक. त्यांच्या 'हाकु मी'

या कादंबरीवर आधारित 'लाल सलाम' हा सिनेमा आला.

नक्षलवाद्यांच्या विरोधात काढलेल्या लोकयात्रेचे मुख्य प्रवर्तक.)

साधना ६२ वा वर्धापनदिन विशेषांक १५ ऑगस्ट २००९: १३

खरे आव्हान :

मूल्यवान साधनाने मूल्यवान साध्य प्राप्त करण्याचे

मेधा पाटकर

हिंसा-अहिंसा ही के वळ बंदिस्त मूल्ये नव्हेत तर व्यवहारात अवलंबिण्याचे मार्ग आहेत म्हणून


परिस्थितीजन्य सारासार विचार करून मार्ग ठरवावा लागतो, त्याला आपण रोखू वा टाळू शकत
नाही. 'लोकशाही' प्रणालीचा दृष्टिकोन कधी पुढे येतो व लोकांचाच हिंसेचा निर्णय असेल वा त्यांना
ती 'अपरिहार्य' वाटत असेल, तर ती नाकारणारे , तुम्ही कोण असा प्रश्नही के ला जातो. पण
परिस्थिती बदलण्याच्या अन्य मार्गांवर लढण्यातील त्रुटींविषयक आणि हिंसेचा मार्ग स्वीकारल्यावर
पुन्हा मागे वळता न येण्याच्या परिणामांवर, मात्र सहजासहजी विचार होत नाही. तसेच आधीच
हवालदिल, वंचित असलेल्या समाजाच्या हिंसक संघर्ष स्वत:हून (लोक-तांत्रिक मार्गाने) पुढे
नेण्याच्या व अंतिम उद्दिष्ट गाठण्याच्या क्षमतेबाबतही फारसा विचार होत नाही. प्रत्यक्ष लढताना,
निर्णय घेताना सारासार विचार कधी वगळला गेला तर समजू शकतो, परंतु दीर्घकालीन
परिवर्तनवाद्यांमध्ये मूल्याधिष्ठित व कृ तिशील • भूमिकाही नक्की करताना, हिंसा व अहिंसा
यामधील छोट्या-मोठ्या वा तात्कालिक प्रभाव •परिणामांच्या साध्याच्याही पार जाऊन काही
मानवीय उद्दिष्टांच्या चौकटीत विचार करावाच लागेल. माझ्या मताप्रमाणे असा विचार हा
अहिंसेकडेच वळतो, वळायला हवा.

नक्षलवादी, माओबादी आणि सशस्त्र संघर्ष देशातील उत्तरेपासून पूर्व-पश्चिम भागातही पसरल्याचे
वाचून आंतरराष्ट्रीय आतंकवादाइतकीच असुरक्षिततेची भावना येथील उच्च व मध्यमवर्गीयांच्या
मनात उभी राहते. आपल्या सुरक्षित आयुष्यात सरकार, व्यवस्था व समाज यांच्यात कमी-अधिक
तडजोडी करीत जगत असताना, कु ठे ही युद्ध सुरू झाले तरी ते शासनाधीन असेल तर •शासनावरच
सोडू न निश्चिंत राहू शकत असताना, ही समाजातच घुसलेली वा समाजाच्याच एका गटाकडू न
निपजलेली हिंसा मात्र घाबरवते आणि 'हे संपले, संपवलेच पाहिजे,' असा सूर उमटतो. शासनालाही
हिंसेला हिंसेने उत्तर देण्यास सुचवतो, चिथावतो. यातूनच छत्तीसगढ़, प. बंगाल, आंध्र प्रदेश वा
मणिपूर आणि काश्मीरमध्येही सरकारी प्रत्युत्तर सुरू होते. या अंतर्गत युद्धात शासन विरुद्ध
नक्षलवादी, माओवादी वा सशस्त्र संघर्षकारी असा लढा मर्यादित न राहता तो अनेक
जनसामान्यांचा, शांतिप्रियः नागरिकांचा अथवा पूर्वीचा सशस्त्र संघर्ष सोडू न व्यक्तिगत शांतीने
जगणाऱ्यांचाही बळी घेतो. आज हे चित्र देशाच्या कानाकोपऱ्यातून, नवनव्या क्षेत्रातून उमटते आहे
तसेच तेथील जनतेचा आक्रोशही नाही म्हणायला काही जनसंघटना, मानवी व नागरी अधिकारांच्या
रक्षणासाठी प्रयत्नशील संस्था, जनआंदोलने व सचित बुद्धिजीवीही; याविरुद्ध आवाज उठवताहेत तरी
समाजाने या सर्व घटनांना एकत्रित जोडू न, खोलात उतरून देश व समाज जातो आहे तरी कु ठे ,
याविषयी फारसा विचार के लेला दिसत नाही. अगदी एका आतंकवादी हल्ल्याबद्दल होते, तेवढीही
चर्चा यावर होताना दिसत नाही. याचमुळे कु ठल्या एका क्षेत्रातील घटना, घडामोडींबद्दल आपण
आपले अनुभव व मत सांगत गेलो तर प्रश्नच अधिक निपजतात, उत्तर व कृ ती क्वचितच !

छत्तीसगढमधून, दंतेवाडाहून हिमांशूचा एसएमएस दर दोन दिवसांनी येतो... १७ वर्षे जुन्या वनवासी
चेतना आश्रमावर बुलडोझर- नेस्तनाबूत; कोणा नामके कार्यकर्ता को एसपीओ से मारपीट, अब
सुखनाथला छत्तीसगढ़ विशेष सुरक्षा अधिनियमाम खाली अटक! लालगढमध्ये चक्रधर महातोचं
घर संपवल्याचा संदेश! विहिरीतही विष्ठा टाकू न पाणी नासवले....! माओवादी मानून अटके त
घेतलेल्या

लहान मुलांवर अत्याचार... खबर येतच राहते. हे सारे घडते आहे . त्या क्षेत्रांची विशेषता काय, त्यातून
निष्पन्न काय, या हिंसेची कारणमीमांसा काय आणि यातून रणनीती, परिवर्तनाची दिशा व मार्ग
तसेच संपूर्ण समाजाच्या व विशेष संवेदनशील व्यक्ती-समूह-संघटनांना अपेक्षित भूमिका काय हे
माहितीच्या आधारे व प्रत्यक्ष जवळ जाऊन समजून घेणे, गरजेचे आहे , तसेच आपल्या तात्त्विक,
मूल्यांच्या चौकटीत काही निर्णय घेणेही आवश्यक आहे .

