You are on page 1of 10

EaI.esa.ko.

SaaomaOyaa
jyau.kaolaoja Aaof
eDukoSana

Svaota ikSaaOr pyaolakr


p`qama vaYa- [Mga`jaI maaQyama
marazI pI.pI.tI
विभक्ती व त्याचे प्रकार
 विभक्ती प्रत्यय
नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किं वा
इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले
जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.
नामाचे किं वा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला
जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे
म्हणतात.
 नामांच्या किं वा सर्वनामांच्या क्रियापदांशी किं वा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून
विभक्तीचे एकू ण 8 प्रकार पडतात.
प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – कर्ता
व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – कर्म
तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण
चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान
पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान
षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध
सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण
संबोधन – नो – संबोधन
 विभक्तीचे अर्थ
1) कारकार्थ/ कारकसंबंध :
वाक्यातील नाम/सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात,
त्यांना ‘कारकार्थ’ असे म्हणतात.
 विभक्तीचे मुख्य 6 कारकार्थ आहेत
 कर्ता
 कर्म
 करण
 संप्रदान
 अपादान (वियोग)
 अधिकरण
1) कर्ता
क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा कोणीतरी असतो, त्यास ‘कर्ता’ असे म्हणतात. कर्त्यांची विभक्ती
के व्हा-के व्हा प्रथमा असते.
प्रथमेचा प्रमुख असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो.
उदा. राम आंबा खातो.
2) कर्म
कर्त्यांने के लेली क्रिया कोणावर तरी घडलेली किं वा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म’ होय.
हे प्रत्यक्ष कर्म असते याची विभक्ती व्दितीया असते.
व्दीतीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो.
उदा. राम रावणास मारतो.
3) करण
वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला ‘करण’ असे म्हणतात.
करण म्हणजे क्रियेच साधन.
उदा. आई चाकू ने भाजी कापते.
या वाक्यात कापण्याची क्रिया चाकू या साधनाने होत आहे. म्हणून चाकू ने या शब्दांची विभक्ती तृतीया
असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण होय.
4) संप्रदान
जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान (कोणतीही वस्तू) ज्याला करण्यात येते त्या शब्दाला
किं वा क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला ‘संप्रदान’ असे म्हणतात.
दान देण्याची क्रिया ज्याच्यावर होते त्याला ‘संप्रदान’ असे म्हणतात.
उदा. मी गुरुजींना दक्षिणा दिली.
या वाक्यात दान देण्याची क्रिया गुरुजी या शब्दावर होत असून त्याची विभक्ती चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य
कारकार्थ संप्रदान होय.
5) आपदान (वियोग)
क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने त्याच्यापासून एखाधा
वस्तूचा वियोग दाखविण्याचा असतो त्यास ‘अपादान’ म्हणतात.
उदा. मी शाळेतून आताच घरी आलो.
या वाक्यातील शाळेतून या शब्दातून अपादानाचा अर्थ व्यक्त होत असून त्याची विभक्ती पंचमी ही असून
पंचमीचा मुख्य कारकार्थ अपादान हा होय.
6) अधिकरण (आश्रय/ स्थान) 
वाक्यातील क्रिया कोठे किं वा के व्हा घडली हे क्रियचे स्थान किं वा काळ दर्शविणार्‍या शब्दांच्या
संबंधास ‘अधिकरण’ असे म्हणतात.
उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो.
या वाक्यातील सकाळी व शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व शाळेत हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवित
असून त्यांची विभक्ती सप्तमी ही आहे व त्या सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकारण हे आहे.
2) उपपदार्थ :
नाम किं वा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध
असतात त्यांना ‘उपपदार्थ’ असे म्हणतात.

उदा. आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले.


वाक्यातील उद्देश: आमच्या वर्गातील मधुने.
वाक्यातील विधेय: शाळेचे सुवर्णपदक जिकले.

You might also like