छत्तीसगढ़ असो वा लालगढ ते झारखंड.... हा संपूर्ण आदिवासी भाग, 'मध्यवर्ती' वा 'मुख्य प्रवाह
मानल्या गेलेल्या समाजपासूनच भौगोलिकच नव्हे , सामाजिक-राजकीयदृष्ट्या विभक्त आहे . कु ठे
रस्ते पोहोचलेच तर तेथील पिढ्यान्पिढ्यांच्या आदिवासींना, कु ठे २ ते २० टक्के च साक्षरता (के वळ)
असलेल्या निवासींना तिथून हुसकावण्यासाठीच अधिक वापरले जात असल्याचा अनुभव आहे . जिथे
गावागावात प्राथमिक शाळा व शाळेत धड असा ब्लॅकबोर्ड पोहोचताना आयुष्य निघून जाते, तिथे
आदिवासींच्या जमिनी वा जमिनीखालचे पाणी व खनिज संपत्ती काढण्यासाठी, मिळवण्यासाठी,
त्यातून कोटीकोटींचा 'लाभ' घेण्यासाठी मात्र धनदांडगे गुंतवणूकदार व त्यांचे साथी सरकारही सहज
पोहोचते असा अनुभव आहे . या परिस्थितीत १०० दिवसांचा रोजगार वा रेशनिंगचीही भीक
मागण्यासाठी •लोकांना सरकारशी लढायला भाग पाडते. मूलभूत अधिकारांविषयी आग्रह व संघर्ष
उठलाच तर व्यवस्थेला आव्हान देणारे म्हणून के वळ झिडकारत नाही; के वळ विकासविरोधी हे
बिरूद लावून टाळत नाही, तर चिरडण्याचा नाहीच तर जायबंदी करण्याचा प्रयत्न करते.
महिनोन्महिने, वर्षानुवर्षे अगदी ठोस मागण्या व मुद्दे घेऊन लोक लढत राहतात. जसे लालगढचे.
चक्रधर महातोच्या घरात एखादा भाऊ माओवादी विचारांचा असेलही. पण चक्रधर महातोने
उभारलेला संघटित संघर्ष हा पूर्णत: सत्याग्रही' पद्धतीने पुढे जात असताना, त्याला मार्क्सवादी
सरकारने उत्तर सोडाच, चर्चेचे योग्य निमंत्रणही दिले नाही. हजारोंनी लोक ठाण मांडू न असताना
के वळ ज्युनिअर पोलीस अधिकाऱ्यांशी, तीही 'चौकी'वर येऊन चर्चा करण्यास भाग पाडू लागले.
त्याच काळात एखादी शक्तिशाली रॅली मोडण्यासाठी भय आणि अकांत पसरला. रात्री-बेरात्री घरात
घुसून 'माओबादींचा शोध' म्हणत महिलांवर लाठ्या बसरल्या, बेइज्जती के ली. छत्तीसगढमध्ये
जिंदाल, टाटा अशा सर्वांच्याच खाणी पसरत गेल्या व आदिवासींचे क्षेत्र हटत गेले. कलिंगनगरच्या
अंधारी पाड्यावर उभे राहून चारी बाजूंनी वेढलेले, सुमारे २० किलोमीटर दूर, चमकती रिंग दिसते,
ती या आदिवासींच्या हातातील संपत्ती ताब्यात घेऊन 'अधिकृ त कमाई' करणाऱ्यांच्या

'दीपावली'ची! हे पाहिले की १३ शहीद होऊनही आपले क्षेत्र

सरकार व संचारापासून तोडू न वेगळे करणारे आदिवासी कसे

झुंजताहेत. आपला हक्क, आपला 'लाभ' नव्हे तर आपला जीव व

जीवन वाचविण्यासाठी ते लक्षात येते. या सान्या धडपडीत

'सरकार' कु ठे ही 'मायबापा'ची भूमिका निभावत नाहीच, उलट

विविध कायद्याचा आधार घेत भांडवलाचीच साथ देते. त्यासाठी •एखादा कायदा अदिवासी
स्वशासन म्हणजेच पंचायत राज्य (अनुसूचित क्षेत्रासाठी विशेष) कायदा आड येत असेल तर
ग्रामसभेचा ठरावही बदलून घेण्याचा प्रकार, बस्तरमध्ये नगरनार प्रकल्पानिमित्त घडला, तसा
घडतो.
या परिस्थितीत कधी ना कधी, कु ठे ठिणगी पडते वा पडली जाते आणि तोच सत्याग्रही समाज
पेटतो वा पेटवला जातो. अहिंसक आंदोलनेही कु णा बाहेरून सहयोग, सहकार्य देणाऱ्यांच्या
हस्तक्षेपासह कधी तर निव्वळ स्थानीयच नेतृत्त्वाखाली कधी, अशी उभी राहतात. सशस्त्र संघर्ष
मात्र नेहमीच बाहेरून साथ, शस्त्रेही पुरवण्यावर अवलंबून राहतो. या मार्गावर अढळ विश्वास
असणारे के डर विविध मोर्चेबांधणीसह, जनशक्ती उभी करीत बदल आणण्याचा दावा करते. अनेक
गटा-उपगटात विभागले असले तरी एक बिरादरी मानते. नक्षलवादीप्रमाणेच जमिनीचे फे रवाटप वा
जमिनीचे संरक्षण कु ठलाही अजेंडा असला तरी 'अस्मिते' शीही, के वळ हक्कांशीच नव्हे , जोडू नच तो
अधिक पुढे येतो. त्यातून आग धगधगते. आरक्षणाच्या प्रश्नासाठी लढताना दलितांची अस्मिताही
पणाला लागते, त्यास पूर्णत: आक्षेप कसा घेणार व का? लालगढच्या आदिवासींनीही प्रश्न
अस्मितेचा अधिक हे सांगण्यास सुरुवात के ली व शासनाने क्षेत्रात येऊनच बोलणे करावे असा
आग्रह धरला. त्याच काळात लालगढ क्षेत्रात गेले असताना मला आढळली ती तिथल्या
सर्वसामान्य • महिलांची त्याही परिस्थितीत रोजी-रोटी, शांती मिळवण्याची ओढ. त्याला प्रतिसाद
मिळाला नाही, कारण शासनाची असंवेदना, प्रतिष्ठा, अविवेक. अशा परिस्थितीत सशस्त्र संघर्षाचा
मार्ग अनेकांना पटतो. हताशतेतून हिंसा हा मानवधर्म आहेच! समर्थन होते ते अत्यंत तात्विक व
मूल्यआधारितही. शासकीय हिंसा अनुभवणारे ती थोपवण्यासाठी जरूरी मानतात तर दुरून पाहणारे
काही शोषण, अन्यायाविरुद्ध संवेदना व्यक्त करतात. हिंसा-अहिंसाही के वळ बंदिस्त मूल्ये नव्हेत तर
व्यवहारात अवलंबिण्याचे मार्ग आहेत, म्हणून परिस्थितीजन्य सारासार विचार करून मार्ग ठरवावा
लागतो, त्याला आपण रोखू वा टाळू शकत नाही. 'लोकशाही' प्रणालीचा दृष्टिकोन कधी पुढे येतो व
•लोकांचाच हिंसेचा निर्णय असेल वा त्यांना ती 'अपरिहार्य' वाटत असेल, तर ती नाकारणारे , तुम्ही
कोण असा उलट प्रश्नही के ला जातो. पण परिस्थिती बदलण्याच्या अन्य मार्गांवर लढण्यातील
त्रुटींविषयक आणि हिंसेचा मार्ग स्वीकारल्यावर पुन्हा मागे वळता न येण्याच्या परिणामांवर, मात्र
सहजासहजी विचार होत नाही. तसेच आधीच हवालदिल, वंचित असलेल्या समाजाच्या हिंसक संघर्ष
स्वतःहून (लोक-तांत्रिक मार्गाने) पुढे नेण्याच्या व अंतिम उद्देश गाठण्याच्या क्षमतेबाबतही फारसा
विचार होत नाही. प्रत्यक्ष •लढताना, निर्णय घेताना सारासार विचार कधी वगळला गेला तर समजू
शकतो, परंतु दीर्घकालीन परिवर्तनवाद्यांमध्ये मूल्याधिष्ठित व कृ तिशील भूमिकाही नक्की
करताना, हिंसा व अहिंसा यामधील छोट्या-मोठ्या वा तात्कालिक प्रभाव ? परिणामांच्या
साध्याच्याही पार जाऊन काही मानवीय उद्दिष्टांच्या चौकटीत
साधना ६२वा वर्धापनदिन विशेषांक : १५ ऑगस्ट २००९:१५

विचार करावाच लागेल. माझ्या मताप्रमाणे असा विचार हा अहिंसेकडेच वळतो, वळायला हवा.

मात्र याबाबत चुकीची दिशा घेणाऱ्यांत आज के वळ चर्चा, विचारात गढलेले काही बुद्धिजीवीच नव्हे
तर सशस्त्र संघटित उतरणारे वा त्यांची पाठीराखण करणारे सर्व (नक्षलवादी, माओवादींतील
वेगवेगळे गट) आणि सरकारही सामील आहे . गरिबांच्या साथीला येऊन त्यांना न्याय देण्याच्या,
त्यांची साधने हिरावून घेणाऱ्यांना, भांडवलशहांना धडा शिकवण्याच्या वा संघटित शक्तीनेच, सशस्त्र
उठावानेही, व्यवस्था बदलण्याच्या ईयेने व प्रेरणेने, बांधिलकीनेही जे यात उतरतात, त्यांचे तरी
समजू शकते, (समर्थनीय होऊ शकले नाही तरी) मात्र शासन जेव्हा 'शासकीय' मार्ग सोडू न, 'राजकीय'
उपाय टाळून, सरळसरळ अंतर्गत युद्ध आरंभते, सेना उभी करते, तेव्हा ते शासक - प्रशासक उरतच
नाही. हे चित्र आज ठायीठायी दिसते आहे . सलवा जुडू म सेना तसेच उत्तर पूर्व भारतात कायम
स्वरूपात सशस्त्र दलास विशेषाधिकार देणारा कायदा लागू करूनही, शासन अत्याधिक अत्याचारी
व निव्वळ अविचारीही ठरते आहे . दिवसाला २ ते ३, बहुतांश निष्पाप लोकांचे एन्काऊं टर
मणिपूरमध्ये होते. वर्षानुवर्षे हॉस्पिटलमध्ये जायबंदी होऊन, खितपत पडलेल्या शर्मिला एरॉमच्या ७
वर्षीय उपोषणाची दखल घेण्यासच नव्हे तर अहिंसेचा संवैधानिक मार्ग अवलंबण्यात शासन
अपयशी ठरल्याचेच एक प्रकारे जाहीर होते. एकदा दारूचा प्याला • घेतला की भल्याभल्यांना
नशेवर नियंत्रण ठे वता येत नाही व दारू सोडवायचीच तर घोटाघोटाने कमी करीत सोडू शकत
नाही; तेच हिंसेच्या बाबतही खरे ठरते. नक्षलवादी परिवर्तनकारी असोत की शासकीय सेना वा
शासनप्रणित सलवा जुडू म सेना सर्वांनीच आपली मर्यादा सोडू न, हिंसा, बलात्कार व अहिंसक
आंदोलक वा जनता यांना निघृण भरडण्यापर्यंत मजल गेलेले आपण पाहतो. नंदिग्राममध्ये के वळ
सर्वांना आतील युद्धाची खबर देणाऱ्या, तीही दु:खाने अशा निष्पाप भूतपूर्व सेनाधिकाऱ्यांचे हातपाय
माओवादी म्हणून छाटले जातात. पक्षातर्फे ही 'सेने'चीच ताकद उभी के ल्यावर, कॅ डरही बेछू ट सुटतात.
हा अनुभव दुःखद असला तरी वास्तविक आहे . सीआरपीएफ वा आर्ल्ड फोर्सेस हेही आतंकवादी
ठरल्याची उदाहरणे कमी नाहीत. हिंसा हिंसेला काही काळ थोपवते, तर वेगवेगळ्या मार्गाने
फोफावते हेच खरे !
या साऱ्यात बळी जातो आहे हे राष्ट्र टिकवून धरणाऱ्या, इथल्या जनजनांना खाऊपिऊ घालणाऱ्या,
इथले नवनिर्माण, उत्पादन वा बांधकाम, सारे करणाऱ्या श्रमप्रतिष्ठा मानणाऱ्याच नव्हे राबवणाऱ्या
स्वतःच्या कु शल-अकु शल (?) योगदानातून इथले जीवन शोषण लूट-हिंसा-विनाशात सामील न होता
कार्यरत राहणाऱ्या जनतेचा यात बळी जातोय. जनतंत्र, जनवादी भूमिका, घटनेच्या चौकटीतील
जनआंदोलनाचाही विधानसभा वा संसदेतही उत्तर मिळवू शकत तेव्हा राज्यकर्त्यांनाही रस्त्यावर
उतरावे लागते, इथपत ठीक, परंतु राज्यकर्ते संसदीय भूमिका... जी संवादाची, समस्या निराकरणाची,
कायदेशीर संघर्षाची व राजकीय देवाण-घेवाणीचीच असायला हवी, न बजावता

१६ : साधना ६२वा वर्धापनदिन विशेषांक : १५ ऑगस्ट २००९

हिंसेचाच आधार घेतात, तेव्हा त्यांना काय म्हणावे, त्यांचे काय करावे, हा प्रश्न पडतो. 'राज्य' आज
एकीकडे वंचित करणारे तर दुसरीकडे

आक्रमण करणारेच अधिक आहे . मुठ्ठीभरांची मक्तेदारी व जुल्मदारी 'राज्य' व 'लोकशाही' 'विकास' या
नावाने बहुसंख्यांवर थोपवली जाते आहे . प्रतिनिधित्व न करताच, उपभोग घेत या 'लोकशाही',
'कायदेशीर' मुद्यांना मार्गांना विकृ त वळण ते देताहेत. भांडवलशहांची उघड साथ देताहेत,

राजकारणात उघड गुन्हेगारी वाढवताहेत. अहिंसक जनसंघटन, जनशक्तीलाच चिरडू पाहताहेत; काळे
कायदे आणताना नागरी अधिकारांचा ताळमेळ सोडू न वागताहेत; भीषण व बीभत्स अशी •
विषमता लाखो-करोडोंना भोगायला भाग पाडताहेत. या परिस्थितीत नक्षलवादी पद्धतीने की
माओच्या मार्गाने कु ठे आदिवासी, दलितांची जमीन तर कु ठे सत्ताही हासील करणे, 'स्वराज्य',
'स्वशासना'ची घोषणा देणे, कु ठे शोषकांना धडा शिकवणे हे प्रत्युत्तर दिले जाते आहे . यात गैर

काय असे कु णी विचारलेच तर नेपाळमध्ये माओवाद्यांनी व भारतात काही नक्षलवादी गटांनी


लोकशाही मार्ग स्वीकारला यात गैर नाही, जनशक्ती संघटित करून आव्हान देण्यात गैर काही
नाही, मात्र आर्थिक सामाजिकही हिंसेला हिसेंच्या दिशेने उत्तर देण्यात दीर्घ दृष्टीनुसार चूक होते
आहे . माओवाद वा नक्षलवाद या वादांचे अध्ययन त्यावर भाष्य त्याचा स्वीकार हाच कायद्याने
अपराध ठरू शकत नाही. जसे अमेरिके वर प्रेम करणारे वा इराकचे नागरिक असलेले अनेक लोक
बुश वा सद्दामची भूमिका मानतात म्हणून त्यांच्या त्यांच्या गुन्ह्यांचे जबाबदार होऊ शकत
नाहीत. मात्र हिंसा (के वळ आतंक वाद नव्हे ) करणारे . त्यांच्या हिंसेवर कायद्याने कारवाई करणे
नाकारू शकत नाहीत. त्यासाठी इंग्रजांचेच, आजही वापरात असलेले कायदे पुरेसे आहेत. फाशीच्या
सजेपर्यंतही (जी- १३१ देशांनी रद्द के ली, सोडली आहे ) जाण्याची गरज नाही- तीही हिंसेला हिंसेने
प्रत्युत्तर देण्याचाच प्रकार आहे म्हणून! त्यासाठी एकाही निरपराधीचा बळी जाऊ नये हे ब्रीदवाक्य
भिंतीवर लावून ठे वूनही नेमके तेच करावे हा निव्वळ 'पाशवी प्रशासना'चा प्रकार आवश्यक नाही.
शासकांनी •शासकासारखे जबाबदारीने वागायचे म्हणजे समस्या सोडवण्यासाठी कं बर कसायची.
खुला संवादाचा मार्ग 'सेवक' समजून पाळायचा. प्रतिष्ठा जनतेची, सत्ताधीशांची नसते, हे लक्षात
ठे वायचे. सन्मान मिळवायचा, के वळ मतांचे गठ्ठे व गाडीघोडे नव्हेत, तर सन्मानाचे वागायचे.
भ्रष्टाचार, अत्याचारांना स्वतः छाट देऊनच राज्य चालवायचे. हे होईल कधी, कसे? अगदी तसेच
परिवर्तन, के वळ व्यवस्थेचेच नव्हे मानवीय मूल्य व जीवनदर्शनाचेही आणू पाहणाऱ्या सर्वांनाच
आव्हान आहे . हे आव्हान आहे युद्धखोरी आपल्याच वंचितांवर न लादण्याचे, मूठभरांच्या नेतृत्वाने
सशस्त्र बलाने जनसामान्यांच्या जगण्यावर हल्ला न करण्याचे, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मूल्यवान
साधनानेच मूल्यवान साध्य प्राप्त करण्याचे!

मेधा पाटकर

मुलाखत

नक्षलवादाशी लढण्याचा फॉर्म्युला

महेश भागवत

'कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे' येथून सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी मिळविल्यानंतर, नोकरी

करीत सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून चार-पाच वर्षे वावरल्यानंतर, आय. ए. एस.
होण्यासाठी महेश भागवत यांनी यु. पी. एस. सी. ची परीक्षा दिली. परीक्षेत यश तर मिळाले, पण
आय. ए. एस. ऐवजी आय. पी. एस. साठी निवड झाली. 'पोलिस दलातील नोकरी हा आपला पिंड नाही'
हे लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा यु. पी. एस. सी. ची परीक्षा दिली, पण दुसऱ्या वेळीही आय. ए. एस.
ऐवजी आय. पी. एस. साठीच निवड झाली. आज ते आंध्रप्रदेशातील सी. आय. डी. चे डी. आय. जी.
आहेत. इ.स. २००१ ते २००४ या कालावधीत ते अतिशय अविकसित व आदिवासी बहुल अशा
'नक्षलग्रस्त' आदिलाबाद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक होते, तेव्हा त्यांनी नक्षलवादाच्या आव्हानाचा

ज्या पद्धतीने सामना के ला, त्यासाठी त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरविण्यात आले.
या मुलाखतीतून त्यांच्या धडाके बाज कृ ती कार्यक्रमांतील गुंतागुंत संपूर्ण उलगडलेली नाही, पण
दिशा मात्र स्पष्ट दिसते आहे .

- विनोद शिरसाठ

तुम्ही आय.पी.एस. झाल्यानंतर पहिली दोन वर्षं मणिपूरमध्ये पोलिस अधिकारी म्हणून काम
के लंत आणि त्यानंतर तुमची बदली आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक
म्हणून झाली. त्या जिल्ह्यात तुम्हांला सर्वांत मोठे आव्हान होते ते नक्षलवाद्यांचे. तर आधी हे
सविस्तर सांगा, की तोपर्यंत नक्षलवादाच्या प्रश्नाबाबतचे तुमचे आकलन कसे होते आणि तिथे
गेल्यानंतर त्यात काय बदल झाला ?

१९९५ साली आय.पी.एस. म्हणून निवड झाल्यानंतर मी प्रशिक्षणासाठी हैद्राबादच्या 'राष्ट्रीय पोलिस
अकादमी'त दाखल झालो, तेव्हा आम्हांला 'दहशतवाद', 'उग्रवाद' आणि 'नक्षलवाद' यांची ओळख
करून देण्यासाठी क्लासेस झाले. तेव्हाच 'नक्षलवाद' या विषयावर एका आय.पी.एस. अधिकाऱ्याने
आम्हांला सविस्तर माहिती दिली. तोपर्यंत मला नक्षलवादाच्या संदर्भात इतकीच माहिती होती, की
भारतातील काही तरुण तरुणी भारतीय भूमीत राहून बंदुकीच्या बळावर आहे ही व्यवस्था उलथवून
टाकू न नवे सरकार व नवी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्या संदर्भात खऱ्या
अर्थाने माहिती मिळाली, ती प्रशिक्षणाच्या दोन वर्षांच्या काळातच. प्रशिक्षण संपल्यावर माझी
नियुक्ती मणिपूरला आधी सहायक पोलिस अधीक्षक आणि नंतर •अतिरिक्त पोलिस अधीक्षक या
पदांवर झाली, तिथे मला उग्रवादाशी सामना करावा लागला, पण नक्षलवादाशी संबंध आला नाही.
मणिपूरमधील दोन वर्षे संपल्यानंतर १९९९ मध्ये मला आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यात तेथील
एस.पी. आणि डी. आय. जी. यांच्यासोबत दोन महिने राहण्यास सांगितले होते. आंध्र प्रदेशात नवीन
•पदाचा भार स्वीकारण्यापूर्वी आंध्र प्रदेश राज्याची संपूर्ण माहिती मला व्हावी, हा त्यामागचा उद्देश
होता. त्या दोन महिन्यांत मी रंगारेड्डी जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ज्या भागात हल्ले के ले होते
तिथे आणि ज्या ठिकाणी पोलिस शहीद झाले होते तिथे भेटी दिल्या आणि ते हल्ले कशा प्रकारे
झाले, का झाले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न के ला.

त्यानंतर महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणा प्रांतातील आदिलाबाद जिल्ह्याच्या


बेल्लमपल्ली विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक या पदावर माझी नियुक्ती झाली. तिथे माझा
नक्षलवादी चळवळीशी संबंध आला. सिंगरेनी या कोळसा उत्पादन करणाऱ्या कं पनीच्या क्षेत्रातील
काही कार्यकर्त्यांची 'सिकासा' नावाची शाखा होती, ती नक्षलवादी चळवळीतील 'पीपल्स वॉर ग्रुप'शी
संबंधित होती आणि तिचा प्रभाव

साधना ६२वा वर्धापनदिन विशेषांक १५ ऑगस्ट २००९: १७

बेल्लमपल्ली प्रांतात होता. 'पीपल्स वॉर ग्रुप' च्या नक्षलवाद्यांनी अनेक लहान-मोठ्या हिंसक घटना
घडवल्या होत्या, त्यांतली त्यावेळची मोठी घटना म्हणजे १९९९ च्या विधानसभा निवडणुकीच्या
काळात आदिलाबाद जिल्ह्यातील शिरपूर-कागजनगर या मतदारसंघाचे आमदार व त्यांचे चार
अंगरक्षक यांची हत्या झाली होती. शिवाय पोलिसांवर हल्ले करून त्यांची हत्यारे पळवणे, पोलिस
स्टेशनच्या इमारती उडवून देणे, शाळेच्या इमारती उद्ध्वस्त करणे, राज्य परिवहन मंडळाच्या
बसेस जाळणे, रस्त्यावरचे पूल उडवून देणे अशा नक्षलवाद्यांनी के लेल्या हिंसक घटना माझ्या
निदर्शनास आल्या.

मला असं वाटू लागलं की हे जे काही पोलिसिंग चाललं आहे ते चुकीच्या दिशेने जात आहे , यातून
आपला हेतू साध्य होणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखणं आणि विकासाला पोषक परिस्थिती
निर्माण करणं ही पोलिसांची जबाबदारी असते, पण तेथील नक्षलवाद्यांच्या हिंसक घटना पद्धतीने
पोलिसांकडू न प्रत्युत्तर दिलं जाणं, यामुळे सतत अस्थिरता राहते आहे , परिणामी नाही.

आणि त्याच

अशा घटना घडत होत्या तेव्हा पोलिसांकडू नही त्यांना प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन्स' पार पाडली
जात होती, जंगलात पोलिसांची शोधपथकं जाऊन गोळीबार करत होती. तेव्हा माझ्या लक्षात आलं
की हे काम के वळ 'फायर फायटिंग'चं आहे . त्याच वेळी माझ्या हेही निदर्शनास आलं, की पोलिसांची
पथकं नक्षलवाद्यांच्या शोधात जंगलात फिरतात तेव्हा जंगलातील व आसपासच्या गावांतील लोक
'पोलिस आपल्याला पकडू न नेतील' या भीतीमुळे पळून जातात आणि गावं रिकामी होतात. गावात

फक्त महिला किं वा लहान मुलं राहतात. काही गावांतील संशयित तरुणांना त्यांचे नक्षलवादाशी
असलेले संबंध तपासण्यासाठी पोलिस अटक करून घेऊन जातात, तेव्हा गावातील महिला व पुरुष
प्रतिकार करतात. पोलिस आणि जनता यांच्यात सुसंवादच दिसून येत नाही, शिवाय, पोलिस
मुख्यालयावर मोर्चे येतात, धरणे आंदोलनं के ली जातात. तेव्हा मला असं वाटू लागलं की हे जे
काही पोलिसिंग चाललं आहे ते चुकीच्या दिशेने जात आहे , यातून आपला हेतू साध्य होणार नाही.
कायदा व सुव्यवस्था राखणं आणि विकासाला पोषक परिस्थिती निर्माण करणं ही पोलिसांची
जबाबदारी असते, पण तेथील नक्षलवाद्यांच्या हिंसक घटना आणि त्याच पद्धतीने पोलिसांकडू न
प्रत्युत्तर दिलं जाणं, यामुळे सतत अस्थिरता राहते आहे . परिणामी विकासाला पोषक परिस्थितीच
निर्माण होत नाही. विकासाची जी काही थोड़ी कामं चालू असतात, ती पण नीट होत नाहीत.
नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे सरकारी अधिकारी नोकरदार ग्रामीण भागात जायला तयार होत नाहीत,
त्यामुळे अनेक सरकारी योजनांची अंमलबजावणीच होत नाही. काही लोक तर या परिस्थितीचा
गैरफायदाही घेत आहेत, म्हणजे नक्षलवाद्यांच्या भीतीचे कारण सांगून नोकरदार तिकडे जाणे
टाळत आहेत. उदाहरणार्थ: ग्रामीण भागातले शिक्षक, रोजंदारीवर लावल्यासारखे हजार रुपये पगार
देऊन एखादा नववी-दहावी झालेला मुलगा शाळा चालवायला ठे वीत आणि स्वतः मात्र कॉन्ट्रॅक्टरचं
काम करीत किं वा राजकारण करीत. प्राथमिक आरोग्य कें द्रातील डॉक्टर्सही असंच करीत. याचा
फायदा घेऊन नक्षलवादी गावात येऊन लोकांना सांगायचे, 'बघा, स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली
तरी तुमच्या गावात रस्ता नाही, वीज नाही; शाळा आहे , पण शिक्षक नाही आणि तालुक्याच्या
ठिकाणी दवाखाना आहे , पण डॉक्टर नाही. म्हणजे सरकारला तुमच्या विकासात रस नाही; त्यांना
के वळ जमीनदार- सावकार, कारखानदार भांडवलदार यांच्यातच रस आहे . म्हणून तुम्ही आमच्या
चळवळीला पाठिंबा द्या.' हा प्रचार बरोबर आहे की चुकीचा, हे जाणून न घेता, काही तरुण त्यांना
सामील होत. त्यांतले काहीजण बंदुकीच्या भीतीने, काहीजण बंदुकीच्या आकर्षणाने तर काहीजण
सरकारच्या विरोधातील गाण्यांमुळे प्रभावित होऊन नक्षलवाद्यांच्या बरोबर जात असत. त्यांतले
बहुतांश तरुण निरक्षर होते.

नक्षलवाद्यांच्या विरोधात के वळ 'फायर फायटिंग'चं काम चालू आहे आणि जे काही पोलिसिंग
चाललं आहे ते चुकीच्या दिशेने, हे लक्षात आल्यावर पोलिस दलात सुधारणा हेच मोठं आव्हान
तुम्हांला वाटलं असेल, त्याचा सामना कसा के ला?

विकासाला पोषक

परिस्थितीच निर्माण होत

मी विचार करू लागलो आणि 'ही परिस्थिती बदलता येणं शक्य आहे ', असं मला वाटू लागलं.
कारण मी स्वत: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा १९९० ते १९९५ अशी पाच वर्षे कार्यकर्ता
होतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्र विकासाच्या चळवळीतही मी तीन वर्षं काम के लं
होतं; अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीच्या धर्तीवर पाणलोट क्षेत्राचा विकास व्हावा अशा प्रकारची ती
चळवळ होती. शिवाय, मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनातही धावती भेट घेतली होती. सरदार
सरोवरात बडोद्याजवळील मणिबेली हे पहिलं गाव बुडालं, तेव्हा सरोवराच्या विरोधात जे आंदोलन
झालं त्यात सहभागी होऊन मी शुल्पानेश्वराच्या मंदिरात तीन दिवस उपोषण के लं होतं.

या सर्व चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आलेला अनुभव माझ्या पाठिशी होता. त्यामुळे सरकारच्या
विरोधी चाललेल्या या नक्षलवादी आंदोलनांना काहीतरी पर्याय आपण शोधू शकू असा
आत्मविश्वास मला वाटत होता. म्हणून त्या भागातील शरण आलेले नक्षलवादी किं वा काही वर्षे
नक्षलवाद्यांबरोबर राहून नंतर बाहेर आलेले कार्यकर्ते यांच्याशी मी संवाद सुरू के ला. त्यांच्याशी
चर्चा करताना काही 'मूलभूत' गोष्टी मला शिकायला

१८ : साधना ६२वा वर्धापनदिन विशेषांक १५ ऑगस्ट २००९

मिळाल्या. त्यांनी सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे, पोलिस खाते आणि एकू णच सर्व
सरकारी खात्यांतील अधिकारी जनतेशी ज्या पद्धतीने वागतात ते पाहिले तर, आदिवासींची संस्कृ ती
जपून त्यांचा विकास व्हावा असे या सरकारी अधिकाऱ्यांना वाटतच नाही. 'सरकारकडू न आलेली
योजना तुम्हांला घ्यायची तर घ्या असा बेफिकीरपणाचा भाव या अधिकाऱ्यांमध्ये दिसून येतो,
त्यामुळे त्या योजनांना जनतेकडू न प्रतिसाद मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याचशा योजनांमध्ये
दलाल निर्माण झाले आहेत. ते दलाल हटवून सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत
पोहोचल्या पाहिजेत, म्हणजे 'गुड गव्हर्नस' लोकांना दिसलं पाहिजे. 'हे सरकार आपल्यासाठी आहे '
असा विश्वास लोकांना वाटला, तरच ते नक्षलवादी चळवळीपासून दूर जातील, हा विचार मला
नक्षलवाद्यांकडू न परत आलेल्या लोकांकडू न कळला.

चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आलेला अनुभव माझ्या पाठिशी होता. त्यामुळे सरकारच्या विरोधी
चाललेल्या या नक्षलवादी आंदोलनांना काहीतरी पर्याय आपण शोधू शकू असा

आत्मविश्वास

मग हा विचार प्रत्यक्षात कसा आणायचा, या दिशेने मी विचार करू लागलो. त्यातून लक्षात आलं,
आधी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील पोलिस यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे . आमचे पोलिस
जंगलात जायचे तेव्हा त्यांचा संबंध आदिवासी लोकांशी यायचा, म्हणून या पोलिस दलातील
लोकांना सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात के ली. म्हणजे आदिवासी संस्कृ तीची ओळख
करून द्यायला सुरुवात के ली त्यात आदिवासींबरोबर संबंध आला तर 'काय करायचं आणि काय
करायचं नाही' याबाबतच्या ठोस सूचना होत्या. उदाहरणार्थ, गोंड आदिवासी एकमेकांना भेटतात
तेव्हा प्रथम 'राम राम' म्हणतात. त्यामुळे 'आदिवासी भेटला तर स्वतःहून आणि प्रथम 'राम राम'
म्हणायला शिका; त्याशिवाय तुमचा संवादच नीट होणार नाही' हे पोलिसांना बजावलं. आदिवासींना
त्यांच्या घरात बाहेरचा माणूस चपला-बूट घालून आलेलं अजिबात आवडत नाही, म्हणून
आदिवासींच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या चपला किं वा बूट बाहेर काढू न ठे वा, हेही पोलिसांना
सांगितलं, आदिवासींशी चर्चा सुरू करताना त्यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या मुलांविषयी विचारा; तो
एक माणूस आहे आणि तुम्हीही माणसंच आहात, असा विश्वास आदिवासींना वाटला पाहिजे.
आदिवासी लोक हे निष्पाप आहेत, सरकारी अधिकारी तिथे जात नसल्यामुळे , आणि गेले तरी नीट
वागणूक देत नसल्यामुळे ते लोक नक्षलवादी चळवळीकडे वळताहेत, म्हणून पोलिसांना आपले
वर्तन सुधारण्याचे महत्त्व शिकवले. आदिवासी परंपरा, त्यांची संस्कृ ती यांचे निरीक्षण करून त्यांचा
आदर करण्याबाबतचे प्रशिक्षण पोलिसांना व अधिकान्यांना दिले.

मला वाटत होता.

म्हणून त्या भागातील शरण आलेले

'फायर फायटिंग'चं काम करणाऱ्या पोलिसांना थेट दुसऱ्या टोकाला जाऊन 'राम राम' म्हणायला

शिकवलं, पण त्यांना ते पचवता आलं?

नक्षलवादी किं वा काही वर्षे

नक्षलवाद्यांबरोबर राहून नंतर बाहेर आलेले कार्यकर्ते यांच्याशी मी संवाद सुरू के ला. त्यांच्याशी
चर्चा करताना काही 'मूलभूत' गोष्टी मला शिकायला मिळाल्या.
'मी कोसम' (पोलिस तुमच्यासाठी) या नावाच्या योजनेने 'कम्युनिटी पोलिसिंग' करण्यास प्रारंभ

के ला, त्यामध्ये आदिवासींच्या नेमक्या समस्या काय आहेत, वर्षानुवर्षे काम करीत असून त्यांची
स्थिती का सुधारत नाही, सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत का पोहचत नाहीत, याबाबत जाणून
घेण्यास पोलिसांना सांगितले. हे काम पोलिस स्टेशनमध्ये बसून कळणार नाही, म्हणून गावात व
आदिवासी वस्त्यांवर सकाळी लवकर किं वा संध्याकाळी जा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्या
समस्या जाणून घ्या, त्या कशा सोडवायच्या हे आपण नंतर ठरवू, अशा सूचना पोलिसांना दिल्या.

ग्रामसभांमधून सर्वप्रथम निदर्शनास आले ते म्हणजे त्यांना आरोग्याच्या सर्वांत जास्त समस्या
आहेत. तालुक्याच्या गावात प्राथमिक आरोग्य कें द्र असते, पण तिथे डॉक्टर नसतो. गावात कोणी
तरी भोंदू डॉक्टर येऊन कसल्या तरी गोळ्या-औषधे देतात आणि तांत्रिक-मांत्रिकांचाही सुळसुळाट
झाला होता. म्हणून आम्ही सर्वप्रथम आरोग्य शिबिरं आयोजित करायला सुरुवात के ली. त्यासाठी
जिल्हा आरोग्य कें द्र, मेडिकल कौन्सिल, शहरातील मोठे डॉक्टर्स आणि काही समाजसेवी संस्था
यांची मदत घेतली. मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि स्त्रियांचे व मुलांचे आजार यांबाबत मोफत
औषधोपचार सुरू के ले. बऱ्याचशा आदिवासींची मागणी होती की 'आम्हांला टॉनिक पाहिजे', त्यांना
ते द्यायला सुरुवात के ली. नंतर आरोग्य कें द्रातील अधिकारी आठवड्यातील चार ते पाच दिवस
तिथे असले पाहिजेत, अशी सक्ती करणारे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढावेत अशी विनंती के ली.
त्या काळात ११० मोठी आरोग्य शिबीरं आम्ही घेतली, जवळपास दीड लाख लोकांना त्याचा फायदा
झाला. एक हजार लोक मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून नवी दृष्टी घेऊन परत गेले. नऊ लहान
मुलांना हृदयविकारासंबंधीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पोलिस व जनता यांनी निधी जमा के ला.

● आरोग्य शिबिराच्या ठिकाणी आम्ही पोलिसांची पथकं घेऊन जायचो, त्यात गाणी म्हणणारी

पोलिसांची पथकं ही असायची. त्या पथकाच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांची माहिती
देणं सुरू के लं. नक्षलवादी चळवळीत तुमची मुलं गेल्यानंतर तुमचं आणि त्या मुलांचं किती
नुकसान होत आहे , हे आम्ही गाणी व भाषणांच्या माध्यमातून सांगू लागलो. त्याचबरोबर
नक्षलवादी चळवळीत ज्यांची मुलं आहेत त्यांच्या
साधना ६२वा वर्धापनदिन विशेषांक : १५ ऑगस्ट २००९:१९

कु टुंबियांशी, नातलगांशी आम्ही संवाद साधू लागलो. ती मुलं बाहेर आली तर त्यांच्या पुनर्वसनाची
जबाबदारी सरकार स्वीकारेल, किरकोळ गुन्हे माफ के ले जातील अशी आश्वासनं देऊ लागलो. त्या
शिबिराच्या वेळीच ग्रामीण भागातील शाळांत शिक्षक जातच नाहीत, ही मोठी समस्या पुढे आली.
अनेक शिक्षक दुसऱ्या मुलांना रोजंदारीवर शाळेत शिकवायला पाठवतात, म्हणजे फसवणूक
करतात. त्यामुळे आम्ही भारतीय पिनल कोडच्या ४१७ आणि ४२० कलमानुसार के सेस नोंदवल्या.
के वळ सहा शिक्षकांना अटक के ल्याबरोबर जिल्ह्यातील सर्व शिक्षकवर्गात खळबळ उडाली आणि
मग शिक्षकांच्या संघटना जाग्या झाल्या, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सर्व शिक्षक
रोज व वेळेवर हजर राहतील याची दक्षता घेऊ असं सांगितलं.

आरोग्य आणि शिक्षण यांच्यानंतर प्रश्न आला पिण्याच्या पाण्याचा. काही ठिकाणी बोअर होते, पण
त्यांना पाणी नव्हते. तेथे बोअर रिपेअरिंगचे काम शासनाने हाती घेतले आणि काही ठिकाणी
नवीन बोअर घेतले. चौथा प्रश्न आला बीजेचा. अनेक गावांमध्ये वीज पोहोचलीच नव्हती.
त्यानंतरचा प्रश्न, रस्ता नव्हता आणि एस.टी. नव्हती. त्या भागात चोरपल्ली नावाचं एक दुर्गम असं
गाव होतं. (पल्ली म्हणजे गाव) ते चोरांसाठी प्रसिद्ध होतं. ते गाव नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला
म्हणूनच ओळखलं जात होतं. तिथल्या लोकांचा नक्षलवाद्यांना मोठा पाठिंबा होता. त्या गावाच्या
आसपास मोठं जंगल होतं आणि गावातील अनेक लोक जंगलातील झोपड्यांमध्ये राहात होते. त्या
गावात आम्ही 'पोलिस तुमच्यासाठी' या अभियाना अंतर्गत एक सभा घेतली, तेव्हा लक्षात आलं या
•लोकांना राहायला घरंच नाहीत. त्यावेळी आमच्या सोबत जिल्ह्याचे आदिवासी विकास प्रकल्प
अधिकारी होते, त्यांनी त्याच सभेत त्या गावासाठी पन्नास घरे सरकारी योजनेतून मंजूर के ली.
तिथे वीज नव्हती, म्हणून नऊ किलोमीटर अंतरावरून महिनाभरात वीज आणली गेली. रस्ता
सरकारकडू न व श्रमदानातून के ला आणि एस.टी. बस सुरू के ली. म्हणजे अवघ्या दीड महिन्यात
घरे , वीज, बस यांमुळे त्या गावातील लोकांचा पोलिसांवर विश्वास बसला. त्यामुळे पूर्वी ज्या
गावातील लोक पोलिस आल्यावर पळून जायचे, त्याच गावातील लोक पोलिसांनी आपल्या गावात
यावे, यासाठी प्रयत्न करू लागले. अनेक गावांतून मागणी वाढू लागली - 'आमच्या गावातही सभा
घ्या.' मग मी कोसम' म्हणजे 'पोलिस तुमच्यासाठी' हे अभियान अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात
राबवले गेले. मेडिकल कैं पनंतर आम्ही व्हेटर्नरी कैं प सुरू के ले. त्यानंतर 'निरू मिरू' म्हणजे 'पाणी
आणि आपण' हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. तलावातला गाळ काढू न घेतला तर ते
शेतीसाठी उत्तम खत होईल आणि अधिक पाणी साठवता येईल हे आम्ही पटवून दिले, तेव्हा लोक
स्वतःहून गाळ काढण्यासाठी पुढे आले. तो प्रकल्प सुरू करण्यापूर्वी गावात आम्ही बैठका घेतल्या,
आमची कलापथकं सरकारच्या योजना सांगत आणि गावकऱ्यांना नक्षलवादी चळवळीपासून दूर
करण्याचा प्रयत्न करीत..

आदिवासींच्या

नेमक्या समस्या काय आहेत, वर्षानुवर्षे काम करीत असून त्यांची स्थिती का पोहचत नाहीत,
याबाबत जाणून म्हणून गावात व आदिवासी वस्त्यांवर सकाळी लवकर किं वा संध्याकाळी जा,
त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्या समस्या जाणून घ्या, त्या कशा सोडवायच्या हे आपण नंतर ठरवू,
अशा सूचना पोलिसांना दिल्या.

सुधारत नाही, सरकारच्या

त्यांच्यापर्यंत का

घेण्यास

पोलिसांना

सांगितले. हे काम
पोलिस

स्टेशनमध्ये बसून

कळणार नाही,

'कम्युनिटी पोलिसिंग' या योजनेला गावातील तरुणांचा प्रतिसाद कसा होता?

गावातील बहुतांश युवक असे होते, जे गावाच्या बाहेर कधी पडलेच नव्हते, 'पकडायला येणारे
पोलिस म्हणजेच सरकार', असं ते मानत होते. त्यांना खरं सरकार माहीतच नव्हतं. म्हणून आम्ही
त्यांना गावाबाहेरचं जग दाखवायचं ठरवलं. त्यांच्या सहली काढायला सुरुवात के ली. एस. टी.
बसमधून गावातील मुलं-मुली यांना हैद्राबादची सहल घडवली. तिथे विधानभवन, न्यायालय, पोलिस
आयुक्तालय अशी ठिकाणं दाखवली. गृहमंत्री, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी,
प्रकल्प अधिकारी, महामंडळांचे अध्यक्ष यांच्या भेटी घडवल्या. या सर्वांनी गावासाठी असलेल्या
योजना सांगितल्या. 'हे सर्व तुमच्या गावात येऊ शकतं, हा विश्वास दिला.

विकासाचे देवदूत अशा या मुलांकडू न वेगवेगळ्या गावांमध्ये योग्य संदेश पोहोचला. आमचे हात
सर्वत्र अपुरे पडत होते, पण आता अशा तरुण मुला-मुलींच्या पुढाकाराने अनेक प्रकल्प राबविणे
सोपे होऊ लागले आणि दलाली व्यवस्था पूर्ण बंद झाली. त्यानंतर आम्ही पोलिस आणि गावकरी
यांच्यात कबड्डी, हॉलिबॉल या खेळांचे सामने वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित करायला सुरुवात
के ली. याचे कारण तरुण मुला-मुलींच्या व इतरांच्याही मनातील पोलिसांबद्दलची भीती घालवणे
आवश्यक होते. खेळात जिंकणाऱ्यांना उत्तम खेळणाऱ्यांना मोठी बक्षीसं द्यायला सुरुवात के ली.
त्यानंतर पोलिसांनी आदिवासींच्या उत्सवात सहभागी व्हायचे ठरवले. त्यांच्यात कोमरम भीम
जयंती' हा एक उत्सव असायचा. 'कोमरम भीम' हा गोंड आदिवासी होता, त्याची १९४० साली निजाम
सरकारने हत्या के ली होती. तो आदिवासींच्या जमिनीसाठी लढत होता. त्याची जयंती लोक साजरी
करायचे. पूर्वी इंदरवेल्ली जवळ के सलापूरच्या जत्रेत आदिवासी दरबार भरायचा, पण तो दरबार
मागील पंधरा-वीस वर्षांपासून बंद होता. आम्ही तो दरबार सुरू के ला. पोलिस व शासकीय अधिकारी
तिथे गेले आणि आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या, अनेकांचे निकाल तिथल्या तिथेच लावून
टाकले, त्यासाठी जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकाऱ्यांचा

२० : साधना ६२वा वर्धापनदिन विशेषांक १५ ऑगस्ट २००९

You might also like